Chaitra Navratri 2024: चैत्र गौर प्रसन्न व्हावी आणि तिचा आशीर्वाद मिळावा म्हणून ज्योतिष शास्त्रीय तोडगे जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 07:00 AM2024-04-11T07:00:00+5:302024-04-11T07:00:02+5:30
Chaitra Navratri 2024: ११ एप्रिल रोजी चैत्र गौर देवघरात स्वतंत्र जागी स्थानापन्न होईल, अक्षय्य तृतीयेपर्यंत तिच्या सेवेत कोणते उपचार करायला हवे ते जाणून घ्या!
चैत्र नवरात्री ९ एप्रिलपासून सुरू झालीअसून ती १७ एप्रिलपर्यंत चालणार आहे. हिंदू धर्मात या सणाला खूप महत्त्व आहे. या नऊ दिवसांमध्ये दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा विधीपूर्वक केली जाते. या नऊ दिवसांत दुर्गा मातेची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते. यासोबतच सुख, समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो. यासोबतच देवघरात अखंड ज्योत लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते. त्याचबरोबर ज्योतिष शास्त्रानुसार नवरात्रीच्या दिवसांमध्ये काही उपाय केल्यास दुर्गा मातेची कृपा कायम राहते. यासोबतच प्रत्येक कामात यश मिळण्यासोबतच दु:खापासून मुक्ती मिळते.
चैत्र नवरात्रीला हे उपाय करा
>> नवरात्रीच्या दिवशी देवीला किंवा देवीच्या नावे एखाद्या सुवासिनीला खणा-नारळाची ओटी भरा. देवीची मनोभावे पूजा करून आपल्या इप्सित कामात यश मिळू दे अशी प्रार्थना करा.
>> मनोकामना पूर्ण करण्यासाठी, देवीच्या देवळात जाऊन गजरा किंवा वेणी अर्पण करा. कुंकुमार्चन करा आणि प्रसादाचे कुंकू देवघरात आणून ठेवा.
>> कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी, नवरात्रीमध्ये यथाशक्ती दान करा. अन्न धान्य किंवा तयार भोजनाचे दान करून देवीची कृपादृष्टी मिळवू शकता. यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.
>> नवरात्रीत जोगवा मागण्याची पद्धत आहे. पाच घरांमध्ये जोगवा मागून त्यात मिळालेले धान्य शिजवून त्या अन्नाचा नैवेद्य दाखवा. जोगवा मागितल्यामुळे मनातला अहंकार गळून पडेल आणि देवीशी मनाने शरणागती पत्कराल.
>> नवरात्रीच्या काळात स्वस्तिक, हत्ती, कलश, दीपक, गरुड, कमळ, श्रीयंत्र इत्यादी सोने किंवा चांदीच्या शुभ वस्तू खरेदी करा. ते देवीच्या चरणी अर्पण करा आणि नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी ते उचलून गुलाबी किंवा लाल रंगाच्या रेशमी कपड्यात गुंडाळा आणि तिजोरीत ठेवा. यातून तुम्हाला आर्थिक फायदा होईल.
>> घरातील संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी नवरात्रीत दुर्गा सप्तशतीचे पठण करावे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढेल.
>> कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी नवरात्रीच्या दिवसात नवचंडीचा यज्ञ करावा. ते शक्य नसेल तर ज्या धार्मिक स्थळी हे यज्ञ केले जातात तिथे आर्थिक सहकार्य करावे, म्हणजे नवचंडीचे पुण्य लाभेल.