समस्या, अडचणींनी ग्रासलेय? ‘हा’ स्वामी मंत्र ठरेल ‘तारक’; एकदा म्हणून तर पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 01:33 PM2023-06-01T13:33:50+5:302023-06-01T13:35:53+5:30

Swami Samarth Tarak Mantra: माणूस म्हटला की संघर्ष आला. मात्र, लढण्याचे बळ मिळण्यासाठी नामस्मरण, आराधना उपयुक्त ठरू शकते, असे म्हटले जाते. जाणून घ्या...

chant swami samarth tarak mantra and get energy strength to face problems | समस्या, अडचणींनी ग्रासलेय? ‘हा’ स्वामी मंत्र ठरेल ‘तारक’; एकदा म्हणून तर पाहा

समस्या, अडचणींनी ग्रासलेय? ‘हा’ स्वामी मंत्र ठरेल ‘तारक’; एकदा म्हणून तर पाहा

googlenewsNext

Swami Samarth Tarak Mantra: सुखानंतर दुःख आणि दुखःनंतर सुख हे जीवनचक्र आयुष्यभर सुरूच असते. त्यापासून कुणाचीही सुटका झालेली नाही. मनुष्य जन्म म्हटला की सगळे भोग हे आलेच. अगदी देवाचीही त्यापासून सुटका झालेली नाही. मग मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम असोत वा श्रीकृष्ण. माणसाला संघर्ष चुकलेला नाही. मात्र, त्यातून बाहेर येण्यासाठी समस्यांचे निवारण करण्यासाठी माणूस सतत कार्यरत असतो. त्याला एक पाठबळ मिळण्यासाठी आराध्य देवाची उपासना, आराधना, नामस्मरण करावे, असे म्हटले जाते. 

श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज श्रीदत्तात्रयांचे अवतार मानले जातात, हे अगदी सर्वश्रुत आहे. श्री स्वामींची शिकवण म्हणजे त्यांनी वेळोवेळी प्रत्यक्षात कथन केलेल्या सांकेतिक शब्दांचे तात्पर्य होय. भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे, हे स्वामी वचन आत्मविश्वास देते, बळ देते, असा अनेकांचा अनुभव आहे. तर अशक्यही शक्य करतील स्वामी, अशी स्वामी भक्तांची अनन्य श्रद्धा आहे. केवळ 'श्री स्वामी समर्थ' असा नामोच्चार केला, तरी एक वेगळी सकारात्मकता मिळते, असा अनेकांचा अनुभव आहे. समस्या, अडचणीत स्वामी समर्थांचा तारक मंत्र प्रभावी ठरू शकतो. समस्या दूर झाल्या नाहीत, तरी त्याच्याशी लढण्याचे बळ, शक्ती मिळू शकते, असे सांगितले जाते. 

स्वामी समर्थांचा प्रभावी तारक मंत्र

निःशंक हो, निर्भय हो, मना रे
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे
अतर्क्य अवधूत हे स्मर्तू गामी
अशक्यही शक्य करतील स्वामी ।।१।।

जिथे स्वामी पाय तिथे न्युन काय
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय
आज्ञेविणा काळ ना नेई त्याला
परलोकही ना भिती तयाला ।।२।।

उगाची भितोसी भय पळू दे
जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे
जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा
नको घाबरु तू असे बाळ त्यांचा ।।३।।

खरा होई जागा तू श्रद्धेसहित
कसा होशी त्याविण तू स्वामीभक्त
कितीदा दिला बोल त्यांनीच हात
नको डगमगू स्वामी देतील साथ ।।४।।

विभूती नमन नाम ध्यानादी तिर्थ
स्वमीच या पंच प्राणाभृतात
हे तिर्थ घे, आठवी रे प्रचिती
न सोडेल स्वामी ज्या घेई हाती ।।५।।

।।श्री स्वामी समर्थ।।

Web Title: chant swami samarth tarak mantra and get energy strength to face problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.