देवासी अवतार भक्त्तांसी संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 03:05 AM2020-06-15T03:05:56+5:302020-06-15T03:06:13+5:30

देहू, आळंदीहून निघालेल्या दिंड्या-पालख्या पुण्यात स्थिरावलेल्या असताना दिंड्या-पालख्यांच्या छत्र, चामरांच्या, अश्व, अब्दागिऱ्यांच्या वैभवासोबत व टाळ, मृदुंग, वीणा वाजवीत ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’चा नामघोष करणाºया वारकऱ्यांसोबत वासुदेवही पालखीत असतात. भारूड व लळीतांमध्ये वासुदेवाचे सोंग काढले जाते. बाळसंतोष, जोशी, सौरी, अशी सोंगे भारुडात सादर होतात.

Devasi incarnation devotees world | देवासी अवतार भक्त्तांसी संसार

देवासी अवतार भक्त्तांसी संसार

Next

- प्रा.डॉ. प्रकाश खांडगे, मुंबई विद्यापीठाच्या शाहीर अमरशेख अध्यासनाचे समन्वयक

अलंकापुराहून संत ज्ञानेश्वर महाराज व देहूहून तुकाराम महाराज यांच्या दिंड्या-पालख्या पुण्यात येतात तेव्हा संपूर्ण पुणे शहर व परिसर विठ्ठलाच्या, माउलीच्या नामघोषाने दुमदुमून जातो. पंढरपूरपर्यंत पुरेल इतके धान्य, भाजीपाला, अन्य जिन्नस खरेदीसाठी बाजारात भाविकांच्या उड्या पडतात.
प्रपंच सोडून विठ्ठलभक्तीच्या परमार्थाकडे वळलेली वारकºयांची पावले जणू वारीच्या प्रपंचासाठी उत्साहात असतात. प्रपंच व परमार्थ यांच्यातील विसंवाद नव्हे, तर सुसंवाद साधण्याचे मोठे योगदान वारकरी संप्रदायाचे आहे. कर्मालाच योग मानणे हे या संप्रदायाच्या भक्तीचे वर्म आहे. ‘बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दृष्काळे पीडा केली’ अशी उद्विग्नता व त्यातून आलेली विरक्ती संत तुकाराम महाराजांनी व्यक्त केली असली वा ‘संसार दु:ख मूळ चहूकडे इंगळ। विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ।’ असे संतांनी म्हटलेले असले तरी संतांनी नेटका प्रपंच करून परमार्थ साधनेची शिकवण दिली. यामुळेच जनाबार्इंना जाते सुंदर वाटते. त्या म्हणतात, ‘सुंदर माझे जाते गं, फिरते बहुत ओव्या गावू कवतिके, तू ये रे बा विठ्ठला।’ जिवा-शिवाच्या दोन्ही पाळ्यांचे जाते जनाबार्इंना प्रपंच व परमार्थाच्या भावविश्वाचे द्योतक वाटते. संतांच्या ‘वासुदेव’ या रूपकातही निद्रा आणि जागृतावस्था यांचे सुरेख चिंतन आहे.
अल्प आयुष्य मानव देह।
शत गणिले ते अर्ध रात्र खाय।
मध्ये बालत्व पीडा रोग क्षय।
काय भजनासी उरले ते पाहे गा।
क्षणभंगुर नाही भरंवसा।
व्हावे सावध तोडा माया आशा।
काही न चाले पडेल गळां फासा।
अशा या ‘वासुदेव’ या रूपकातून
तुकारामांनी क्षणभंगुर आयुष्याचे चिंतन केले आहे. वासुदेव वारीत
‘रामकृष्ण वासुदेवा।
जागवी जनासी
वाजवी चिपळिया। टाळ घागºया
घोषे रामकृष्ण वासुदेवा’
असे चिंतन करतात.
राम कृष्ण गीतीं गात। टाळ चिपळ्या वाजवीत। छंदे आपुलिया नाचत। नीज घेऊनी फिरत गा।।
असे तुकारामांनी म्हटले आहे. वासुदेव नीज घेऊन फिरतो म्हणजे त्याच्यासोबत असलेले त्याचे श्रेयस व प्रेयस म्हणजे साक्षात परमेश्वर अंतरी घेऊन फिरतो. ‘अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ’ असा संदेश वासुदेव देतो. प्रपंचाची निरर्थकता व परमार्थाची सार्थकता स्पष्ट करीत दान पावलं, दान पावलं म्हणतो. आता पालखी-दिंड्यांचा सोहळा व त्यातील वासुदेवाच्या संकीर्तनाला आपण पारखे झालो आहोत. कोरोनामुळे ‘अल्पआयुष्य मानवदेह’ झाले आहे दुसरे काय?

Web Title: Devasi incarnation devotees world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.