अपेक्षांच्या पलीकडे जाऊन नाती जोडून येतात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 05:36 PM2020-04-06T17:36:55+5:302020-04-06T17:53:20+5:30

जिथं नातं असत तिथ अपेक्षा असते. बहुतांश लोकांच्या अपेक्षा अश्या असतात की या पृथ्वीवरची कोणतीही व्यक्ती त्या तो कधीच पूर्ण करू शकणार नाही.

can we make relationships without expectations | अपेक्षांच्या पलीकडे जाऊन नाती जोडून येतात का?

अपेक्षांच्या पलीकडे जाऊन नाती जोडून येतात का?

Next

सद्‌गुरू: बहुतांश लोकांना ते त्यांचे आयुष कश्याप्रकारे जगतात हे त्यांच्या नात्यांच्या दर्जेवर निर्भर असते. जर हा घटक आपल्या आयुष्यात इतकी महत्वाची भूमिका बजावत असेल तर या कडे आपण नीट लक्ष दिले पाहिजे. तर या नात्यांचा आधार काय? त्या नात्यांची माणसाला गरज का भासते? नाती ही भिन्न-भिन्न स्तरांवर बनतात; वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्याशाठी वेगवेगळ्या प्रकारची नाती. तुमच्या गरजा शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक, आर्थिक किंवा राजकीय अश्या कुठल्याही प्रकारच्या असू शकतात.  

नाते हे कसेही-कुठल्या ही प्रकारचे असोत, पण महत्वाचा घटक हाच आहे की त्या नात्यात तुमची गरज पूर्ण होते. “नको...मला माझ्यासाठी काहीही नको, मला फक्त इतरांना द्यायचय.” “देणे” हा गुण सुद्धा “घेणे” या सारखाच गरजेचा भाग आहे. “मला कुणाला तरी काहीतरी द्यायचं आहे” ही भावनासुद्धा “मला काहीतरी मिळवायचं आहे” या सारखीच गरजेचा भाग आहे. ही गरज आहे. गरजा जश्या वेगवेगळ्या असू शकतात त्याचप्रकारे नातीसुद्धा भिन्न भिन्न असू शकतात. माणसांच्या गरजा वाढण्याचे कारण म्हणजे स्वतःमध्ये असणाऱ्या अपुरेपणाची जाणीव. आणि ही अपुरेपाणाची जाणीव घालवून तो परिपूर्ण बनण्यासाठी नाते-संबंध बनवतो. जेव्हा तुमचे तुमच्या प्रिय व्यक्तीशी घनिष्ट संबंध असतात, तेंव्हा तुम्हाला परिपूर्ण वाटते. पण जर संबंध बिघडले तर तुमच्यात अपुरेपणाची भावना निर्माण होते. हे असे का बर? या आपल्या जीवांनाच पूर्णपणे स्वतंत्र स्वतःचं असं एक अस्तित्व आहे. मग हा अपुरेपणाचा भाव का? का हा जीव दुसऱ्या जीवाशी भागीदारी करून परिपूर्ण बनण्याचा प्रयत्न करतो? याचे मुळात कारण हे आहे की आपण या जीवाची पूर्णपणे सधनता व परीमापण जाणून घेतलेल नाही. जरी हा एक मुख्य घटक आहे तरी नात्यांची प्रक्रिया किचकट आहे.

अपेक्षांचं स्रोत

जिथं नातं असत तिथ अपेक्षा असते. बहुतांश लोकांच्या अपेक्षा अश्या असतात की या पृथ्वीवरची कोणतीही व्यक्ती त्या तो कधीच पूर्ण करू शकणार नाही. विशेषकरून स्त्री आणि पुरुष मधील संबंध. अपेक्षा एवढ्या असतात की जर तुम्ही अक्षरश: देवाशी किंवा देवीशी जरी लग्न केलंत तरी ते सुद्धा तुम्हाला निराश करतील. जोपर्यंत तुम्हाला अपेक्षाबद्दल किंवा त्यांच्या मुळाबदल काही समजणार नाही, तो पर्यंत तुम्ही अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही. पण जर तुम्हाला कळले की अपेक्षांचा स्रोत काय आहे, तुम्ही एक खूप सुंदर भागीदारी बनवू शकता.

मुळातच तुम्ही नात्यांच्या शोधत का असता? कारण..... तुम्हाला जाणवेल की नात्याविना तुम्ही खचता. तुम्हाला सुखी राहायचं असतं, आनंदी राहायचं असतं. म्हणून तुम्ही नाती शोधता. किंवा जर वेगळ्या शब्दात सांगायचं झाला तर तुम्ही दुसऱ्या व्यक्तींना तुमच्या आनंदाचा स्रोत बनवण्याचा प्रयत्न करत असता. जर तुम्ही मुळातच स्वत:हून आनंदी असाल, नाती ही तुमचा आनंद अभिव्यक्त करण्याचे माध्यम ठरेल, न की आनंद मिळवण्याचे साधन. जर तुम्ही समोरच्या व्यक्तीचे दमन करून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत असाल आणि समोरची व्यक्तीसुद्धा तुमच्याशी हेच करत असेल तर हे नातं काही काळानंतर त्रासदायी ठरणार आहे. सुरुवातीला हे ठीक वाटेल कारण काहीतरी गरजा पूर्ण होत आहेत. पण जर तुम्ही तुमचा आनंद अभिव्यक्त करण्यासाठी नाती बनवत असाल तर तुमच्याबद्दल कोणीसुद्धा गाऱ्हाणे घालणार नाही, कारण तुम्ही तुमचा आनंद व्यक्त करण्याच्या प्रक्रियेत आहात, न की दुसऱ्या व्यक्तीकडून आनंद मिळवण्याचा.

जर तुमचं आयुष्य हेच आनंद अभिव्यक्त करत असेल न की आनंदाच्या शोधत, तर , नाती ही साहजिकच विस्मयकारक ठरतील. तुम्ही असंख्य नाती बनवू शकता आणि ती जपू ही शकता. ही सगळी दुसर्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची करामत आहे ना.....,याची गरजच भासणार नाही. कारण जर तुम्ही आनंदाची अभिव्यक्ती करत असाल तर त्यांनाही तुमच्या बरोबर राहण्याची इच्छा असेल.

जर तूम्हाला वाटत असेल की तुमचे नाते तग धरून राहावे , तर तुमचे आयुष्य हे सुख शोधणारे नसून आनंद व्यक्त करणारे झाले पाहिजे.

Web Title: can we make relationships without expectations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.