दत्तगुरुंचे चोवीस गुरु : पाचवा गुरु: पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 11:55 AM2020-12-16T11:55:41+5:302020-12-16T11:56:16+5:30

पाणी स्वभावात:च अत्यंत निर्मळ असते. अंगच्या गुणांमुळे सर्वांना ते मधुर व कोमल अस लागते. तीर्थामधील पाणी तीर्थात स्नान केलेल्यांना पवित्र करते. त्यांचे पाप धुऊन टाकते. योग्याच्या अंगी देखील रात्रंदिवस इतकी लक्षणे असावीत.

Dattaguru's twenty four Guru: 5th Guru: Water | दत्तगुरुंचे चोवीस गुरु : पाचवा गुरु: पाणी

दत्तगुरुंचे चोवीस गुरु : पाचवा गुरु: पाणी

googlenewsNext

गुरुंचे गुरु परात्पर गुरु म्हणजे दत्तगुरु, त्यांनीही कलियुगात अवतरून गुरु केले. एक दोन नाही तर चोविस गुरु. त्या गुरुंकडून ते काय शिकले, ते जाणून घेत आपणही चोविस गुरुंचा देवदत्त परुळेकर यांच्या लेखणीतून आजपासून दत्तजयंतीपर्यंत रोज थोडा थोडा परिचय करून घेऊया. जेणेकरून आपल्यालाही पदोपदी जेव्हा गुरुंची उणीव भासेल, त्यावेळेस दत्तगुरुंची गुरुभक्ती आठवून आपल्यालाही गुरुंचा शोध घेता येईल.

अवधुताचा पुढचा गुरु आहे, पाणी. नाथ सांगतात की, पाणी स्वभावात:च अत्यंत निर्मळ असते. अंगच्या गुणांमुळे सर्वांना ते मधुर व कोमल अस लागते. पवित्र व्हावया प्राणियांसी, तीथी तीर्थत्व उदकासी,                                                                                                                                                            इतुकी लक्षणे योगियासी, अहर्निशी असावी।

हेही वाचा : दत्तगुरुंचे चोवीस गुरु: चौथा गुरु: आकाश गुरु

तीर्थामधील पाणी तीर्थात स्नान केलेल्यांना पवित्र करते. त्यांचे पाप धुऊन टाकते. योग्याच्या अंगी देखील रात्रंदिवस इतकी लक्षणे असावीत. गंगा ही अत्यंत पवित्र नदी मानली जाते. आपली पापे नष्ट व्हावी म्हणून असंख्य लोक गंगेत स्नान करीत असतात. ही गंगा मूळ स्वर्गस्थ नदी. हिला आपल्या तपश्चर्येने भगिरथाने पृथ्वीवर आणले. पृथ्वीवर अवतरण्यापूर्वी गंगेने भगिरथाला प्रश्न विचारला. 'भगिरथा, मी पृथ्वीवर आल्यावर लक्षावधी पापी लोक माझ्यात स्नान करतील व मी अपवित्र होईन. मग मी पुन्हा पवित्र कशी होईन?' भगिरथाने उत्तर दिले, `हे गंगामाते, पृथ्वीवर केवळ पापीच लोक राहतात असे समजू नकोस. पृथ्वीवर अनेक साधू प्रवृत्तीचेही संत राहतात. हे संत तुझ्या पाण्यामध्ये स्नान करतील आणि तू पुन्हा पवित्र होशील. संतांच्या स्पर्शात पाप नाशाचे, अपवित्राला पवित्र करण्याचे सामर्थ्य आहे.'

कुक्कुट ऋषींच्या चरणस्पर्शांनी गंगा, यमुना व सरस्वती या नद्या पवित्र होत असत अशी कथा आपल्याला पुंडलिकाच्या पूर्व चरित्रात वाचायला मिळते. पुंडलिकाचा अधिकार तर एवढा मोठा होता, की तिथे पवित्र होण्यासाठी रोज माध्यान्ह काळी पुंडलिकाच्या दर्शनाला येतात, असे वर्णन नामदेवरायांनी केले आहे, ते सुद्धा खुद्द शंकराच्या तोंडून- शंकर सांगे ऋषीजवळी, सकळ तीर्थ माध्यान्हकाळी, येती पुंडलीकाजवळी, करिती अंघोळी वंदिती चरण। पाणी अपवित्राला पवित्र करते पण मी यांना निर्मळ केले असा अहंकार ते धरीत नाही. त्याप्रमाणे योगी हा भक्ती करणे ज्याचा स्वभाव आहे, असे श्रद्धाळू भाविक जे आहेत, त्यांचे उपदेशद्वारा कलीदोष घालवूनही मी सर्व भाविकांचा गुरु आहे, अशा गुरुपणाने अभिमानाने बळ धारण करीत नाही. वाल्याचा वाल्मिकी केल्याबद्दल नारदाने अहंकार धरला काय? विसोबा खेचराचा उद्धार करून त्याला नामदेवाला गरु केल्याबद्दल माऊलींना अहंकार झाला काय? संतांना अहंकाराची बाधा कधीही होत नाही.

हेही वाचा : दत्त गुरुंचे चोवीस गुरु : तिसरे गुरु : वायू

Web Title: Dattaguru's twenty four Guru: 5th Guru: Water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.