Datta Jayanti 2022: दत्त जयंतीनिमित्त घरच्याघरी तयार करा सुंठवड्याचा नैवेद्य; वाचा पूर्ण रेसेपी!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 11:57 AM2022-12-06T11:57:37+5:302022-12-06T11:58:02+5:30

Datta Jayanti 2022: सुंठवडा किंवा पंजिरीचा नैवेद्य चविष्ट असतोच शिवाय हिवाळ्यात आरोग्यवर्धकही असतो!

Datta Jayanti 2022: Prepare Panjiri a festive offering naivedyam at home for Datta Jayanti; Read the full recipe! | Datta Jayanti 2022: दत्त जयंतीनिमित्त घरच्याघरी तयार करा सुंठवड्याचा नैवेद्य; वाचा पूर्ण रेसेपी!

Datta Jayanti 2022: दत्त जयंतीनिमित्त घरच्याघरी तयार करा सुंठवड्याचा नैवेद्य; वाचा पूर्ण रेसेपी!

googlenewsNext

प्रत्येक उत्सवाचा प्रसाद, नैवेद्य हा ऋतूसुसंगत असतो, तसा दत्त जयंतीचा उत्सव हिवाळ्यात येत असल्याने सुंठवडा पंजिरीचा प्रसाद दाखवला जातो. हा प्रसाद एका दमात न खाता चिमूट चिमूट घेऊन खावा नाहीतर जोरात ठसका लागू शकतो. जाणून घेऊ त्याची पूर्ण रेसेपी. 

सुंठवडा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य –

- अर्धा कप खारीकचे तुकडे
- १५ बदाम
- १० काजू
-  १चमचा बडीशेप
-  १ चमचा पांढरे तीळ
-  १ चमचा खसखस
-  ४ वेलची
-  अर्धा कप सुख्या खोबऱ्याचा किस
-  ३ चमचे साखर
- १ चमचा खडी साखर
- १ चमचे मनुके
- १ चमचा सुंठ पावडर

असा तयार करा सुंठवडा –

आधी कढईमध्ये सर्व सुखा मेवा हलकासा भाजून घ्यायचा आहे. सर्वात आधी खारीख भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर बदाम, काजू, बडीशेप, पांढरे तीळ, खसखस, सोललेली वेलची, सुख्या खोबऱ्याचा किस हे सर्व कढईमध्ये एक एक करुन भाजून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू आणि बदाम सोडून बाकी सर्व सुकामेवा टाकून त्यामध्ये तीन चमचे साखर आणि एक चमचा खडी साखर टाकून वाटून घ्यायचे आहे. त्यानंतर आता यामध्ये खोबऱ्याचा किस, काजू, बदाम आणि सुंठ पावडर टाकून पुन्हा मिक्सरमधून हे मिश्रण बारीक करुन घ्यायचे आहे. आता यावर मनुके टाकून सर्व मिश्रण एकत्र करुन घ्यायचे आहे. अशापद्धतीने सुंठवडा तयार झाला आहे. हा सुंठवडा खायला खूप चविष्ट असतो त्यासोबत तो शरीरासाठी खूपच फायदेशीर असतो. या जन्माष्टमीनिमित्त तुम्ही घरीच सुंठवडा तयार करु शकता.

Web Title: Datta Jayanti 2022: Prepare Panjiri a festive offering naivedyam at home for Datta Jayanti; Read the full recipe!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न