Ayodhya Ram Mandir: रामलला प्रतिष्ठापनेच्या मुहुर्तात 'हे' चार सेकंद असतील सर्वाधिक महत्त्वाचे!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 03:54 PM2024-01-05T15:54:48+5:302024-01-05T15:55:22+5:30

Ayodhya Ram Mandir: २२ जानेवारीला अयोध्येत रामललाची प्रतिष्ठापना होणार आहे, त्यात कालावधीतले चार सेकंद कोणत्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत ते जाणून घेऊ. 

Ayodhya Ram Mandir: 'These' four seconds will be the most important during Ramlala installation at ayodhya! | Ayodhya Ram Mandir: रामलला प्रतिष्ठापनेच्या मुहुर्तात 'हे' चार सेकंद असतील सर्वाधिक महत्त्वाचे!

Ayodhya Ram Mandir: रामलला प्रतिष्ठापनेच्या मुहुर्तात 'हे' चार सेकंद असतील सर्वाधिक महत्त्वाचे!

गेली शेकडो वर्षे ज्या क्षणाची वाट संपूर्ण देश पाहत होता, तो क्षण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम जलदगतीने सुरू आहे. राम मंदिर परिसरात पंचायन देवतांची मंदिरेही असणार आहेत. राम मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांच्या सोयी, सुविधेसाठी अनेक गोष्टी केल्या जात आहेत. संपूर्ण देश राम मंदिर लोकार्पणाची वाट पाहत आहे. तारीख ठरली, वार ठरला, मुहूर्तही ठरला, अशातच या मुहुर्तातही भाग्यकारक मुहूर्त ४ सेकंदांमध्ये सामावलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊ. 

श्रीरामलल्लाची प्राणप्रतिष्ठा नवीन राम मंदिरात केली जाणार आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १२ वाजून ३० मिनिटे या मुहुर्तावर रामलल्ला विराजमान होणार आहे. राम दर्शनाची भाविकांना आस लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह हजारो मान्यवरांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य सोहळा होणार आहे. या सोहळ्याचा मुहूर्त खास असल्याचे सांगितले जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे काही अद्भूत शुभ संयोग जुळून येत आहेत.

प्राणप्रतिष्ठा कशासाठी?

देवांची मूर्ती विविध प्रकारचे धातू, माती इ. माध्यमांचा वापर करून बनवली जाते. मूर्तिकार जीव ओतून मूर्ती घडवतो आणि ती जिवंत वाटते. पुरोहित आपल्या मंत्रसामर्थ्याने जिवंत वाटणाऱ्या मूर्तीत प्राण प्रतिष्ठा करतात आणि ती जिवंत देवता बनवतात. त्यानंतर त्या मूर्तीला देवत्त्व येते आणि तो केवळ धातू न राहता शक्तीपीठ बनते. रामललाच्या मूर्तीबद्दलही तेच होणार आहे. वर्षानुवर्षे या क्षणाची सगळेच वाट पाहत होते, असे कार्य सिद्धीस जावे म्हणून ते सुमुहूर्तावर केले जाते. २२ जानेवारी हा देखील असाच शुभमुहूर्त आहे. 

शुभ मुहूर्त : 

पौष मास लग्न, मुंज कार्यासाठी शुभ काळ मानला जात नसला तरी देवकार्यासाठी तो अत्यंत शुभ मानला जातो. १२ जानेवारी रोजी पौष मास सुरू होत आहे आणि प्राणप्रतिष्ठा विधीसाठी २२ तारीख नियोजित करण्यात आली आहे. हाती घेतलेले कार्य योग्य रीतीने कार्य पार पडावे यासाठी ग्रहांचे पाठबळ देखील बघावे लागते. ते सर्व पाहूनच ज्योतिष तज्ज्ञांनी २२ जानेवारी २०२४ ही तारीख आणि दुपारी १२. ३० चा मुहूर्त सुनिश्चित केला आहे. या दिवशी शुभ मानले गेलेले मृगशीर्ष नक्षत्र आहे. सोमवार शुभ आहे. सोमवारी मृगशीर्ष नक्षत्राचा संयोग शुभ मानला गेला आहे. कोणत्याही शुभ कार्यासाठी लग्न स्थानाला सर्वाधिक महत्त्व असते. रामलल्ला जेव्हा विराजमान होतील, तेव्हा पूर्व क्षितिजावर मेष राशीचा उदय होईल. कोणतेही काम जे दीर्घकाळ सुरळीतपणे चालू राहणे अपेक्षित आहे, त्यासाठी स्थिर राशीचे लग्न सर्वोत्तम मानले जाते. मात्र, मेष लग्न हे चर आहे.

'हे' चार सेंकंद महत्त्वाचे :

जेव्हा कुंडलीमध्ये अत्यंत सूक्ष्म गणिते करावी लागतात, तेव्हा ज्योतिषशास्त्र आपल्याला वर्ग कुंडलीतील षष्ठांश कुंडली पाहण्याचा सल्ला देते. वर नमूद केलेल्या प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्तानुसार षष्ठियांश कुंडली पाहिल्यास १२:२९ मिनिटे ०८ सेकंद ते १२:३० मिनिटे २० सेकंदापर्यंत षष्ठांश राशी कर्क असेल, जो परिवर्तनशील असेल, जो स्थिरतेसाठी योग्य मानले जाते.

१२. ३० मिनिटे २१ सेकंदात षष्ठांश सिंह राशि होईल. कुंडलीचे पाचवे घर या कुंडलीचा आरोही बनेल, नवव्या घरात उच्चस्थानी राशीची उपस्थिती बृहस्पति सोबत असेल आणि सर्व धर्म त्रिकोण बृहस्पति ग्रहाने पाहतील. याचा अर्थ १२.३०.२१ ते १२.३०.२५ यातील २१ ते २५ ही चार सेकंद रामललाची दिगंत कीर्ती वाढवणारी ठरतील, त्यादृष्टीने या सेकंदाचे महत्त्व सर्वाधिक आहे. 

सदर मान्यता आणि ज्योतिषीय दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

Web Title: Ayodhya Ram Mandir: 'These' four seconds will be the most important during Ramlala installation at ayodhya!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.