Dhan Teras 2024: धनत्रयोदशी धन्वंतरीच्या पूजेचा दिवस; मग सोने चांदी खरेदीची प्रथा केव्हापासून?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 12:36 PM2024-10-24T12:36:55+5:302024-10-24T12:37:21+5:30
Dhan Teras 2024: धनत्रयोदशीला आपण ऐश्वर्य, आरोग्य, सुख सौख्य मिळावं म्हणून धन्वंतरीची पूजा करतो; पण त्या दिवशी मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याचे कारण जाणून घ्या.
यंदा २९ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी (Dhan Teras 2024)आहे. अनेक जण त्या दिवशी देखील पैसे, सोने, चांदीची, दागिने यांची पूजा करतात. मात्र मुळात हा दिवस असतो भगवान धन्वंतरीचा! त्यांना आरोग्याची देवता म्हटले जाते. केवळ पैसा हाताशी असून उपयोग नाही तर तो उपभोगण्यासाठी आरोग्यही उत्तम पाहिजे. त्यासाठी लक्ष्मी पूजेच्या आधी धनत्रयोदशीला भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते. तरीदेखील या शुभ दिनी अनेक जण सोनं-चांदीची खरेदी करतात. लक्ष्मी मातेचा आशीर्वाद लाभावा हे त्यामागील कारण आहेच, शिवाय त्याला एका पौराणिक कथेची देखील पार्श्वभूमी आहे.
वसुबारस पाठोपाठ धनत्रयोदशी येते आणि दिवाळीची (Diwali 2024) रंगत वाढत जाते. अश्विन वद्य त्रयोदशीला हा सण केला जातो. या शुभ मुहूर्तावर, प्रदोष काळात, देवी लक्ष्मी, कुबेर देव आणि भगवान धन्वंतरी (Dhan Teras 2024 Puja vidhi यांची पूजा करण्याची परंपरा आहे. ही पूजा केल्याने व्यक्तीला धनाची प्राप्ती होते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहतो, अशी धार्मिक मान्यता आहे. या दिवशी शुभ मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या वस्तू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्या खरेदीमुळे धन संपत्तीत वाढ होत जाते. तसेही हिंदू धर्मानुसार शुभ दिवशी सोने-चांदीच्या वस्तू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. पण पौराणिक पार्श्वभूमी कोणती ते पाहू.
पौराणिक पार्श्वभूमी
पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनाच्या वेळी भगवान धन्वंतरी प्रकट झाले. भगवान धन्वंतरी हे देवांचे वैद्य म्हणूनही ओळखले जातात. भगवान धन्वंतरी प्रकट झाले तेव्हा त्यांच्या हातात सुवर्ण कलश होता. त्यातून पाठोपाठ लक्ष्मी प्रगट झाली. म्हणून धन्वंतरी प्रमाणे धनत्रयोदशीच्या दिवशी ज्यांच्या हाती सोने, चांदीची खरेदी असते त्यांच्यापाठोपाठ लक्ष्मी प्रगट होते आणि कृपावंत राहते.
या पौराणिक कथेमुळे धनत्रयोदशीला सोने, चांदी खरेदीची प्रथा सुरु झाली. ज्यांना ही खरेदी शक्य नाही, त्यांनी आपल्या घरातील सोन्या, चांदीच्या वस्तू धुवून, पुसून लक्ख करून त्यांची पूजा करावी आणि या संपत्तीत वाढ व्हावी अशी लक्ष्मी मातेला प्रार्थना करावी!
Laxmi Pujan 2024: लक्ष्मी पूजेला 'हा' खास उपाय करा, वर्षभर आर्थिक अडचणींपासून मुक्त राहा!