Chnakyaniti: आचार्य चाणक्य यांनी शरीरसुखाचा संबंध थेट वृद्धत्वाशी का जोडला आहे? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 02:21 PM2023-05-23T14:21:51+5:302023-05-23T14:22:18+5:30

Chanakyaniti: वयोमानाने येणारे म्हातारपण आपण थोपवू शकत नाही, परंतु मनाने चिरतरुण राहण्यासाठी कोणते उपाय करायला हवेत, सांगताहेत आचार्य चाणक्य!

Chnakyaniti: Why did Acharya Chanakya directly relate physical relationship to aging? Find out! | Chnakyaniti: आचार्य चाणक्य यांनी शरीरसुखाचा संबंध थेट वृद्धत्वाशी का जोडला आहे? जाणून घ्या!

Chnakyaniti: आचार्य चाणक्य यांनी शरीरसुखाचा संबंध थेट वृद्धत्वाशी का जोडला आहे? जाणून घ्या!

googlenewsNext

आचार्य चाणक्य हे भारताचे महान तत्त्वज्ञ आणि मुत्सद्दी मानले जातात. त्यांनी मानवी जीवनाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या नीतीशास्त्रात संकलित केल्या आहेत. लोक याला चाणक्य नीती या नावाने ओळखतात. 

आचार्यांनी वृद्धापकाळावर भाष्य करताना काही मुद्दे अधोरेखित केले आहेत. ते म्हणतात, वयोमानाने येणारे वृद्धत्त्व आपण थोपवू शकत नाही, परंतु जी व्यक्ती मनाने खचते ती अकाली वृद्ध होते. हा वृद्धापकाळ टाळण्यासाठी आणि उतार वयातही प्रफुल्लित राहण्यासाठी काही उपाय वेळच्या वेळी करणे हितावह ठरते. यात प्रामुख्याने काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्या पुढीलप्रमाणे-

शारीरिक सुख: पूर्वीच्या काळी बालविवाहाची प्रथा होती, त्यानंतर लग्नाचे वय १८ करण्यात आले. मात्र आता करिअर, शिक्षण यामुळे ३०-३५ वय उलटले तरी लग्न होतातच असे नाही. लग्नाचे वय निघून गेले की लग्नच करू नये हा विचार बळावतो आणि एकाकी आयुष्य जगत अकाली वृद्धत्व येते. म्हणून आचार्य चाणक्य म्हणतात की अन्नाची भूक जेवढी महत्त्वाची तेवढीच शारीरिक भूकदेखील महत्त्वाची आहे आणि ती नैसर्गिक आहे. योग्य वयात ती शमली नाही, तर स्त्री पुरुष अनैतिक मार्ग अवलंबू शकतात. आणि ते सुख मिळाले नाही तर कदाचित आक्रस्ताळेपणा वाढू शकतो किंवा नैराश्याने मनुष्य खचून जाऊ शकतो. म्हणून लग्न वेळेत करून या सुखाची पूर्ती केली असता वासनेवर नियंत्रण राहते आणि परमार्थाकडे जीवन वळवता येते. 

प्रवास : आचार्य चाणक्य सांगतात, जे लोक प्रवास करत नाहीत ते लवकर वृद्ध होतात, याउलट जे लोक खूप प्रवास करतात, निसर्गात रमतात, अनेक लोक जोडतात, ते लोक कायम उत्साही आणि सकारात्मक राहतात. त्यामुळे त्यांचा मेंदू सतेज राहतो आणि अकाली वृद्धत्व येत नाही. घरात बसून, चाकोरीबद्ध आयुष्य जगून वृद्धत्व लवकर येते आणि जीवन बेचव भासू लागते. म्हणून उमेद कायम ठेवा, शरीर थकेपर्यँत भरपूर प्रवास करा आणि आनंदी जीवन जगा. 

बंधन : बंधनात अडकलेले लोक कुढत आयुष्य काढतात. ते बंधन कोणी लादलेले असू शकते किंवा परिस्थितीने स्वीकारलेले असू शकते. बंधनाच्या ओझ्याखाली मनुष्य झुकतो आणि कणाहीन होतो. याचा अर्थ जबाबदाऱ्या अंगावर घ्यायच्याच नाहीत असे नाही, तर त्या बंधनातून स्वतःसाठी पूरक वेळ काढावा आणि आपल्या स्वप्नांना पंख द्यावेत. अन्यथा वय उलटून जाते आणि जबाबदाऱ्या संपत नाहीत अशी स्थिती निर्माण होते. तरुण वयातच पोक्त विचारांनी व्यक्तीच्या वागण्या बोलण्यात वृद्धत्व डोकावू लागते आणि माणूस एकाकी पडतो. 

Web Title: Chnakyaniti: Why did Acharya Chanakya directly relate physical relationship to aging? Find out!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.