जशी ज्याची इच्छा तसा निवडा मंत्र, बाप्पा सोपे करेल तुमच्या आयुष्याचे तंत्र!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 08:08 AM2022-01-21T08:08:00+5:302022-01-21T08:10:02+5:30
मंत्रामध्ये प्रचंड सामर्थ्य असते, जो मनोभावे 'जप'तो, त्याला ईश्वर जपतो!
प्रत्येक महिन्यात दोन्ही पक्षांची चतुर्थी अनुक्रमे संकष्टी चतुर्थी आणि विनायक चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. २१ जानेवारी रोजी संकष्ट चतुर्थी आहे. या दिवशी गणेशाची पूजा केली जाते. भगवान गणेशाला विघ्नहर्ता, लंबोदर, गजानन, गणपती, बाप्पा, गणेश इत्यादी नावानेही ओळखले जाते. गणपती बाप्पाची जो मनापासून पूजा करतो त्याच्या जीवनातून सर्व दु:ख आणि संकटे दूर होतात. यासोबतच मंगलमूर्ती सर्वांचे मंगल करतो. तुम्हालाही गणेशाला प्रसन्न करायचे असेल तर संकष्ट चतुर्थीला या मंत्रांचा जप अवश्य करा-
गणेश स्तुति मंत्र
गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारु भक्षणम्ं।
उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्॥
गणेश गायत्री मंत्र
ऊँ एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो बुदि्ध प्रचोदयात।
धन-संपत्ति प्राप्ति चा मंत्र
ऊँ नमो गणपतये कुबेर येकद्रिको फट् स्वाहा.
सुख शांती समाधान देणारा मंत्र
वक्र तुंड महाकाय, सूर्य कोटि समप्रभ:।
निर्विघ्नं कुरु मे देव शुभ कार्येषु सर्वदा॥
विघ्न दूर करणारा मंत्र
एकदन्तं महाकायं लम्बोदरगजाननम्ं।
विध्ननाशकरं देवं हेरम्बं प्रणमाम्यहम्॥