Budh Pradosh 2024: बुध प्रदोषाच्या शुभ मुहूर्तावर शिव स्तुती म्हणा; आयुष्यात सगळं शुभच घडेल!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 12:50 PM2024-06-19T12:50:45+5:302024-06-19T12:51:10+5:30
Budh Pradosh 2024: आज बुध प्रदोष आहे, हे व्रत सूर्यास्ताच्या वेळी केले जाते; ते कसे करायचे आणि ते केल्याने काय लाभ होतो त्याची सविस्तर माहिती जाणून घ्या.
दर महिन्याला कृष्ण आणि शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत केले जाते. जर तुम्हाला तुमच्या जीवनातील समस्या दूर करायच्या असतील तर प्रदोष काल पूजेच्या वेळी शिव स्तुती मंत्राचा जप करा. यामुळे व्यक्तीच्या जीवनात आनंद येतो आणि सुख-समृद्धी वाढते. चला शिव स्तुती वाचूया.
सनातन धर्मात प्रदोष व्रताचे विशेष महत्त्व आहे. प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला पाळले जाते. या दिवशी, प्रदोष काळात, भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा आणि उपवास करण्याची परंपरा आहे. सश्रद्ध मनाने महादेवाची आराधना केल्याने मनुष्याला शुभफळ प्राप्त होते, अशी धार्मिक धारणा आहे. तसेच भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीचा आशीर्वाद सदैव राहतो. आज 19 जून प्रदोष आहे. ही तिथी बुधवारी आल्याने याला बुध प्रदोष व्रत म्हटले जाईल.
बुध प्रदोष व्रत शुभ मुहूर्त
पंचांगानुसार, ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी १९ जून २०२४ रोजी सकाळी ७:२८ मिनिटांनी सुरू होईल. आणि २० जून रोजी सकाळी ७.४९ मिनिटांनी संपेल. अशा स्थितीत १९ जून रोजी प्रदोष व्रत सूर्यास्ताच्या वेळी अर्थात सायंकाळी ६.३० ते ७.३० दरम्यान करायचे आहे आणि पुढील शिवस्तुती म्हणायची आहे.
शिव स्तुति मंत्र (Shiv Stuti Ka Path)
पशूनां पतिं पापनाशं परेशं गजेन्द्रस्य कृत्तिं वसानं वरेण्यम।
जटाजूटमध्ये स्फुरद्गाङ्गवारिं महादेवमेकं स्मरामि स्मरारिम।1।
महेशं सुरेशं सुरारातिनाशं विभुं विश्वनाथं विभूत्यङ्गभूषम्।
विरूपाक्षमिन्द्वर्कवह्नित्रिनेत्रं सदानन्दमीडे प्रभुं पञ्चवक्त्रम्।2।
गिरीशं गणेशं गले नीलवर्णं गवेन्द्राधिरूढं गुणातीतरूपम्।
भवं भास्वरं भस्मना भूषिताङ्गं भवानीकलत्रं भजे पञ्चवक्त्रम्।3।
शिवाकान्त शंभो शशाङ्कार्धमौले महेशान शूलिञ्जटाजूटधारिन्।
त्वमेको जगद्व्यापको विश्वरूप: प्रसीद प्रसीद प्रभो पूर्णरूप।4।
परात्मानमेकं जगद्बीजमाद्यं निरीहं निराकारमोंकारवेद्यम्।
यतो जायते पाल्यते येन विश्वं तमीशं भजे लीयते यत्र विश्वम्।5।
न भूमिर्नं चापो न वह्निर्न वायुर्न चाकाशमास्ते न तन्द्रा न निद्रा।
न गृष्मो न शीतं न देशो न वेषो न यस्यास्ति मूर्तिस्त्रिमूर्तिं तमीड।6।
अजं शाश्वतं कारणं कारणानां शिवं केवलं भासकं भासकानाम्।
तुरीयं तम:पारमाद्यन्तहीनं प्रपद्ये परं पावनं द्वैतहीनम।7।
नमस्ते नमस्ते विभो विश्वमूर्ते नमस्ते नमस्ते चिदानन्दमूर्ते।
नमस्ते नमस्ते तपोयोगगम्य नमस्ते नमस्ते श्रुतिज्ञानगम्।8।
प्रभो शूलपाणे विभो विश्वनाथ महादेव शंभो महेश त्रिनेत्।
शिवाकान्त शान्त स्मरारे पुरारे त्वदन्यो वरेण्यो न मान्यो न गण्य:।9।
शंभो महेश करुणामय शूलपाणे गौरीपते पशुपते पशुपाशनाशिन्।
काशीपते करुणया जगदेतदेक-स्त्वंहंसि पासि विदधासि महेश्वरोऽसि।10।
त्वत्तो जगद्भवति देव भव स्मरारे त्वय्येव तिष्ठति जगन्मृड विश्वनाथ।
त्वय्येव गच्छति लयं जगदेतदीश लिङ्गात्मके हर चराचरविश्वरूपिन।11।