Diwali 2021: धनत्रयोदशीला मुख्यत्त्वे 'या' तीन देवतांची पूजा करा आणि त्यांचा वरदहस्त कायमस्वरूपी मिळवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 04:53 PM2021-10-30T16:53:31+5:302021-10-30T16:53:53+5:30

Diwali 2021 : कार्तिक कृष्ण त्रयोदशीचा प्रारंभ २ नोव्हेंबर रोजी सकाळी ११. ३२ मिनिटांनी होणार आहे. परंतु धनत्रयोदशीची पूजा सायंकाळी करायची असते.

Diwali 2021: Worship these three deities mainly on Dhantrayodashi and get their blessings forever! | Diwali 2021: धनत्रयोदशीला मुख्यत्त्वे 'या' तीन देवतांची पूजा करा आणि त्यांचा वरदहस्त कायमस्वरूपी मिळवा!

Diwali 2021: धनत्रयोदशीला मुख्यत्त्वे 'या' तीन देवतांची पूजा करा आणि त्यांचा वरदहस्त कायमस्वरूपी मिळवा!

Next

कार्तिक महिन्याच्या कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी म्हणतात. या वर्षी धनत्रयोदशीचा दिवस २ नोव्हेंबर रोजी मंगळवारी आला आहे. समुद्रमंथनातून धन्वंतरी हातात अमृत कलश घेऊन प्रगट झाले, तो आजचाच अर्थात धनत्रयोदशीचा दिवस. म्हणून अनेक ठिकाणी या दिवसाला धन्वंतरी जयंती असेही म्हणतात. धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची देवता कुबेर, आयुर्वेदाचे स्वामी धन्वंतरी, तसेच सुख-समृद्धीची देवता महालक्ष्मी यांची पूजा केली जाते. या तिन्ही देवता समृद्धी देणाऱ्या आहेत. म्हणून या तिन्ही देवतांची पुढे दिलेल्या पद्धतीनुसार विधिवत पूजा करा. 

धनत्रयोदशीची तिथी :

कार्तिक कृष्ण त्रयोदशीचा प्रारंभ २ नोव्हेंबर रोजी सकाळी ११. ३२ मिनिटांनी होणार आहे. परंतु धनत्रयोदशीची पूजा सायंकाळी करायची असते.

पूजा कधी करावी?

धनत्रयोदशीच्या दिवशी सायंकाळी धनाची तसेच वरील उल्लेख केलेल्या तीनही देवतांची मनोभावे पूजा करावी. काही जण धनत्रयोदशीला धन धान्याची पूजा करतात तर काही जण लक्ष्मी पूजेला करतात. विशेषतः व्यापारी वर्गाचे लक्ष्मीपूजेच्या दिवशी चोपडा पूजन असते. धंद्यात, व्यवसायात बरकत व्हावी म्हणून हे लक्ष्मीचे उपासक लक्ष्मी पूजेला आपले वैभव देवीच्या चरणी ठेवतात. मात्र जे धनत्रयोदशीला धनाची पूजा करतात, त्यांनी सायंकाळी दिवे लावणीच्या वेळी पूजेचा आरंभ करावा. तसेच धनाची पूजा झाल्यावर सायंकाळी दक्षिणेकडे दिव्याची वात करून एक दिवा यमराजांनादेखील अर्पण करावा आणि अकाली मृत्यू येऊ नये अशी प्रार्थना करावी.

पूजा विधी : 

धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी, कुबेर महाराज किंवा देवी महालक्ष्मी यांची विधीवत पूजा करावी. कुबेर महाराजांची पूजा का? कारण, त्यांना धनसंपत्तीचे प्रमुख मानले जाते. भगवान शंकरांनी त्यांना धनपतीचे वरदान दिले आहे. म्हणून धनप्राप्तीसाठी कुबेर महाराजांची पूजा केली जाते. तसेच धन्वंतरी हे आरोग्याची देवता आहेत. आपल्या घरात केवळ संपत्ती येऊन उपयोग नाही, तर ती उपभोगण्यासाठी चांगले आरोग्यही असायला हवे, म्हणून त्यांचीही पूजा. तसेच आपल्या घरातील धन-संपत्ती वृद्धिंगत व्हावी आणि लक्ष्मी चांगल्या मार्गानेच घरात यावी आणि कायमस्वरूपी स्थीर राहावी, म्हणून महालक्ष्मीची पूजा केली जाते. अक्षता, धूप, दीप, चंदन, उटी, पाने, फुले, श्रीफळ देवाला अर्पण करून पुढील मंत्रांचे उच्चारण करावे. 

कुबेर महाराजांच्या पूजेच्या वेळी म्हणावयाचा मंत्र-

ओम श्री, ओम ऱ्हीम, ओम ऱ्हीम, श्री क्लीं वित्तेश्वराय नम:।

धन्वंतरी पूजा मंत्र- 
ओम धन्वंतरये नम:।

पूजेच्या वेळी म्हणावयाचे श्लोक : 

ओम नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वंतराये:
अमृतकलश हस्ताय सर्वभय विनाशाय सर्वरोगनिवारणाय
त्रिलोकपथाय, त्रिलोकनाथाय श्री महाविष्णूस्वरूप,
श्री धन्वंतरी स्वरूप श्री श्री श्री औषधचक्र नारायणाय नम:।

या देवी सर्वभुतेषु, लक्ष्मीरूपेण संस्थिता,
नम: स्तस्यै, नम: स्तस्यै, नम: स्तस्यै नमो नम:।

Web Title: Diwali 2021: Worship these three deities mainly on Dhantrayodashi and get their blessings forever!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.