बद्रीनाथ हे केवळ एक धाम नसून त्याचे सात उपधाम आहेत, ते कोणते हे जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 05:32 PM2021-07-06T17:32:30+5:302021-07-06T17:32:48+5:30

आपण समजतो त्याप्रमाणे बद्रीनाथ हे केवळ एक धाम नाही, तर त्याचे आणखी सात उपधाम आहेत.

Badrinath is not just a dham, it has seven sub-dhams, find out which ones | बद्रीनाथ हे केवळ एक धाम नसून त्याचे सात उपधाम आहेत, ते कोणते हे जाणून घ्या!

बद्रीनाथ हे केवळ एक धाम नसून त्याचे सात उपधाम आहेत, ते कोणते हे जाणून घ्या!

googlenewsNext

उत्तराखंड ही देवभूमी मानली जाते. या भूमीवर अनेक तीर्थक्षेत्र आहेत, तसेच ही भूमी निसर्गसौंदर्याने वेढलेली आहे. त्यामुळे दरवर्षी हजारो भाविक आणि पर्यटक तेथील तीर्थक्षेत्रांना भेटी देतात. चार धाम यात्रेतील बद्रीनाथ, हे तीर्थक्षेत्रदेखील उत्तर प्रदेश राज्याच्या चमोली जिल्ह्यात, अलकनंदा नदीकाठी समुद्रसपाटीपासून सुमारे ३,००० मी. उंचीवर वसलेले आहे. 

या स्थानाविषयी अनेक आख्यायिका पूर्वीपासून प्रचलित आहेत. उदा., भगवान विष्णू येथे तपश्चर्चेला बसले असता, उन्हापासून त्यांचे रक्षण व्हावे, म्हणून लक्ष्मीने बदरीचे (बोरीचे झाड) रूप घेतले. त्यामुळे या स्थानाला ‘बदरीनाथ’ हे नाव पडले. पूर्वी येथे असलेल्या बोरीच्या वनावरून यास ‘बद्रीनाथ’ (बदरीनाथ) हे नाव पडले असेही समजसे जाते. येथील बद्रीनाथाचे म्हणजे विष्णूचे मूळचे मंदिर आद्य शंकराचार्यांनी आठव्या शतकात बांधले. परंतु हिवाळ्यात सतत होणाऱ्या हिमवृष्टीमुळे ते मोडकळीस आले.

विद्यमान मंदिर नवीन व भव्य असून त्याच्या सभामंडपावर डेरेदार कळस व गाभाऱ्यावर पॅगोडा पद्धतीचे सोन्याच्या पत्र्याने मढविलेले शिखर आहे. गाभाऱ्यातील बद्रीनाथाची योगासन घातलेली मूर्ती शाळिग्रामाची असून ती ६० सेंमी. उंच आहे. ही मूर्ती वैष्णव पंथीय विष्णूची मानतात, तर बौद्ध धर्मीय ती गौतम बुद्धाची समजतात.

मंदिरात बद्रिनारायणाशिवाय नारद, नरनारायण, लक्ष्मी, कुबेर, इत्यादींच्या मूर्ती आहेत. नोव्हेंबर ते एप्रिल या काळात हिमवृष्टीमुळे येथील मंदिर बंद ठेवण्यात येते आणि बद्रिनारायणाची उत्सवमूर्ती दर्शनासाठी जोशीमठात हलविण्यात येते. 

या क्षेत्राच्या परिसरात पंचशिला, ऋषिगंगा, कूर्मधारा, प्रह्लादधारा, तप्तकुंड, नारदकुंड इ. तीर्थे असून जवळच असलेला ब्रह्मकपाल नावचा प्रशस्त खडक श्राद्धादी कर्मांसाठी पवित्र मानला जातो. येथे गरम पाण्याचे झरेही आहेत. देवपूजेचे काम परंपरेने ‘रावळ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंपूतिरी (नंबुद्री) ब्राह्मणाकडे असते.

याच्या परिसरात वसुधारा धबधबा. मुचकुंद गुंफा, बदरिकाश्रम (व्यासांची पर्णकुटी), जवळच गंधमादन पर्वत इ. ठिकाणे व पश्चिमेस२७ किमी. वर बद्रीनाथ हे ७,१३८ मी. उंचीचे प्रसिद्ध शिखर आहे. यात्रिकांसाठी काली-कंबलीवाल्यांच्या धर्मशाळा, भोजनासाठी सदावर्त इ. सोयी आहेत. अशी माहिती मराठी विश्वकोश संकेत स्थळावर मिळते. 

परंतु, आपण समजतो त्याप्रमाणे बद्रीनाथ हे केवळ एक धाम नाही, तर त्याचे आणखी सात उपधाम आहेत. ते कोणते हे जाणून घेऊ. 

१. श्री बद्रीनाथ: उत्तराखंडच्या चमोलीतील बद्रीकावन बद्रीकाश्रमात केदारनाथजवळील हा मुख्य बद्रीनाथ धाम आहे. मोठ्या आणि लहान चार धामाच्या पैकी हे एक तीर्थक्षेत्र आहे.

२. श्री आदि बद्री: हे उत्तराखंडच्या चमोलीच्या कर्ण प्रयागमध्ये वसलेले सर्वात जुने ठिकाण असल्याचे म्हटले जाते. श्री हरि विष्णू येथे विराजमान आहेत.

३  श्री वृद्धा बद्री: हे ठिकाण चमोलीच्या जोशीमठ जवळील अनिमथ येथे आहे.

४. श्री भविश्य बद्री: असे म्हणतात की भविष्यात केदारनाथ आणि बद्रीनाथ अदृश्य होतील, तेव्हा हे स्थान तीर्थक्षेत्र असेल. हे ठिकाण चमोलीच्या जोशीमठ जवळ सुभाईन तपोवन येथे देखील आहे.

५. श्री योगधन बद्री: हे ठिकाण चमोलीतील पांडुकेश्वर येथे आहे.

६. श्री ध्यान बद्री: उरगम घाटी (कल्पेश्वर जवळ) येथील चामोली येथेही हे ठिकाण आहे.

७. श्री नरसिंग बद्री: हे ठिकाण चमोलीच्या जोशीमठ जवळ आहे.

अशा या अद्भुत ठिकाणाला अर्थात तीर्थक्षेत्राला एकदातरी भेट दिलीच पाहिजे. 


 

Web Title: Badrinath is not just a dham, it has seven sub-dhams, find out which ones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.