देवेंद्र फडणवीस रामललाचरणी नतमस्तक; रामदर्शनाने जीवन धन्य झाल्याची भावना व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 11:27 AM2024-05-31T11:27:24+5:302024-05-31T11:29:11+5:30

Devendra Fadnavis Ayodhya Ram Mandir Tour: अयोध्येच्या पवित्र भूमीत आल्यावर प्रत्येकाचे डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

bjp dcm devendra fadnavis took ram lalla darshan at ayodhya ram mandir | देवेंद्र फडणवीस रामललाचरणी नतमस्तक; रामदर्शनाने जीवन धन्य झाल्याची भावना व्यक्त

देवेंद्र फडणवीस रामललाचरणी नतमस्तक; रामदर्शनाने जीवन धन्य झाल्याची भावना व्यक्त

Devendra Fadnavis Ayodhya Ram Mandir Tour: लोकसभा निवडणुकीच्या सर्व टप्प्यांसाठीच्या प्रचारतोफा थंडावल्या. आता ०१ जून रोजी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर ०४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारी येथे ध्यानस्थ झाले असताना दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येला जाऊन रामललाचे दर्शन घेतले.

हे ते ठिकाण आहे जिथे श्री रामललाच्या पायांनी भूमी पवित्र झाली होती. कोट्यवधी लोकांची श्रद्धा असलेली ही जागा आहे. या भूमीत आल्यावर प्रत्येकाचे डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाही. हे अयोध्या धाम आहे, जिथे माझे भगवान श्रीराम आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. एक्सवर पोस्ट करत देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्या दौऱ्याची माहिती दिली आहे.

सर्वांच्या कल्याणासाठी प्रभू श्री रामलल्लास प्रार्थना केली

अयोध्या धाम येथील श्री रामजन्मभूमी मंदिरात श्री रामललाचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केले. ५०० वर्षांचा खडतर संघर्ष, अनेक पिढ्यांची प्रतीक्षा आणि त्यागानंतर उभारलेल्या या मंदिराची भव्यता आणि अलौकिकता अनुभवून आज मीही करोडो रामभक्तांप्रमाणे भावूक झालो. यावेळी सर्वांच्या कल्याणासाठी प्रभू श्री रामलल्लास प्रार्थना केली, अशी भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

दरम्यान, अयोध्या दौऱ्यावर असताना देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेशात स्थायिक झालेल्या मराठी जनतेशी संवाद साधला. तसेच काशीला जाऊन बाबा विश्वनाथांचेही दर्शन घेतले.
 

Web Title: bjp dcm devendra fadnavis took ram lalla darshan at ayodhya ram mandir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.