Chaturmas Ashadhi Sankashti Chaturthi 2024 चातुर्मासातील संकष्टी चतुर्थी: बाप्पााला ‘ही’ एक गोष्ट अर्पण करा; पुण्यफल, अपार लाभ मिळवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 10:03 AM2024-07-23T10:03:28+5:302024-07-23T10:08:22+5:30

Chaturmas Ashadhi Sankashti Chaturthi July 2024: चातुर्मासातील पहिली आषाढ संकष्ट चतुर्थी बुधवारी येत आहे. हा एक उपाय आवर्जून करावा, असे सांगितले जाते.

chaturmas ashadhi sankashti chaturthi july 2024 ganesh puja wednesday importance offer this things in budhwar ganpati pujan and get prosperity | Chaturmas Ashadhi Sankashti Chaturthi 2024 चातुर्मासातील संकष्टी चतुर्थी: बाप्पााला ‘ही’ एक गोष्ट अर्पण करा; पुण्यफल, अपार लाभ मिळवा!

Chaturmas Ashadhi Sankashti Chaturthi 2024 चातुर्मासातील संकष्टी चतुर्थी: बाप्पााला ‘ही’ एक गोष्ट अर्पण करा; पुण्यफल, अपार लाभ मिळवा!

Chaturmas Ashadhi Sankashti Chaturthi July 2024: आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू झाला आहे. गुरुपौर्णिमेनंतर आता संकष्ट चतुर्थी आहे. आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही चातुर्मासातील पहिली संकष्टी चतुर्थी आहे. ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून आला होता. तर आषाढ महिन्यातील विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून आला होता. आषाढ महिन्यातील संकष्ट चतुर्थी बुधवार, २४ जुलै २०२४ रोजी आहे. बुधवारी संकष्टी येणे आणि त्यादिवशी गणपती पूजन करणे हेही विशेष मानले गेले आहे.

प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणाही करू शकते. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत! तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोड-धोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे.

सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ संकष्ट चतुर्थीचे व्रत

गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. संकष्ट चतुर्थीचे व्रत फार प्राचीन आहे. हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात निष्ठेने केले जाते. यातून या व्रताची थोरवी दिसून येते. कोट्यवधी गणेश भक्त या दिवशी उपवास करतात. या व्रताचरणामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, असे मानतात. धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनामुळे चातुर्मासातील पहिल्या आषाढ चतुर्थीला इच्छा असूनही व्रताचरण करता येईलच असे नाही. त्यामुळे या दिवशी बाकी काही जमले नाही, तरी गणपती बाप्पाला एक गोष्ट आवर्जुन अर्पण करावी, असे सांगितले जाते. 

बुधवारी गणेश पूजन

महादेव आणि पार्वती देवींचा पुत्र गणेश प्रथमेश मानला गेला आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात करताना प्रथम गणपती स्मरण केले जाते, हे सर्वश्रुत आहे. साधारणपणे मंगळवारी गणपतीचे विशेष पूजन, नामस्मरण करण्याला प्राधान्य दिले जाते. मात्र, बुधवारी केलेल्या विशेष गणपती पूजन, भजन, नामस्मरण यालाही अनन्य साधारण महत्त्व आहे. 

बुधवारी बाप्पाचे नामस्मरण लाभदायक

ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला वाणी, वाणिज्य, लेखन, कायदा आणि गणित यांचे कारक मानले गेले आहे. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह कमकुवत असेल, तर बुधवारी गणपती बाप्पाची पूजा, नामस्मरण करणे लाभदायक ठरते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. गणपतीला प्रिय असलेल्या वस्तू अर्पण केल्याने बाप्पा प्रसन्न होतो, असे मानले जाते. 

बुधवारी बाप्पाचा आवडता नैवेद्य करा अर्पण

गणपती पूजनानंतर गणपती बाप्पाला आवडणारे जास्वदाचे एखादे फूल वाहावे आणि लाडू किंवा मोदक यांचा नैवेद्य दाखवावा. लाडू किंवा मोदक नसतील, तर गोडाचा नैवेद्य दाखवावा, असे सांगितले जाते. गणपती बाप्पाला आवडणाऱ्या वस्तू, गोष्टी अर्पण केल्यास ते भाविकांसाठी शुभलाभदायक ठरू शकते, असे सांगितले जाते. तसेच गणपतीचा ‘ॐ गं  गणपतये नम:’ हा मंत्र १०८ वेळा किंवा जितका शक्य असेल, तितक्या वेळा म्हणावा, असे म्हटले जाते.

बुधवारी दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी

बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले गेले आहे. या दिवशी २१ दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख-समृद्धी आणि बुद्धीप्रदान करतात, असे सांगितले जाते. धार्मिक पुराणांमध्ये गणपतीला बुद्धीचा देवता मानले गेले आहे. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 
 

Web Title: chaturmas ashadhi sankashti chaturthi july 2024 ganesh puja wednesday importance offer this things in budhwar ganpati pujan and get prosperity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.