आध्यात्मिकतेची संस्कृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 04:22 AM2020-08-19T04:22:40+5:302020-08-19T04:22:48+5:30

कारण त्या क्षणापासून ती केवळ त्या ओळखीच्या चौकटीतूनच कार्य करू लागते.

A culture of spirituality | आध्यात्मिकतेची संस्कृती

आध्यात्मिकतेची संस्कृती

Next

-सद्गुरू जग्गी वासुदेव
मानवी बुद्धीने जीवन आणि त्यापलीकडे काय आहे, याचा शोध घेणे स्वाभाविक आहे.ङ्क्तजीवनाचे अवलोकन करणे आणि ते जाणून घेण्यासाठी आतुर असणे. वास्तविकता अशी असताना, तुम्ही अध्यात्म कसे टाळू शकता? दीर्घकाळापासून तुम्ही हे टाळत आला आहात. कारण जे तुम्ही नाही, अशा अनेक गोष्टींप्रती तुम्ही आसक्त झाला आहात आणि तुमची ओळख बांधली आहे. जेव्हा मी ‘जे तुम्ही नाही अशा गोष्टी’ असे म्हणतो, तेव्हा त्यात तुमचे शरीर आणि मनही सामील आहे. एकदा तुम्ही ‘जे नाही’ अशा गोष्टींसोबत तुमची ओळख बांधली की तुमची बुद्धी विकृत होते आणि मग ती काहीही स्पष्टपणे पाहू शकत नाही. कारण त्या क्षणापासून ती केवळ त्या ओळखीच्या चौकटीतूनच कार्य करू लागते.

समजा तुम्ही म्हणालात, ‘मी एक स्त्री आहे.’ मग तुमची विचार करण्याची पद्धत, तुमच्या भावना, सर्वकाही एका स्त्रीसारखे असणार. म्हणजे तुम्ही तुमच्या शरीराच्या काही अवयवांसोबत तुमची ओळख जोडली. यासाठीच ‘आध्यात्मिक प्रक्रिया’ आवश्यक ठरतात. जर लोक सहज, निरागस असते तर अध्यात्म ही एक नैसर्गिक गोष्ट असली असती. तुमच्या सभोवताली दृष्टिक्षेप टाकणे आणि जीवनाच्या भौतिकतेच्या पलीकडे काहीतरी आहे याची जाणीव होणे फार स्वाभाविक आहे आणि हे जाणून घेणेही फार सोपे आहे; पण जगातील बहुतेक लोकांच्या हे लक्षात येत नाही ही आश्चर्यकारक बाब आहे. तुम्ही जर फक्त दोन मिनिटांसाठी डोळे बंद केले तर पाहाल की, तुम्ही शरीरापेक्षा जरा अधिक काहीतरी आहात हे लक्षात येईल. एक प्रकारे, ही खरोखरच लाजिरवाणी गोष्ट आहे की, आपल्याला लोकांना त्यांच्या आध्यात्मिकतेबद्दल आठवण करून द्यावी लागत आहे. आम्हाला आध्यात्मिक प्रक्रि या दैनंदिन जीवनाचा भाग व्हावा अशी इच्छा आहे. एक आई आपल्या मुलाला दात घासण्यास शिकविते त्याप्रमाणे, आपल्याला आध्यात्मिक प्रक्रियाही तशी व्हायला हवी आहे, कोणत्याही प्रयत्नांशिवाय.

Web Title: A culture of spirituality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.