रागीट लोकांनो सावधान! मंगळ आणि राहू यांच्या युतिमुळे तुमच्यावर होणार आहेत अनिष्ट परिणाम़...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 05:51 PM2021-02-18T17:51:32+5:302021-02-18T17:52:54+5:30
२२ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजून २ मीनिटांनी मंगळाचे राशी परिवर्तन होणार आहे. मेष राशीतून वृषभ राशीत मंगळाचे स्थलांतर होणार असून १४ एप्रिल पर्यंत मंगळाचा वृषभ स्थानी मुक्काम राहणार आहे.
लवकरच मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन होणार आहे. मंगळ हा ग्रह मेष राशीतून वृषभ राशीत जाणार आहे. वृषभ राशीत मंगळाच्या आगमनापूर्वीच वाईट ग्रह ठिय्या मारून बसले आहेत.
सर्व ग्रहांमध्ये मंगळ ग्रहाला अधिक महत्त्व असते. ज्योतिषशास्त्रात मंगळाला ग्रहांचा सेनापती म्हणतात. मंगळ हा ग्रह मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी मानला जातो. आता मेष राशीमध्ये मंगळाचा मुक्काम असला, तरी लवकर तो स्थलांतरित होऊन वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. मकर राशीत मंगळाचा प्रवेश शुभ मानला जातो. मकर राशीला त्याचे फायदे होतात. याउलट कर्क राशीला मंगळप्रवेशाचे दुष्परिणाम भोगावे लागतात. सूर्य, चंद्र आणि बृहस्पति हे तिनही मित्रग्रह आहेत. बुध आणि मंगळ यांची जोडी जमत नाही. शुक्र आणि शनिची युती होते. यात मंगळाची भूमिका महत्त्वाची ठरते.
मंगळ हा ग्रह साहस, शौर्य, क्रोध आणि ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. हा अतिशय शक्तिशाली ग्रह आहे. आपल्या आयुष्यातील शुभ, अशुभ गोष्टी त्याच्या स्थानावर अवलंबून असतात. मंगळ प्रत्येकाच्या कुंडलित असतो, परंतु ज्योतिष शास्त्रानुसार आपल्या जातकाशी संबधित योग्य ग्रहस्थिती नसल्यास, मंगळाची भूमिका मंगळ दोष म्हणून संबोधली जाते. वैवाहिक संबंधांमध्येही मंगळाची स्थिती पाहून पत्रिका जुळवली जाते. दोन तापट व्यक्ती एकत्र येऊन चालणार नाही, अन्यथा दोघांचा संसारात `होम' न राहता संसाराचे होमकुंड होईल. म्हणून एकाला तीव्र मंगळ असेल तर दुसऱ्याला सौम्य मंगळ असल्यास पत्रिका जुळवली जाते.
२२ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजून २ मीनिटांनी मंगळाचे राशी परिवर्तन होणार आहे. मेष राशीतून वृषभ राशीत मंगळाचे स्थलांतर होणार असून १४ एप्रिल पर्यंत मंगळाचा वृषभ स्थानी मुक्काम राहणार आहे.
राहू आणि मंगळ हे दोन्ही ग्रह एकत्र येतात, त्याला अंगारक योग म्हणतात. २२तारखेला अंगारक योग आहे. हा योग चांगला मानला जात नाही. तापट लोकांच्या बाबतीत या काळात भांडण, तंटे, वाद, विवाद यातून हिंसक वळण येण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम नात्यावर होऊन वितुष्ट येऊ शकते.
मेष, वृषभ, वृश्चिक आणि मकर राशीच्या जातकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. रागावर नियंत्रण ठेवून मौन साधणे इष्ट ठरेल. 'रागावर घाला आळा, तब्येतीला सांभाळा' हा मंगळ ग्रहाचा संदेश लक्षात ठेवा, म्हणजे सगळेच मंगल होईल.