Dhan Teras 202: आरोग्य देणारी देवता धन्वंतरी यांची धनत्रयोदशीच्या निमित्ताने करा पूजा आणि जाणून घ्या आजच्या दिवसाचे महत्त्व!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 01:17 PM2022-10-22T13:17:29+5:302022-10-22T13:17:48+5:30

Diwali 2022: आजच्या दिवशी वैद्यराज धन्वंतरी यांचा जन्म झाला असे म्हणतात, म्हणून आजची तिथी त्यांना समर्पित केली जाते. सविस्तर वाचा. 

Dhan Teras 202: Worship Goddess Dhanwantari on the occasion of Dhantrayodashi and know the significance of this day! | Dhan Teras 202: आरोग्य देणारी देवता धन्वंतरी यांची धनत्रयोदशीच्या निमित्ताने करा पूजा आणि जाणून घ्या आजच्या दिवसाचे महत्त्व!

Dhan Teras 202: आरोग्य देणारी देवता धन्वंतरी यांची धनत्रयोदशीच्या निमित्ताने करा पूजा आणि जाणून घ्या आजच्या दिवसाचे महत्त्व!

googlenewsNext

धनाची पूजा, यमदीपदान आणि दिवाळीचा दुसरा दिवस या अर्थाने धनत्रयोदिचे महत्त्व आहेच, शिवाय आजची तिथी वैद्यराज धन्वंतरी यांची जन्मतिथी म्हणून साजरी केली जाते असेही म्हणतात. 

धनतेरस किंवा धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या १३ व्या दिवशी असते. या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला. म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. काही लोक या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करतात. दिवाळी सण असताना धनत्रयोदशीस एक आगळेवेगळे स्वरूप येते. व्यापारी वर्गात या पूजेचे महत्त्व विशेष असते. या दिवशी संध्याकाळी दुकानांमध्ये पूजा केली जाते. हिशेबाच्या नव्या वह्यांचा वापर या दिवसापासून सुरू करण्याचा प्रघात आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुख्यत: धनाची आणि कुबेराची पूजा केली जाते.

धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावीत म्हणुन राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. ती त्यास वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या जगात(यमलोकात) परततो. अशा प्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचवले. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात.त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो असा समज आहे.

धनत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा आहे. इंद्राने जेव्हा असुरांना बरोबर घेऊन समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून या दिवशी देवी लक्ष्मी प्रगट झाली.
त्याच वेळी समुद्रातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. म्हणून या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात.

Web Title: Dhan Teras 202: Worship Goddess Dhanwantari on the occasion of Dhantrayodashi and know the significance of this day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.