Chanakyaniti: अपयशाला यशात बदलायचे असेल तर चाणक्यनीतीत सांगितलेले उपाय करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 12:59 PM2024-03-14T12:59:55+5:302024-03-14T13:00:25+5:30

Chanakyaniti: अपयशाने खचून न जाता कम्बर कसून नव्या उमेदीने उभे राहणारे तुम्ही असाल तर आचार्य चाणक्य यांचा कानमंत्र खास तुमच्यासाठी!

Chanakyaniti: If you want to turn failure into success, take the measures mentioned in Chanakyaniti! | Chanakyaniti: अपयशाला यशात बदलायचे असेल तर चाणक्यनीतीत सांगितलेले उपाय करा!

Chanakyaniti: अपयशाला यशात बदलायचे असेल तर चाणक्यनीतीत सांगितलेले उपाय करा!

आचार्य चाणक्य हे भारतातील सर्वोत्तम विद्वानांपैकी एक होते. चाणक्य यांनी लिहिलेली चाणक्य नीति ही सर्वात लोकप्रिय धोरणांपैकी एक मानली जाते. मनुष्यासाठी आदर्श जीवनाचा वस्तुपाठ आचार्यांनी घालून दिला आहे. छोट्यात छोट्या गोष्टींवर विचार करून नीतिमत्तेच्या गोष्टी सांगितल्या आहेत. यशापयशाचा विचार करता आचार्यांनी त्यावरही तोडगे दिले आहेत. अशा परिस्थितीत आपण चाणक्य नीतीच्या अशा काही उपयुक्त गोष्टी वाचूया ज्याद्वारे व्यक्ती जीवनात प्रगती करू शकते.

आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यांचा अवलंब करून कोणतीही व्यक्ती आपल्या जीवनात यश मिळवू शकते. त्यातील काही निवडक विषय पाहता अशा परिस्थितीत चाणक्यजींनी सांगितलेल्या काही गोष्टी जीवनात अवलंबून तुम्ही तुमच्या अपयशाचे यशात रूपांतर करू शकता.

आचार्य चाणक्य म्हणतात की यशस्वी होण्याचे पहिले सूत्र कठोर परिश्रम आहे. जर एखादी व्यक्ती आपल्या कामाप्रती प्रामाणिक असेल आणि कठोर परिश्रम करत असेल तर त्याच्यावर देवी लक्ष्मी आणि धनाची देवता भगवान कुबेर यांची कृपा राहते. त्यामुळे आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण मेहनतीने पार पाडणे गरजेचे आहे आणि प्रयत्नांना उपासनेचे पाठबळ देणे आवश्यक आहे. 

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, कोणत्याही व्यक्तीची कृती त्याच्या चांगल्या किंवा वाईट काळाचे कारण बनते. म्हणून माणसाने नेहमी सत्कर्म करत राहावे. तसेच, एखाद्या व्यक्तीने त्याच्या पदाचा आणि पैशाचा कधीही गर्व करू नये.

आचार्य चाणक्य यांनी आपल्या निती शास्त्रामध्ये सांगितले आहे की ज्या लोकांचे वागणे आणि बोलणे चांगले असते त्यांना जीवनात नक्कीच यश मिळते. या दोन्ही गोष्टी माणसाच्या यशाच्या मार्गात मोठी भूमिका बजावू शकतात. माणसाने आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे, तरच तो जीवनात यश मिळवू शकतो.

एखाद्या व्यक्तीला सुरुवातीच्या काळात यश मिळते हे फारच कमी आहे. ध्येय मोठे असताना सुरुवातीला अनेक अपयशांना सामोरे जावे लागते. या विषयाबाबत चाणक्य म्हणतात की, अपयशाची भीती ही आपल्या कल्पनेपेक्षा अधिक नसते. जर तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करायचे असेल तर तुम्ही कठोर पावले उचलण्यास घाबरू नका.

Web Title: Chanakyaniti: If you want to turn failure into success, take the measures mentioned in Chanakyaniti!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.