तुमची साडेसाती सुरू आहे? ‘हे’ प्रभावी स्तोत्र तारेल, शनीची कृपा लाभेल; सुख-समृद्धी वाढेल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 11:58 AM2024-07-13T11:58:10+5:302024-07-13T11:58:48+5:30
Shani Chalisa For Sade Sati: शनीचे शुभाशीर्वाद लाभावेत, यासाठी साडेसाती सुरू असलेल्यांनी हे स्तोत्र आवर्जून म्हणावे, असे सांगितले जाते.
Shani Chalisa For Sade Sati: ज्योतिषशास्त्रात शनी हा नवग्रहांचा न्यायाधीश मानला जातो. शनी हा कर्मकारक ग्रह मानला जातो. शनीची साडेसाती प्रभावी मानली जाते. साडेसाती हा अनन्यसाधारण महत्त्व असणारा योग आहे. साडेसातीचा विचार हा जन्मकुंडलीतील चंद्र व गोचरी शनि यांच्याशी निगडित आहे. आताच्या घडीला मकर, कुंभ आणि मीन राशीची साडेसाती सुरू आहे. साडेसाती काळात शनीचा प्रतिकूल प्रभाव कमी व्हावा, यासाठी अनेक उपाय, तोडगे सांगितले जातात. त्यापैकी शनीचे हे एक स्तोत्र प्रभावी मानले जाते. याचे पठण किंवा श्रवण करणे शुभ फलदायी मानले जाते.
साडेसाती हा अनन्यसाधारण महत्त्व असणारा योग आहे. साडेसातीचा विचार हा जन्मकुंडलीतील चंद्र व गोचरी शनि यांच्याशी निगडित आहे. विद्यमान स्थितीत शनी कुंभ राशीत आहे. त्यामुळे मकर राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे, तर कुंभ राशीचा साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे. मीन राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. पुढील वर्षी २०२५ मध्ये शनी मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर मकर राशीची साडेसाती संपेल, तर मेष राशीची साडेसाती सुरू होईल.
करावे तसे भरावे या उक्तीनुसार शनी आपल्या कर्माचे फळ देत असतो, असे सांगितले जाते. शनी हा कर्मप्रधान ग्रह मानला गेला असल्यामुळे या कालावधीत आपले कर्म चांगले ठेवण्याचा सल्ला दिला जातो. शनिवार हा दिवस शनीचा मानला जातो. त्यामुळे या दिवशी शनीची निगडीत गोष्टी करणे अधिक शुभ फलदायी मानले जाते. साडेसाती असो वा नसो शनीची कृपा मिळण्यासाठी या दिवशी शनी मंदिरात जाणे, पिंपळाच्या झाडापाशी दिवा लावणे यासह शनी मंत्रांचा जप, स्तोत्र पठण करण्याचा सल्ला दिला जातो. शनीचा शुभाशिर्वाद लाभण्यासाठी शनी चालिसा पठण करावी, असे सांगितले जाते. हे स्तोत्र अत्यंत प्रभावी मानले जाते. ज्यांची साडेसाती सुरू आहे, त्यांनी तर शनी चालिसा आवर्जून पठण किंवा श्रवण करावी, असे केल्याने शनी दोष, शनीचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत होऊ शकते. तसेच कुंडलीतील शनी सकारात्मक परिणामकारक होऊ शकतो, असे सांगितले जाते.
||श्री शनि चालीसा||
दोहा
जय-जय श्री शनिदेव प्रभु, सुनहु विनय महराज।
करहुं कृपा हे रवि तनय, राखहु जन की लाज।।
चौपाई
जयति-जयति शनिदेव दयाला।
करत सदा भक्तन प्रतिपाला।।
चारि भुजा तन श्याम विराजै।
माथे रतन मुकुट छवि छाजै।।
परम विशाल मनोहर भाला।
टेढ़ी दृष्टि भृकुटि विकराला।।
कुण्डल श्रवण चमाचम चमकै।
हिये माल मुक्तन मणि दमकै।।
कर में गदा त्रिशूल कुठारा।
पल विच करैं अरिहिं संहारा।।
पिंगल कृष्णो छाया नन्दन।
यम कोणस्थ रौद्र दुःख भंजन।।
सौरि मन्द शनी दश नामा।
भानु पुत्रा पूजहिं सब कामा।।
जापर प्रभु प्रसन्न हों जाहीं।
रंकहु राउ करें क्षण माहीं।।
पर्वतहूं तृण होई निहारत।
तृणहंू को पर्वत करि डारत।।
राज मिलत बन रामहि दीन्हा।
कैकइहूं की मति हरि लीन्हा।।
बनहूं में मृग कपट दिखाई।
मात जानकी गई चुराई।।
लषणहि शक्ति बिकल करि डारा।
मचि गयो दल में हाहाकारा।।
दियो कीट करि कंचन लंका।
बजि बजरंग वीर को डंका।।
नृप विक्रम पर जब पगु धारा।
चित्रा मयूर निगलि गै हारा।।
हार नौलखा लाग्यो चोरी।
हाथ पैर डरवायो तोरी।।
भारी दशा निकृष्ट दिखाओ।
तेलिहुं घर कोल्हू चलवायौ।।
विनय राग दीपक महं कीन्हो।
तब प्रसन्न प्रभु ह्नै सुख दीन्हों।।
हरिशचन्द्रहुं नृप नारि बिकानी।
आपहुं भरे डोम घर पानी।।
वैसे नल पर दशा सिरानी।
भूंजी मीन कूद गई पानी।।
श्री शकंरहि गहो जब जाई।
पारवती को सती कराई।।
तनि बिलोकत ही करि रीसा।
नभ उड़ि गयो गौरि सुत सीसा।।
पाण्डव पर ह्नै दशा तुम्हारी।
बची द्रोपदी होति उघारी।।
कौरव की भी गति मति मारी।
युद्ध महाभारत करि डारी।।
रवि कहं मुख महं धरि तत्काला।
लेकर कूदि पर्यो पाताला।।
शेष देव लखि विनती लाई।
रवि को मुख ते दियो छुड़ाई।।
वाहन प्रभु के सात सुजाना।
गज दिग्गज गर्दभ मृग स्वाना।।
जम्बुक सिंह आदि नख धारी।
सो फल ज्योतिष कहत पुकारी।।
गज वाहन लक्ष्मी गृह आवैं।
हय ते सुख सम्पत्ति उपजावैं।।
गर्दभहानि करै बहु काजा।
सिंह सिद्धकर राज समाजा।।
जम्बुक बुद्धि नष्ट करि डारै।
मृग दे कष्ट प्राण संहारै।।
जब आवहिं प्रभु स्वान सवारी।
चोरी आदि होय डर भारी।।
तैसहिं चारि चरण यह नामा।
स्वर्ण लोह चांदी अरु ताम्बा।।
लोह चरण पर जब प्रभु आवैं।
धन सम्पत्ति नष्ट करावैं।।
समता ताम्र रजत शुभकारी।
स्वर्ण सर्व सुख मंगल भारी।।
जो यह शनि चरित्रा नित गावै।
कबहुं न दशा निकृष्ट सतावै।।
अद्भुत नाथ दिखावैं लीला।
करैं शत्राु के नशि बल ढीला।।
जो पंडित सुयोग्य बुलवाई।
विधिवत शनि ग्रह शान्ति कराई।।
पीपल जल शनि-दिवस चढ़ावत।
दीप दान दै बहु सुख पावत।।
कहत राम सुन्दर प्रभु दासा।
शनि सुमिरत सुख होत प्रकाशा।।
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.