Chaturmas 2021: कधी सुरू होणार चातुर्मास? पाहा, सण-उत्सवांची रेलचेल, महत्त्व व मान्यता 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 12:26 PM2021-07-13T12:26:01+5:302021-07-13T12:27:18+5:30

Chaturmas 2021 Date: यंदाचा चातुर्मास कधी सुरू होणार? या कालावधीत येणारे प्रमुख सण-उत्सव, व्रत-वैकल्ये, महत्त्व आणि मान्यता जाणून घ्या...

chaturmas 2021 dates important vrat and festivals and know significance of chaturmas period | Chaturmas 2021: कधी सुरू होणार चातुर्मास? पाहा, सण-उत्सवांची रेलचेल, महत्त्व व मान्यता 

Chaturmas 2021: कधी सुरू होणार चातुर्मास? पाहा, सण-उत्सवांची रेलचेल, महत्त्व व मान्यता 

googlenewsNext

भारतीय संस्कृती ही वैविध्याने नटलेली पाहायला मिळते. मराठी महिन्यात येणाऱ्या सण-उत्सवांना धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व तर आहेच, शिवाय शास्त्रीयदृष्ट्याही फार महत्त्व आहे. मराठी वर्षातील सर्वांत महत्त्वाचा काळ म्हणजे चातुर्मास. आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीपासून ते कार्तिक महिन्याच्या शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीपर्यंतचा काळ चातुर्मास म्हणून ओळखला जातो. या कालावधीत अनेकविध सण-उत्सव, व्रत-वैकल्ये साजरी केली जातात. या चातुर्मास कालावधीत श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक असे चार महिने येतात. यंदाच्या वर्षी मंगळवार, २० जुलै २०२१ पासून चातुर्मासाला सुरुवात होईल आणि सोमवार, १५ नोव्हेंबर २०२१ रोजी चातुर्मासाची समाप्ती होईल. चातुर्मासात येणारे महत्त्वाचे सण-उत्सव आणि मान्यता जाणून घेऊया... (Chaturmas 2021 Dates)

जगन्नाथ रथयात्रा आणि मंदिराची ‘ही’ १० अद्भूत रहस्य माहितीयेत का? जाणून घ्या

आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत अथवा आषाढ पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत होणाऱ्या चार मासांच्या काळास ‘चातुर्मास’, असे म्हणतात. आषाढ शुद्ध एकादशीस ‘शयनी एकादशी’ म्हटले आहे; कारण ‘त्या दिवशी देव झोपी जातात’, अशी समजूत असल्याची मान्यता आहे. कार्तिक शुद्ध एकादशीस देव झोप घेऊन उठतात; म्हणून तिला ‘प्रबोधिनी किंवा देवोत्थानी एकादशी’ असे म्हणतात. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार या काळात व्रते केल्याने सर्व पाप नष्ट होते, अशी श्रद्धा आहे. सत्कर्म करणे, सत्कथा ऐकणे, सत्पुरुषांची सेवा, संतदर्शन, दानधर्म इत्यादी गोष्टी चातुर्मासात अत्यंत कल्याणकारी असतात, असा समज आहे. चातुर्मासात विवाहमुहूर्त नसतात. तसेच अनेक ठिकाणी चातुर्मासाच्या प्रारंभी काही ना काही संकल्प करून तो सिद्धीस नेण्याचा प्रयत्न केला जातो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 

शास्त्र सांगते की 'या' पाच गोष्टी हिंदूंनी पाळायला हव्या!

चातुर्मासात येणारे महत्त्वाचे सण-उत्सव

चातुर्मासातील पहिला महिना म्हणजे श्रावण. श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाला काही नाही महत्त्व असल्याचे पाहायला मिळते. तसेच नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी असे सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. तसेच याच महिन्यात जिवती पूजन केले जाते. यानंतर येणाऱ्या भाद्रपद महिन्यात हरतालिका पूजन करून मोठ्या भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यातील वद्य पक्षात पितरांचे स्मरण केले जाते. हा पंधरा दिवसांचा कालावधी पितृ पंधरवडा म्हणून ओळखला जातो.

एका वर्षी गणपती बसवला व दुसरे वर्षी बसवला नाही तर चालेल का?

नवरात्र, दीपावली आणि चातुर्मास सांगता

अनेक हजार वर्षांपूर्वी मराठी नववर्ष हे अश्विन महिन्यापासून सुरू व्हायचे, अशी मान्यता आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या कालावधीत नवरात्र साजरे केले जाते. अश्विन शुद्ध दशमी विजयादशमी म्हणजेच दसरा म्हणून साजरी केली जाते. यानंतर दीपोत्सव साजरा केला जातो आणि कार्तिक शुद्ध एकादशीला चातुर्मासाची समाप्ती होते. 
 

Web Title: chaturmas 2021 dates important vrat and festivals and know significance of chaturmas period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.