Dhanteras 2024: धनत्रयोदशीला 'या' चुका आवर्जून टाळा; आरोग्य आणि आर्थिक बाबतीत होऊ शकते नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 02:01 PM2024-10-29T14:01:20+5:302024-10-29T14:02:07+5:30

Dhanteras 2024: आज धनत्रयोदशीनिमित्त खास गोष्टींची खरेदी केल्याने घरात भरभराट होते, मात्र दिलेल्या चुका आवर्जून टाळा.

Dhanteras 2024: Avoid 'These' Mistakes on Dhanteras; Health and financial damage may occur! | Dhanteras 2024: धनत्रयोदशीला 'या' चुका आवर्जून टाळा; आरोग्य आणि आर्थिक बाबतीत होऊ शकते नुकसान!

Dhanteras 2024: धनत्रयोदशीला 'या' चुका आवर्जून टाळा; आरोग्य आणि आर्थिक बाबतीत होऊ शकते नुकसान!

धनत्रयोदशीचा (Dhanteras 2024) दिवस हा आनंद आणि समृद्धीचा दिवस आहे. या दिवशी काही खास गोष्टींची खरेदी केल्याने घरात वर्षभर भरभराट होत राहते. परंतु या दिवशी काही गोष्टी निषिद्ध मानल्या जातात. जाणतेपणी या चुका केल्या असता मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. म्हणूनच, तुम्हाला तुमच्या घरात सुख-समृद्धी टिकवून ठेवायची असेल, तर धनत्रयोदशीच्या दिवशी पुढे दिलेल्या चुका करू नका. तसेच या दिवशी फक्त सोने-चांदी, तांबे-पितळेच्या वस्तू खरेदी करा. याशिवाय घर, गाडी, लक्ष्मीपूजेची तयारी म्हणून झाडू खरेदी करणे देखील शुभ आहे. या दिवशी देवी लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो असलेले सोन्याचे किंवा चांदीचे नाणे खरेदी करणे देखील खूप शुभ ठरते. आता कोणत्या गोष्टी टाळायला हव्या ते पाहू. 

धनत्रयोदशीच्या दिवशी पुढील गोष्टी टाळा (Avoid these mistakes on Dhanteras) :

>> धनत्रयोदशीच्या दिवशी कोणालाही उधार देऊ नका आणि घेऊ नका. ही तिथी, हा सण धनाची वृद्धी करणारा आहे. त्यामुळे या दिवशी उधार स्वरूपी अर्थात कर्ज देणे नको आणि घेणे पण नको. 

>> धनत्रयोदशीच्या दिवशी स्टील, काच किंवा प्लॅस्टिकच्या वस्तू किंवा भांडी खरेदी करू नका. हे घन पदार्थ राहू आणि शनी यांच्याशी संबंधित आहेत धनत्रयोदशीला वर दिल्याप्रमाणे सोने,चांदी, तांबे-पितळ वगळता अन्य धातूंच्या वस्तूंची खरेदी टाळा. 

>> सोने-चांदी, तांबे-पितळेची भांडी खरेदी केली तर ती घरी आणताना त्यात मिठाई, तांदूळ इत्यादी भरावे. धनत्रयोदशीच्या दिवशी घरामध्ये रिकामी भांडी आणणे अशुभ मानले जाते. निर्जीव वसू सुद्धा आपल्या दिन चर्येत महत्त्वाची भूमिका बजावतात. 

>> धनत्रयोदशीच्या दिवशी संपत्तीची देवता कुबेर, लक्ष्मी माता , भगवान धन्वंतरी आणि यमराज यांची पूजा केली जाते. जर तुमच्याकडे या देवतांची  मूर्ती नसेल तर त्यांच्या प्रतिमा ठेवून पूजन करा, परंतु घरातील या देवतांची शोभेची मूर्ती  पूजेला ठेवू नये. 

>> धनत्रयोदशीच्या दिवशी चुकूनही घराच्या मुख्य दरवाजासमोर बूट आणि चप्पल ठेवू नका. सकाळपासूनच घराचा दरवाजा आणि समोरचा भाग धुवून स्वच्छ करून त्यावर सुंदर रांगोळी काढा. 

>> सणासुदीला उशिरापर्यंत झोपू नये, असे आपली आई आजी नेहमी सांगत असे असे. वामकुक्षी शरीरासाठी चांगली असते परंतुल धनत्रयोदशी आणि दिवाळीला चुकूनही दिवसा झोपू नये. असे केल्याने घरात नकारात्मकता येते.

>> धनत्रयोदशीच्या दिवशी चाकू, कात्री यासारखी धारदार वस्तू खरेदी करू नका. याऐवजी मिठाई, फळे, फराळ या गोष्टींचा आस्वाद घ्या!

Web Title: Dhanteras 2024: Avoid 'These' Mistakes on Dhanteras; Health and financial damage may occur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.