शाश्वत सुखप्राप्ती जीवनाचे ध्येय श्री प्रल्हाद वामनराव पै आणि अभिनेते दीपक वेलणकर यांचा संवाद दिनांक १ जुलै २०२१ रोजी रात्री ८ वाजता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 02:45 PM2021-06-30T14:45:47+5:302021-06-30T14:53:12+5:30
माणसाचा जन्म हा चौऱ्याऐंशी लक्षयोनी नंतर मिळतो असं म्हणतात. आणि असं असेल तर मानव जन्माचा नक्कीच काही खास ...
माणसाचा जन्म हा चौऱ्याऐंशी लक्षयोनी नंतर मिळतो असं म्हणतात. आणि असं असेल तर मानव जन्माचा नक्कीच काही खास उद्देश असला पाहिजे. परंतु
सर्वसामान्य माणूस सुख मिळविणे हे जीवनाचे ध्येय समजतो कारण तो उद्देश त्याला माहित नसतो किंवा योग्य मार्गदर्शनाअभावी त्याला ते कठीण वाटते.
पण मग सुख कशात आहे ?आपण मानले तर सुख आहे किंवा सुख हे मानण्यात आहे . असं लोक म्हणतात ते खरं आहे का?
आज प्रत्येक जण सुख मिळविण्यासाठी भरपूर पैसा कमवितो किंवा त्याच्या पाठी लागतो पण तो कमी का पडतो ? पैशाने सुख मिळते का?
पण बाह्य गोष्टींनी मिळालेले सुख ही काही काळापुरते असते .
मग शाश्वत सुख मिळवणे हेच आयुष्याचे ध्येय असायला हवे का?
याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत, ज्येष्ठ निरुपणकार प्रल्हाद वामनराव पै. दिनांक 1 जुलै २०२१ रोजी रात्री ८ वाजता लोकमत भक्ती या युट्युब चॅनेलवर अभिनेते दीपक वेलणकर त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.
श्री. प्रल्हाद पै हे आपल्याला ज्येष्ठ निरुपणकार म्हणून परिचित आहेत. ते सद्गुरू श्री वामनराव पै यांचे चिरंजीव आहेत. जीवनविद्या तत्वज्ञानाचे ही सद्गुरू वामराव पै यांनी सुरु करून दिलेल्या संस्थेचे सर्वेसर्वा आहेत. वडिलांप्रमाणे प्रल्हाद पै यांनाही तत्वज्ञानाची आवड आहे. कारण तत्वज्ञान हे वैज्ञानिक, व्यावहारिक आणि प्रत्येक जीवनात प्रत्येक व्यक्तीसाठी उपयुक्त ठरते. जीवनविद्या तत्वज्ञान हे मानसशास्त्र, परजीवी विज्ञान आणि मेटाफिजिक्सचे उत्कृष्ट संयोजन आहे. त्यांनी अनेक वर्षांपासून समुपदेशन सत्रे घेतली आहेत आणि जीवनविद्या तत्वज्ञानाची तत्त्वे लागू करून सामान्य माणसाचे जीवन उन्नतीत आणण्यास मदत केली आहे.
तेव्हा येत्या गुरुवारी 1 july 2021 या live चर्चासत्राच्या माध्यमातून आपणही पै यांच्या मार्गदर्शनाचा लाभ अवश्य घ्या आणि शाश्वत सुख मिळवण्याचा मार्ग जाणून घेऊया.