'धीर धरा...हे ही दिवस जातील'; वाचा दोन शेतकऱ्यांच्या यशापयशाची गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 08:00 AM2021-12-17T08:00:00+5:302021-12-17T08:00:01+5:30

कितीही कठीण परिस्थिती असली, तरी संयम ठेवा! आज ना उद्या परिस्थिती बदलेल आणि त्याबरोबर तुमची मनस्थितीदेखील!

'Be patient ... these days will pass'; Read the story of two farmers! | 'धीर धरा...हे ही दिवस जातील'; वाचा दोन शेतकऱ्यांच्या यशापयशाची गोष्ट!

'धीर धरा...हे ही दिवस जातील'; वाचा दोन शेतकऱ्यांच्या यशापयशाची गोष्ट!

Next

आपण सतत दुसऱ्यांकडे पाहून दु:खी होत असतो. आपल्या आनंदाची तुलना त्यांच्याशी करत राहतो. त्यामुळे होते असे, की जे आपल्याकडे आहे, त्याकडे आपले लक्षच जात नाही आणि नुकसान आपलेच होत राहते. आता या दोन शेतकऱ्यांचीच गोष्ट बघा ना!

एका गावात सामान्य जीवन जगणारे दोन शेतकरी होते. एक समाधानी होता तर दुसरा असमाधानी. गेल्या काही काळात त्या गावातल्या काही शेतकऱ्यांना आपल्या शेतात हिरे आणि मौल्यवान रत्ने सापडली. ते रातोरात श्रीमंत झाले. ते पाहून असमाधानी शेतकऱ्यानेसुद्धा नशीब आजमवायचहे ठरवले. त्यानेही प्रयत्न करून पाहिला इथवर ठीक आहे. परंतु त्याने अपयशाने खचून आत्महत्या केली. 

याउलट दुसरा शेतकरी आपले काम प्रामाणिकपणे करत राहिला. हिरे, मौल्यवान रत्ने यांची स्वप्न बघण्याऐवजी काळ्या मातीत सोन्यासारखे धान्य पिकवत होता. एक दिवस त्याला शेतात आकर्षक दगड दिसला. त्याने कौतुकाने तो घरी आणला. मुलांनाही मजा वाटली. बायकोने तो श्रद्धेने कपाळी लावून देवघरात ठेवला.

एक दिवस त्याचा मित्र शहरातून आला. त्याच्या घरी उतरला. तेव्हा त्याची दृष्टी देवघरात गेली. तो म्हणाला, हे मुल्यवान रत्न तू खुलेआम ठेवले आहेस, तुला भीती नाही वाटली?

यावर शेतकरी म्हणाला, ते रत्न आहे हेच मला माहित नव्हते. मला तो आकर्षक वाटला म्हणून घरी आणला. बायकोने देव्हाऱ्यात ठेवला, एवढेच!
मित्र म्हणाला, तुझ्या शेतजमीनीची पाहणी करायला हवी. शेतकऱ्याने होकार दिला आणि खोदकामात त्या शेतातून मुल्यवान रत्नांची खाण निघाली. शेतकऱ्याचे दिवस पालटले. तो समाधानी होताच, आता आनंदाने वैभव उपभोगू लागला. त्यावेळेस त्याला आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची आठवण आली. त्यानेही स्वत:वर आणि दैवावर विश्वास ठेवला असता तर कदाचित आज परिस्थिती त्याचीही बदलली असती.

म्हणून कितीही कठीण परिस्थिती असली, तरी संयम ठेवा! आज ना उद्या परिस्थिती बदलेल आणि त्याबरोबर तुमची मनस्थितीदेखील!

Web Title: 'Be patient ... these days will pass'; Read the story of two farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.