Chaitra Navratra 2022 :चैत्र नवमीला करा कुमारिका पूजन आणि मिळवा देवीचा कृपाशिर्वाद; देवी भागवतात दिले महत्त्व!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 11:58 AM2022-04-07T11:58:02+5:302022-04-07T11:58:29+5:30

Chaitra Navratra 2022 : तान्ह्या बाळापासून दहा वर्षांच्या कुमारिकेपर्यंत देवीच्या कन्या रूपाची पूजा केली जाते. त्याचे फलित काय मिळते तेही जाणून घेऊ. 

Chaitra Navratra 2022: Worship Kumarika Puja on Chaitra Navami and get the blessings of Goddess; Importance given to Goddess Bhagwat! | Chaitra Navratra 2022 :चैत्र नवमीला करा कुमारिका पूजन आणि मिळवा देवीचा कृपाशिर्वाद; देवी भागवतात दिले महत्त्व!

Chaitra Navratra 2022 :चैत्र नवमीला करा कुमारिका पूजन आणि मिळवा देवीचा कृपाशिर्वाद; देवी भागवतात दिले महत्त्व!

Next

नवरात्रीमध्ये कन्यापूजेला खूप महत्त्व आहे. शास्त्रानुसार नवरात्रीमध्ये कन्येची पूजा केल्याने देवी दुर्गा लवकर प्रसन्न होते. कारण कुमारिकांना देवीचे रूप मानले जाते. त्यामुळे नवरात्रीच्या दिवसांत विशेषतः पंचमी, अष्टमी किंवा नवमी या तिथीला कुमारिकांना घरी आमंत्रण देऊन त्यांची पूजा केली जाते. या पूजेत देवीस्वरूप असलेल्या मुलींचे प्रथम पाय धुवून त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढले जाते. त्यांना गजरा किंवा फुल देऊन स्वागत केले जाते. त्यानंतर मुलींना आवडेल अशी भेटवस्तू देऊन सत्कार केला जातो आणि त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले जातात. 

कुमारिकेचीच पूजा का? 

देवी भागवतात म्हटले आहे, की दोन ते दहा वर्षांच्या मुलींना अर्थात वयात न आलेल्या मुलींना कुमारिका म्हणून बोलवावे. तीन वर्षाच्या मुलीला त्रिमुर्ती, चार वर्षाच्या मुलीला कल्याणी, पाच वर्षाच्या मुलीला रोहिणी, सहा वर्षाच्या मुलीला कालिका, आठ वर्षांच्या मुलीला शांभवी, नऊ वर्षांच्या मुलीला दुर्गा आणि दहा वर्षाच्या मुलीला सुभद्रा असे नवकन्यारूप मानले जाते. वयात आल्यानंतर मुलींमध्ये राग, लोभ, विकार, वासना यांची वृद्धी होऊ लागते. परंतु कुमारिका अल्लड, निरागस आणि निर्विकार असतात. बालरूपात आपण देव पाहतो. म्हणून कुमारिकांना पूजेचा मान दिला जाता़े कुमारिका पूजनाने धन, दीर्घायुषय, बळ वृद्धिंगत होते. तसेच त्यांच्या शुभाशिर्वादाने घरात सुख, समृद्धी, शांती येते.

दहा वर्षांपर्यंतच्या कुमारिकांना आपण कुमारिका पूजनासाठी बोलावतो. तान्ह्या बाळापासून दहा वर्षांच्या कुमारिकेपर्यंत देवीच्या कन्या रूपाची पूजा केली जाते. त्याचे फलित काय मिळते तेही जाणून घेऊ. 

दोन वर्षाची कुमारिका म्हणून ओळखली जाते. हिचे पूजन केल्याने दारिद्र्य दूर होतं.
तीन वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपात असते. हिचे पूजन केल्याने सुख-समृद्धी नांदते.
चार वर्षाची कन्या कल्याणी असते. हिचे पूजन केल्याने घरात कल्याण होतं.
पाच वर्षाची कन्या रोहिणी रूपात असते. जी रोगमुक्त ठेवते.
सहा वर्षाची कन्या कालिका रूपात असते. हिचे पूजन केल्याने राजयोग प्राप्ती होते.
सात वर्षाची कन्या चंडिका या रूपात असते. ही ऐश्वर्य प्रदान करते.
आठ वर्षाची कन्या शांभवी रूपात असते. हिची पूजा केल्यास विजय प्राप्त होते.
नऊ वर्षाची कन्या दुर्गा देवीचा रूप असते. ही शत्रूंचा नाश करते.
दहा वर्षाची कन्या सुभद्रा रूपात असते. सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते.

कन्या पूजेचा शुभ मुहूर्त 

अष्टमी तिथि- ९ एप्रिल 

नवमी तिथि- १० एप्रिल 

सुकर्म योग - ९ एप्रिल रोजी सकाळी ११. २५  ते १०  एप्रिल रोजी दुपारी १२. ०४ मिनिटांपर्यंत 

सर्वार्थ सिद्धी योग- ८ एप्रिल रोजी दुपारी १२ पासून ९ एप्रिल सकाळी ६.०२ वाजेपर्यंत

अभिजीत मुहूर्त - ९ एप्रिल सकाळी ११. ५७ ते दुपारी १२.४८ पर्यंत.

Web Title: Chaitra Navratra 2022: Worship Kumarika Puja on Chaitra Navami and get the blessings of Goddess; Importance given to Goddess Bhagwat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.