Chaitra Navratri 2025: तीन महिन्यात विवाह ठरावा म्हणून श्रीपंचमीला करा आंब्याच्या पानाचा 'हा' उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 15:40 IST2025-04-01T15:39:41+5:302025-04-01T15:40:21+5:30
Chaitra Navratri 2025: गुढीपाडव्याला चैत्र नवरात्र सुरु झाली असून २ एप्रिल रोही श्रीपंचमी आहे, या मुहूर्तावर विवाह लवकर ठराव म्हणून देवी भागवतात दिलेला उपाय करा.

Chaitra Navratri 2025: तीन महिन्यात विवाह ठरावा म्हणून श्रीपंचमीला करा आंब्याच्या पानाचा 'हा' उपाय!
३० मार्च २०२५ रोजी गुढीपाडव्याला (Gudi Padwa 2025) हिंदू नववर्षाची सुरुवात झाली आणि त्याबरोबरच चैत्र नवरात्रही (Chaitra Navratri 2025) सुरु झाले. श्रीराम नवमीला (Ram Navami 2025) हे नवरात्र संपणार आहे. शारदीय नवरात्रीप्रमाणे शाकंबरी आणि चैत्र नवरात्रदेखील महत्त्वपूर्ण असते. नवरात्रीचा प्रत्येक दिवस हा शक्तिपूजेचा मानला जातो, त्यामुळे दर दिवसाला वेगळे महत्त्व आहे.
२ एप्रिल रोजी श्रीपंचमी आहे. चैत्र नवरात्रीची पंचमी तिथी या नावे ओळखली जाते. श्री अर्थात लक्ष्मी, तिची तिथी म्हणून श्रीपंचमी. या मुहूर्तावर लक्ष्मीउपासक तिची पूजा अर्चा करतीलच, शिवाय जे विवाहेच्छुक आहेत, त्यांच्यासाठी देवी भागवत या ग्रंथामध्ये एक साधा सोपा उपायही दिला आहे. त्याबद्दल जाणून घेऊ. हा उपाय केला असता येत्या तीन महिन्यात विवाह ठरतो असा भाविकांचा आजवरचा अनुभव आहे. तो उपाय कोणता ते पाहू.
लवकर विवाह ठरण्याचा उपाय (Mango Leaf Remedy to get Married withing three months)
यासाठी आपल्याला आम्रपल्लव अर्थात आंब्याचे पान लागणार आहे. विवाहेच्छुक असणाऱ्या मुलाने किंवा मुलीने श्रीपंचमीच्या दिवशी म्हणजेच २ एप्रिल रोजी आंब्याचे एक पान घेऊन त्यावर बोटाला पाणी लावून हळदीचे स्वस्तिक रेखाटायचे आहे. त्याबाजूलाच ओल्या बोटाने कुंकवाचे स्वस्तिक रेखाटायचे आहे. त्यानंतर अक्षता, म्हणजेच तांदूळ कुंकवाचा बुडवून हळदीच्या स्वस्तिकावर वाहायचे आहेत आणि हळदीत बुडवलेल्या अक्षता कुंकवाच्या स्वस्तिकावर वाहायचा आहेत. त्यानंतर आंब्याचे पान तळहातावर ठेवून नाव आणि गोत्र बोलून ते पान कडूलिंबाच्या झाडाखाली ठेवले जाते. हा उपाय केला असता तीन महिन्यात विवाह ठरतो असे म्हटले आहे.
Astro Tips: श्रीमंत व्हायचंय? सलग ४५ दिवस घराच्या दक्षिण दिशेला करा 'हा' उपाय!
आंब्याचे पान असो नाहीतर कडुलिंबाचे झाड चैत्र पाडव्याला म्हणजेच गुढी पाडव्याला आपला या दोन्ही झाडांशी संबंध येतोच, हा संबंध दृढ व्हावा या हेतूनेही निसर्गाच्या सान्निध्यात रमण्याचा, ताण घालवण्याचा आणि खुल्या मनाने आगामी काळाचे स्वागत करण्याचा सुप्त सल्ला जणू काही या माध्यमातून दिला आहे.
त्यामुळे २ एप्रिल रोजी हा सोपा उपाय करून बघा, देवीचा आशीर्वाद घ्या आणि शारदीय नवरात्रीच्या आत लग्नाची सुपारी घरी फुटू दे अशी देवीला मनोभावे प्रार्थना करा.