"आत्मनिर्भर भारत बनवण्याआधी, आत्मनिर्भर मन बनवणं गरजेचं"- शिवानी दीदी 

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: November 6, 2020 08:17 PM2020-11-06T20:17:17+5:302020-11-06T20:25:41+5:30

ज्या गोष्टी आपल्या हातात नाही, त्याचा विचार करू नका. मात्र, आपली कृती, उक्ती विचारपूर्वक करा. आपल्या संस्कारांवर उद्याचा समाज अवलंबून आहे.

Creating a self-reliant mind is more important than building a self-reliant India. - Brahmakumari Shivani Didi | "आत्मनिर्भर भारत बनवण्याआधी, आत्मनिर्भर मन बनवणं गरजेचं"- शिवानी दीदी 

"आत्मनिर्भर भारत बनवण्याआधी, आत्मनिर्भर मन बनवणं गरजेचं"- शिवानी दीदी 

Next

ज्योत्स्ना गाडगीळ

संकटकाळी मनुष्य विचलित होतो. मात्र प्रख्यात शायर साहिर लुधियानवी म्हणतात, 'में जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुवे में उडाता चला गया...' परंतु आजच्या कोव्हीड काळात खरोखरच सर्वसामान्य मनुष्याला असे जगता येईल का? याच विषयवार संवाद साधत आहेत, लोकमत मीडिया ग्रुपचे अध्यक्ष विजय दर्डा आणि त्यावर मार्गदर्शन करत आहेत आंतराष्ट्रीय व्याख्याता ब्रह्मकुमारी शिवानी दीदी. 

दीदी म्हणतात, 'कोव्हीड हे एक निमित्त आहे. मनुष्य कालही आपल्या दुःखासाठी दुसऱ्याला जबाबदार धरत होता, आजही दुसऱ्यालाच जबाबदार धरत आहे. कोव्हीड २०२० मध्ये आला, परंतु २०१९ मध्ये आपण डोकावलो, तर लक्षात येईल, की तेव्हाही मनुष्य त्रासलेलाच होता. याचे कारण एकच, मनुष्याला आपल्या दुःखाचे खापर फोडायला काही ना काही साधन लागते, २०२० मध्ये ते कोव्हीडच्या रूपात मिळाले. याचाच अर्थ अस्वस्थता वातावरणात नाही, तर मनुष्याच्या मनात आहे. त्याने स्वतःच्या यश-अपयशाची जबाबदारी घ्यायला शिकले पाहिजे. त्यामुळे आपोआप त्याचे मन स्थिर होईल. शांत होईल. 

मनःशांती आपल्या आतच 'दडलेली' आहे, मात्र मनुष्याने तिला बाह्य कारणांनी 'दडपून' टाकले आहे.  ती कारणे बाजूला केली, की फक्त मनःशांती सापडेल. आनंद सापडेल. मग कोव्हीड येवो, नाहीतर अन्य कोणतीही समस्या, ती आपले चित्त विचलित करू शकत नाही. म्हणून मनाशी संकल्प केला पाहिजे, की मला कायम आनंदात राहायचे आहे आणि इतरांना आनंदात ठेवायचे आहे. या संकल्पात सिद्धी दडलेली आहे. आनंद बाहेरून शरीरात येत नाही, तर आतून बाहेर गेला पाहिजे. आपले विचार, संस्कार आपले भविष्य ठरवतात. म्हणून नेहमी सकारात्मक राहा. चांगलेच विचार करा, आपोआप सगळे चांगलेच घडत जाईल. ज्या गोष्टी आपल्या हातात नाही, त्याचा विचार करू नका. मात्र, आपली कृती, उक्ती विचारपूर्वक करा. आपल्या संस्कारांवर उद्याचा समाज अवलंबून आहे. 

याबाबत सविस्तर चर्चा ऐकण्यासाठी लोकमत भक्ती या युट्युब चॅनेलच्या लिंकवर क्लिक करा. 

Web Title: Creating a self-reliant mind is more important than building a self-reliant India. - Brahmakumari Shivani Didi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.