UP Election 2022: यूपी निवडणुकीत चमकेल का मायावतींचे नशीब? ‘ही’ ग्रहस्थिती गेमचेंजर ठरणार! जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 03:32 PM2021-12-23T15:32:40+5:302021-12-23T15:34:29+5:30

UP Election 2022: उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये मायावती यांची खेळी यशस्वी होऊ शकेल का? जन्मकुंडली काय सांगते? जाणून घ्या...

bsp chief mayawati kundli and planet position prediction for up election 2022 | UP Election 2022: यूपी निवडणुकीत चमकेल का मायावतींचे नशीब? ‘ही’ ग्रहस्थिती गेमचेंजर ठरणार! जाणून घ्या

UP Election 2022: यूपी निवडणुकीत चमकेल का मायावतींचे नशीब? ‘ही’ ग्रहस्थिती गेमचेंजर ठरणार! जाणून घ्या

Next

पुढील वर्षाच्या सुरुवातीला पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र, सर्वाधिक चर्चा आणि लक्ष उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांकडे (UP Election 2022) असणार आहे. कारण उत्तर प्रदेशचा कल लोकसभेचे चित्र स्पष्ट करणारा ठरतो, असे सांगितले जाते. आताच्या घडीला भाजपविरोधात सर्व विरोधी पक्षांची आघाडी तयार करण्यावर भर दिला जात आहे. केवळ विधानसभा निवडणुका नाही, तर लोकसभा निवडणुकीतही भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व पक्ष लढतील, असे सांगितले जात आहे. मात्र, यातच अनेकदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती (Mayawati) नव्या दमाने निवडणुकीच्या आराखड्यात उतरल्या असून, अन्य पक्षांना टक्कर देण्यासाठी कंबर कसली आहे. मात्र, उत्तर प्रदेश निवडणुकीत मायावती यांचे नशीब उजळेल का? तिसऱ्या नंबरवर असलेल्या मायावती यांना दोन क्रमांक किंवा पहिल्या क्रमांकावर झेप घेता येऊ शकेल का? कुंडली काय सांगते? जाणून घेऊया... 

मायावती यांचा जन्म १५ जानेवारी १९५६ रोजी रात्री ७ वाजून ५० वाजता झाला. मायावती यांची लग्न कुंडली कर्क राशीची आहे. तर मायावती यांची रास मकर आहे. मायावती यांच्या जन्मकुंडलीनुसार, त्यावेळी मकर राशीत चंद्र, सूर्य आणि बुध विराजमान होते. तर मायावती यांची कर्क लग्न कुंडलीत पाचव्या स्थानी वृश्चिकेत मंगळ आणि राहुची युती आहे. 

उत्तर प्रदेशचे चार वेळा मुख्यमंत्रीपद

मायावती यांच्या जन्मकुंडलीनुसार १९९४ ते २०१३ या कालावधीत शनीची महादशा सुरू होती. या कालावधीचा प्रचंड लाभ मायावतींना झाला. याच काळात मायावती यांनी चार वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषविले. शनीच्या महादशेचा अत्यंत शुभ प्रभाव या दरम्यान पाहायला मिळला. ज्योतिषशास्त्रानुसार, पंचमातील शनी आणि राहुच्या युतीमुळे समाजातील मागास तसेच गरीब वर्गाचे अनेक शुभाशिर्वाद मायावती यांना मिळाले. समाजातील या वर्गासाठी मायावती यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळात राजकीय चेताना निर्माण केली. 

साडेसातीमुळे लोकप्रियता खालावली

समाजातील या वर्गासाठी मायावती यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळात राजकीय चेताना निर्माण केली. मात्र, त्यानंतर मायावतींच्या जन्मकुंडलीत बुध, चंद्र आणि सूर्यावर शनीची तिसरी दृष्टी आणि साडेसाती यामुळे मायावती यांच्या लोकप्रियतेत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले. 

आगामी निवडणुकीत नशीब पुन्हा चमकेल का?

सन २०१७ मधील उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव तसेच २०१४ आणि २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत मायावती यांचे झालेले कमजोर प्रदर्शन यामुळे आगामी निवडणुकीचा मार्ग मायावती यांच्यासाठी सोपा नसेल. मात्र, आताच्या घडीला सुरू असलेल्या बुधातील मंगळाची विंशोत्तरी दशा यामुळे आगामी वर्षभर म्हणजेच नोव्हेंबर २०२२ पर्यंतचा कालावधी मायावती यांच्यासाठी सर्वोत्तम मानला जात आहे. तसेच कर्क लग्न कुंडलीच्या पाचव्या स्थानी वृश्चिक राशीत मंगळ आणि शनीची युती यामुळे ही निवडणूक मायावती यांच्यासाठी चांगली ठरू शकेल. लोकप्रियतेत पुन्हा वाढ संभवते. तसेच या निवडणुकीनंतर मायावती यांना उत्तम लाभाची प्राप्ती होऊ शकते, असे सांगितले जात आहे. 
 

Web Title: bsp chief mayawati kundli and planet position prediction for up election 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.