चाणक्यनीती : तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर 'या' तीन गोष्टी आयुष्यातून वगळाव्या लागतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 01:47 PM2022-03-02T13:47:26+5:302022-03-02T13:47:46+5:30

चांगले आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी काही गोष्टींचा अवलंब करणे आवश्यक आहे. आपणही त्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करू. 

Chanakyaniti: If you want to be successful, you have to get rid of these three things in life! | चाणक्यनीती : तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर 'या' तीन गोष्टी आयुष्यातून वगळाव्या लागतील!

चाणक्यनीती : तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर 'या' तीन गोष्टी आयुष्यातून वगळाव्या लागतील!

googlenewsNext

समर्थ रामदासस्वामी सांगतात, ' जो दुसऱ्यांवरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला!' अर्थात परावलंबी आयुष्य न जगता स्वावलंबी आयुष्य जगणे ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. यशस्वी लोकांकडे पाहिले तर त्यांच्या जीवनावरून आपल्याला हाच आदर्श घेता येईल, की ते लहानात लहान गोष्टी स्वतः करणे पसंत करतात अन्यथा शिकून घेतात. आचार्य चाणक्य सांगतात, तुम्हालाही यशस्वी व्हायचे असेल तर पुढील तीन गोष्टींचा सखोल विचार करा. या गोष्टी तुमच्या यशाला तारक ठरतील आणि नाही शिकलात तर मारक ठरतील!

चांगले आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी काही गोष्टींचा अवलंब करणे आवश्यक आहे. असेही म्हणता येईल की यशस्वी लोकांमध्ये काही गोष्टी साम्य असतात. या गोष्टी किंवा गुण त्यांना यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. आपणही त्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करू. 

प्रत्येक माणसाला आयुष्यात सन्मान मिळावा असे वाटते. पण तो अशा काही चुका करतो ज्या घोर अपमानाचे कारण बनतात. त्यामुळे अशा गोष्टींपासून दूर राहणे चांगले. आज आपण अशाच ३ गोष्टींबद्दल जाणून घेऊया ज्यामुळे अपमान होतो.

इतरांवर अवलंबून राहणे: असे लोक जे नेहमी इतरांवर अवलंबून असतात, त्यांचा कधी ना कधी अपमान होतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी इतरांवर अवलंबून राहण्याची सवय सोडा. मेहनती व्हा आणि पुढे येऊन जबाबदारी घ्या. मेहनती, आत्मविश्वासू आणि स्वावलंबी लोकांना नेहमीच सर्वत्र सन्मान मिळतो.

अज्ञान : अज्ञानामुळे अपमान होतो. तर ज्ञानी माणसाला सर्वत्र आदर मिळतो. म्हणून जास्तीत जास्त ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा आणि अज्ञानाचा अंधार तुमच्या जीवनातून दूर करा.

राग: रागावलेला माणूस कधीकधी संयम गमावतो आणि अशा गोष्टी करतो ज्यामुळे त्याची प्रतिमा खराब होते. याशिवाय रागाच्या भरात बोललेले कटू शब्द माणसाचे अनेक शत्रू निर्माण करतात, ते शत्रू अपमानाचा बदला घेतात. रागाने माणसाला अनेक प्रकारचे नुकसान सहन करावे लागते. म्हणून शक्य तेवढे रागावर नियंत्रण मिळवा. 

रतन टाटा, धीरूभाई अंबानी, अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, असीम प्रेमजी, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, सुधा मूर्ती यासारख्या व्यक्तिमत्त्वांकडून प्रेरणा घ्या आणि आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या गोष्टी वगळून चांगल्या गोष्टींना, सवयींना आयुष्यात स्थान द्या. तुमचाही उत्कर्ष होईल. 

Web Title: Chanakyaniti: If you want to be successful, you have to get rid of these three things in life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.