जीवन कसे जगावे, याचे मौलिक मार्गदर्शन स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्याकडून. लोकमत भक्ती live वर!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 08:00 AM2021-04-22T08:00:00+5:302021-04-22T08:00:07+5:30

२३ एप्रिल २०२१ रोजी रात्री ८ वाजता स्वामी शांतिगिरीजी महाराजांचे विचार ऐकण्यासाठी लोकमत भक्ती युट्युबचॅनेलला अवश्य भेट द्या!

Basic guidance on how to live life from Swami Shantigiriji Maharaj. Lokmat Bhakti live! | जीवन कसे जगावे, याचे मौलिक मार्गदर्शन स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्याकडून. लोकमत भक्ती live वर!

जीवन कसे जगावे, याचे मौलिक मार्गदर्शन स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्याकडून. लोकमत भक्ती live वर!

Next

आपण जिवंत आहोत पण आपण जगतोय का? हा प्रश्न आपण स्वतःला कधीच विचारत नाही. नुसते दिवस ढकलणे म्हणजे जगणे नाही. त्यासाठी आयुष्याला योग्य वेळी योग्य वळण देणे गरजेचे आहे. त्यासाठी गरज असते योग्य मार्गदर्शनाची! यासाठीच प. पू. स्वामी शांतिगिरीजी महाराज 'परिपक्व जीवन जगण्याचे सार' या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. 

उत्तम समाजसेवक आणि अध्यात्मिक गुरु अशी स्वामीजींची ख्याती आहे. साधारणतः १९७५-७६ मध्ये शांतिगिरीजी बाबांनी जे घर सोडले ते आजतागायत आहे. 'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती.' या उक्तीप्रमाणे शांतिगिरीजी बाबांनी आपले कार्य सुरू केले. पहिल्यापासूनच शांतिगिरीजी बाबा जनार्दन बाबांचे आवडते शिष्य होते. सन १९८९ मध्ये जनार्दन बाबांचे महानिर्वाण झाले. आणि सोडशी सोहळ्यात जनार्दन बाबांच्या उत्तराधिकारी पदाची शाल अनेक मान्यवरांच्या साक्षीने आणि शंभू पंचनाम जुना आखाड्याच्या साधूंच्या उपस्थितीत शांतिगिरीजी बाबांच्या अंगावर चढवली. परंतु आजही काही नतभ्रष्ट लोक हे मान्य करायला तयार नाही. त्यानंतर ही शांतिगिरीजी बाबांना अनेक प्रकारचे त्रास काही लोकांनी दिला. प्रसंगी मारायचा प्रयत्न झाला. परंतु जनार्दन बाबांनी दिव्य दृष्टी दिलेल्या शांतिगिरीजी बाबांनी आपले कार्य थांबवले नाही. या सर्वांतून शांतिगिरीजी बाबांनी संयमाने आणि धैर्याने मार्ग काढत बाबांच्या कार्याचा प्रचार प्रसाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली ती आजतागायत सुरू आहे. 

२३ एप्रिल २०२१ रोजी रात्री ८ वाजता स्वामी शांतिगिरीजी महाराजांचे विचार ऐकण्यासाठी लोकमत भक्ती युट्युबचॅनेलला अवश्य भेट द्या!

Web Title: Basic guidance on how to live life from Swami Shantigiriji Maharaj. Lokmat Bhakti live!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.