आधी स्वत:ला तपासावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 02:09 AM2020-06-16T02:09:58+5:302020-06-16T02:10:13+5:30

ईश्वराच्या कृपेइतकीच तळमळ समाजसेवेच्या व्रताची अंत:करणात असावी लागते. तेव्हा समाजातील ईश्वर आपल्यावर प्रसन्न होईल.

Check yourself first | आधी स्वत:ला तपासावे

आधी स्वत:ला तपासावे

googlenewsNext

- मोहनबुवा रामदासी

एक भक्त होता. तो प.पू. गोंदवलेकर महाराजांकडे गेला आणि म्हणाला ‘महाराज! हा समाज सुधारला पाहिजे हो! ही समाजाची दु:ख वेदना पहावत नाहीत हो! आपणच काहीतरी करा.’ प.पू. महाराजांनी त्याचे ते आवेशपुर्व बोलणं ऐकले आणि एवढेच म्हणाले, ‘समाजातील दु:खे योग्य वेळी कमी होतीलच. पण समाजातील ही दु:खे तुला खरेच कमी व्हावीत असे वाटत असेल तर तू तुझ्या दु:खाची भर त्यात टाकू नकोस...’ म्हणून यासाठी समर्थही म्हणतात ‘पहावे आपणासी आपण। या नाव ज्ञान।’ कोणत्याही समाजसुधारणेचा मूळ ज्ञानाचा अंकूर प्रत्येकाच्या अंत:करणात असतो. त्याचे संवर्धन विवेकसंपन्नतेने करता येणे अवश्यक आहे. दुसऱ्याला तपासण्यातच माणूस स्वत:ची युक्ती, शक्ती आणि बुद्धी वाया घालवतो. समर्थांनी समाजसुधारणेचा संकल्प रामापुढे केला व सुरवात स्वत:पासून केली. ते म्हणतात
केल्याने होत आहे रे। आधी केलेची पाहीजे।
यत्न तो देव जाणावा। अंतरी धरता बरे।।
समाज सुधारणेसाठी समर्थांचे खूप बोलके विचार पहा.
शरीर परोपकारी लावावे। बहुतांचे कार्यास यावे।
उणे पडो नेदावे। कोणी एकाचे।
आडले जाकसले जाणावे। यथानुशक्ती कामास यावे।
मृदूवचने बोलीत जावे। कोणी एकासी।।
दुसºयाच्या दु:खे दुखवावे। परसंतोषे सुखी व्हावे।
प्राणीमात्रास मेळवून घ्यावे। बºया शब्दे।।
ही समर्थांची समाजसेवेची गीता आहे. म्हणून पंपू गोंदवलेकर महाराजही म्हणतात : ज्याने समाजसेवेचे व्रत घेतले असेल त्याने स्वत:भोवती एक प्रदक्षिणा घालावी. समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या अंत:करणात त्या रामरायाचेच अस्तित्व आहे, या श्रद्धेने समाजसेवा करावी.
समाजसेवा हीच खºया अर्थाने ईश सेवा असते. ईश्वराच्या कृपेइतकीच तळमळ समाजसेवेच्या व्रताची अंत:करणात असावी लागते. तेव्हा समाजातील ईश्वर आपल्यावर प्रसन्न होईल.

Web Title: Check yourself first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.