Bhanu Saptami 2023: रविवारी भानू सप्तमीला 'हे' काम केल्याने वाढेल मान-सन्मान, प्रत्येक कामात मिळेल उत्तुंग यश!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 01:56 PM2023-02-21T13:56:15+5:302023-02-21T13:56:38+5:30
Bhanu Saptami 2023: भानु सप्तमीला सूर्यपूजा करतात. त्या पूजेस लेखात दिलेल्या गोष्टीची जोड दिल्यास इच्छित फलप्राप्ती झालीच समजा!
हिंदू कॅलेंडरनुसार, सप्तमी तिथी प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पंधरवड्यांमध्ये येते. सप्तमी तिथी ही भगवान सूर्यदेवांना समर्पित आहे. फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी भानु सप्तमी म्हणून ओळखली जाते. या दिवशी भगवान सूर्याला अर्घ्य अर्पण करण्याबरोबरच त्याची विधिवत पूजा केली जाते. भारतात सूर्यपूजेची मोठी परंपरा आहे. जी व्यक्ती नियमीतपणे सूर्यपूजा करते, ती सूर्यदेवाच्या कृपेस पात्र होते. म्हणून वर्षभर जमले नाही तरी सुर्यपुजेशी संबंधित तिथीला दिलेली उपासना जरूर करावी असे शास्त्र सांगते.
सूर्योपासना करणाऱ्याला आयुष्य, आरोग्य, तेज प्राप्त होतेच शिवाय अनेकविध आजारांपासून मुक्ती देखील मिळते. तुम्हालाही ते लाभ हवे असतील तर भानू सप्तमीपासून सूर्य पूजेस प्रारंभ करा. त्यासाठी जाणून घेऊया व्रत विधी.
भानु सप्तमी शुभ मुहूर्त २०२३
हिंदू कॅलेंडरनुसार, भानु सप्तमी २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १२. ३० वाजता सुरू होईल आणि तारीख २७ फेब्रुवारी रोजी सकाळी १२. ५९ वाजता समाप्त होईल. या दिवशी २६ फेब्रुवारीला संध्याकाळी ४.२६ पर्यंत इंद्र योग राहील. त्याचबरोबर त्रिपुष्कर योगाची सुरुवात २६ फेब्रुवारीला सकाळी ६.३९ ते २७ फेब्रुवारीला सकाळी १२. ५९ पर्यंत असेल.
भानु सप्तमी पूजन पद्धत
या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे. हे व्रत कायमस्वरूपी अंगिकारणार असाल तर त्यादिवशी हातात पाणी घेऊन सूर्याकडे बघत अर्घ्य द्यावे आणि संकल्प सोडावा. ही पूजा त्या दिवसापुरती असेल तर स्नान करून तांब्याच्या भांड्यात पाणी, अक्षत, कुंकू घेऊन सूर्याला अर्घ्य द्यावे. त्या दिवशी उपास करावा. फलाहार करावा. दुसऱ्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्यानंतरच उपवास सोडावा. गरजूंना दान आणि गाईला हिरवा चारा द्यावा. याबरोबर सूर्यनमस्कार तसेच सूर्याची बारा नावे घेऊन सूर्यपूजा पूर्ण करावी. या उपासनेने होणारा लाभ काही काळातच तुम्हाला दिसून येईल.
सूर्यपूजेसाठी सूर्याची बारा नावे-
ओम मित्राय नमः ।
ओम रावये नमः ।
ओम सूर्याय नमः ।
ओम भानवे नमः ।
ओम खगाय नमः ।
ओम पुश्ने नमः ।
ॐ हिरण्यगर्भाय नमः ।
ओम मारिचये नमः ।
ॐ आदित्यय नमः ।
ॐ सवित्रे नमः।
ॐ अर्काय नमः।
ॐ भास्कराय नमः।