Diwali 2023: धनत्रयोदशीच्या सायंकाळी प्रदोष मुहूर्तावर यमदीपदान करताना आवर्जून म्हणा 'हा' श्लोक!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 07:28 AM2023-11-10T07:28:19+5:302023-11-10T07:28:43+5:30

Diwali 2023: धनत्रयोदशीला सायंकाळी यमदीपदान करतात, त्यामुळे अकाली मृत्यूचे भय टळते, अशातच प्रदोष व्रताची जोड असल्यामुळे दिलेली उपासना करा!

Diwali 2023: On Pradosh Muhurta on the evening of Dhantrayodashi, say 'this' Shlok while offering Yamdeep! | Diwali 2023: धनत्रयोदशीच्या सायंकाळी प्रदोष मुहूर्तावर यमदीपदान करताना आवर्जून म्हणा 'हा' श्लोक!

Diwali 2023: धनत्रयोदशीच्या सायंकाळी प्रदोष मुहूर्तावर यमदीपदान करताना आवर्जून म्हणा 'हा' श्लोक!

प्रत्येक पक्षातील त्रयोदशीला सूर्यास्त झाल्यानंतर रात्र होण्याच्या पूर्वीचा कालावधी म्हणजे प्रदोष काळ होय. आज १० नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी आणि शुक्र पदोषाचा संयोग घडत आहे. प्रदोष काळ म्हणजेच गोधुली बेला (संध्याकाळी) सूर्यास्ताच्या दरम्यान पूजा केल्यास प्रदोष व्रत अधिक शुभ मानले जाते. 

प्रदोष व्रत भोलेशंकर भगवान शिव यांना समर्पित असल्याचे मानले जाते. सोमवारी आगमन झाल्यामुळे त्याला सोम प्रदोष म्हणतात. प्रदोष व्रत हे प्रत्येक वारानुसार वेगवेगळे फळ देणारे असते. सोम प्रदोष व्रत केल्यामुळे भाग्य, आरोग्य, संपत्ती, आनंद, शांती, प्रेम, कर्जमुक्ती आणि बरेच शुभ परिणाम मिळतात तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. सोम प्रदोषाच्या दिवशी भगवान शिव, देवी पार्वती, भगवान गणेश आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते. 

प्रदोष पूजा विधी : या दिवशी भाविकांनी सूर्योदयाआधी उठून स्नान करावे. घर स्वच्छ करावे. देवाची पूजा करावी. शिवलिंगावर बेल वाहावे. जमल्यास दूध पाण्याने अभिषेक करावा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. त्याचप्रमाणे महाकाल शंकराच्या महामृत्युंजय जपाचेही पठण करावे. 

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिंपुष्टिवर्द्धनम्।
उर्वारुकमिव बन्धानान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्।।

आजच्या दिवशी सायंकाळी यमदीपदान करतात. मृत्यूचे भय प्रत्येकाला वाटत असते. त्यातही अकाली मृत्यूचे भय जास्तच असते. मृत्यू कधी, कसा येईल हे कोणीच सांगू शकत नाही. परंतु, तो कसा येऊ नये, यासाठी आपण प्रार्थना नक्कीच करू शकतो. त्यासाठीच शास्त्रात धनत्रयोदशीच्या दिवशी यमराजाला दीपदान केले जाते.

कसे करावे दीपदान:

मृत्यूची देवता यमराज हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत. त्यांच्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी दक्षिण दिशेकडे दिव्याची वात करून, तो दिवा प्रज्वलित केला जातो. अनन्यभावे तो दिवा यमराजांना अर्पण करून अकाली मृत्यू येऊ नये अशी प्रार्थना केली जाते. त्याचबरोबर पुढे दिलेला श्लोक रोज म्हणावा त्यामुळेही मृत्यू चांगल्या प्रकारे अर्थात फार त्रास न होता येतो. त्यासाठी ही प्रार्थना... 

अनायासेन मरणं विनादैन्येन जीवनं।
देहि मे कृपया शम्भो त्वयि भक्तिं अचंचलं ॥

अर्थ : हे भगवान शिवा, कृपा करून मला वेदनारहित शांतीपूर्ण मरण (अनासायन मरणम), माझ्या मूलभूत गरजांसाठी (विनादैन्येन जीवनम्) कोणत्याही त्रासाशिवाय किंवा इतरांवर अवलंबून नसलेले जीवन द्या आणि जेव्हा माझा आत्मा हे शरीर सोडून जाईल, तेव्हा मला फक्त तुझे स्मरण करावे. प्रभु (देहन्ते तव संत्यम्)

Web Title: Diwali 2023: On Pradosh Muhurta on the evening of Dhantrayodashi, say 'this' Shlok while offering Yamdeep!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.