Chaitra Navratra 2022 : चैत्र नवरात्रीत ग्रहदशा पालटल्याने 'या' राशींच्या लोकांना होणार भरघोस लाभच लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 05:35 PM2022-04-01T17:35:16+5:302022-04-01T18:07:26+5:30

Chaitra Navratra 2022 : या सहा राशींबरोबरच अन्य राशीच्या लोकांनी नवरात्रीच्या काळात देवीची उपासना करावी. दुर्गा माता सर्वांच्या प्रयत्नांना नक्की यश देईल. 

Chaitra Navratra 2022: People of 'these' zodiac sign will get huge benefits due to change of planet in Chaitra Navratri! | Chaitra Navratra 2022 : चैत्र नवरात्रीत ग्रहदशा पालटल्याने 'या' राशींच्या लोकांना होणार भरघोस लाभच लाभ!

Chaitra Navratra 2022 : चैत्र नवरात्रीत ग्रहदशा पालटल्याने 'या' राशींच्या लोकांना होणार भरघोस लाभच लाभ!

googlenewsNext

चैत्र नवरात्रीचे ९ दिवस केवळ धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे नाहीत तर या काळात ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्याही मोठा बदल घडणार आहे. या ९ दिवसांत शनि आणि मंगळ सारखे महत्त्वाचे ग्रह संचार करतील आणि शनीच्या राशीतही एकत्र येतील. त्याचा प्रभाव कोणत्या राशींवर कसा पडणार आहे ते थोडक्यात पाहू. 

पंचांगानुसार, हिंदू नववर्ष चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून सुरू होते. या दिवसाला गुढी पाडवा असेही म्हणतात, तसेच चैत्र नवरात्रीचा ९ दिवसांचा उत्सवही याच दिवशी सुरू होतो. या ९ दिवसांमध्ये दुर्गा मातेच्या नऊ रूपांची अर्थात शक्ती रूपाची उपासना केली जाते. या उपासनेला ग्रहदशेची जोड मिळून काही राशींसाठी हा काळ महत्त्वपूर्ण बदल घडवणारा ठरणार आहे. त्या भाग्यवान राशी कोणत्या ते जाणून घेऊ. 

यावर्षी चैत्र नवरात्र २ एप्रिल २०२२, शनिवारपासून सुरू होत आहे, जी ११ एप्रिल २०२२ पर्यंत चालेल. या नऊ दिवसात उपास आणि उपासनेला ग्रहदशेची उत्तम साथ लाभणार आहे. त्यामुळे तुम्ही ठरवलेले किंवा इच्छित असलेले कार्य पूर्ण होऊ शकते. परंतु ही ग्रहस्थिती बारा राशींसाठी अनुकूल झाली आहे असे नाही, तर ती काही राशींना अनुकूल तर काहींना प्रतिकूल ठरणारी आहे. त्यामुळे कोणत्या राशींनी संधीचे सोने करायचे आणि कोणत्या राशींनी प्रतिकूल परिस्थितीत दक्षता घ्यायची ते लक्षपूर्वक वाचा. 

चैत्र नवरात्रीच्या काळात २ अत्यंत महत्त्वाच्या ग्रह राशी बदलणार आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार या ९ दिवसांमध्ये शनि आणि मंगळ मकर राशीतून भ्रमण करत आहेत. हे दोन ग्रह एकमेकांचे शत्रू आहेत, त्यामुळे त्यांची एकाच राशीत भेट झाल्याने अनेक अडचणी निर्माण होतील. 

कर्क, कन्या आणि धनु राशीच्या लोकांसाठी हा बदल शुभ ठरणार नाही. आर्थिक व्यवहार तसेच आरोग्याबाबत त्यांनी या काळात सावध राहावे. 

तर मेष, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी हा बदल खूप शुभ ठरेल. नवरात्रीचा काळ त्यांना खूप लाभदायक ठरेल. चांगली बातमी ऐकायला मिळेल. करिअर-व्यवसायात प्रगती होऊ शकेल आणि आर्थिक स्थिती मजबूत होण्यासाठी हा काळ भरभराटीचा ठरेल. 

या सहा राशींबरोबरच अन्य राशीच्या लोकांनी नवरात्रीच्या काळात देवीची उपासना करावी. कोणत्याही कार्यसिद्धीसाठी प्रयत्नांना उपासनेची आणि उपासनेला प्रयत्नांची जोड लागतेच. म्हणून प्रयत्न सोडू नका, दुर्गा माता सर्वांच्या प्रयत्नांना नक्की यश देईल. 

Web Title: Chaitra Navratra 2022: People of 'these' zodiac sign will get huge benefits due to change of planet in Chaitra Navratri!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.