पावसाळ्यात तळण अवश्य करा, मात्र भरती ओहोटीची वेळ पाहून; जाणून घ्या पारंपरिक आणि शास्त्रीय कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 07:10 PM2023-07-19T19:10:13+5:302023-07-19T19:11:08+5:30

तळण तर करायचे, पण भरती ओहोटीची वेळ कशी पाहायची? त्याचा पाककृतीवर कसा परिणाम होतो आणि त्यामागील शास्त्रीय कारण काय ते जाणून घ्या!

Do fry during rainy season, but watch the tide time; Learn the traditional and scientific reason! | पावसाळ्यात तळण अवश्य करा, मात्र भरती ओहोटीची वेळ पाहून; जाणून घ्या पारंपरिक आणि शास्त्रीय कारण!

पावसाळ्यात तळण अवश्य करा, मात्र भरती ओहोटीची वेळ पाहून; जाणून घ्या पारंपरिक आणि शास्त्रीय कारण!

googlenewsNext

पावसाळ्यात तळणीच्या पदार्थांचे प्रमाण जास्त असते. पण अनेकदा आपल्याला अनुभव येतो, की नेहमीचीच पाककृती असूनही ते पदार्थ कधी तेल पितात तर कधी व्यवस्थित होतात. यामागचे कारण सांगताहेत अवधूत वेलणकर. 

भरती आणि ओहोटीचा स्वयंपाकावर परिणाम होतो का ? 

उत्तर: हो

एखाद्या वर्षी दिवाळीत मोठ्या प्रमाणात चकल्या, अनारसे , शंकरपाळे केल्यावर ते पदार्थ आपण ज्या डब्यात ठेवतो, त्याच्या तळाशी खूप सारे तेल जमते, आणि ते पदार्थ ही मऊ होतात. पदार्थ करणारी व्यक्ती आणि जिन्नसाचे प्रमाण ही तेच असते परंतु त्या पदार्थांत खूप तेल शोषले जाते. बटाटेवडे / भजी केलीे तर कधी कधी ते खूप तेल पितात. ह्याचे कारण म्हणजे तो पदार्थ नेमका ओहोटीच्या वेळेत तळला गेलेला असतो. जर पदार्थ भरतीच्या वेळेत तळला गेला तर खूप कमी तेल लागते व पदार्थ ही छान होतो आणि आरोग्याच्या दृष्टीने ते चांगले असते.

भरती ओहोटीची वेळ कशी काढावी ? ती खालील प्रमाणे :

वृत्तपत्रात किंवा नेटवर ती मिळतेच पण एक साधी आणि सोपी पद्धत खाली देत आहेत. कालनिर्णयवर आजची तिथी बघावी ,उदारणार्थ आजची कृ. २ आहे , तिथी कृ. २ ×  ३/४ = १.५ , आता १.५ म्हणजे दुपारी १.३० वाजता पूर्ण भरती आहे. पूर्ण भरतीच्या साधारण 3 तास आधी तळण सुरू करावे. (सकाळी १०.३० वाजल्यापासून ते दुपारी १.३० वाजेपर्यंत)  पण जर तुम्ही दुपारी १.३० नंतर तळणाला सुरवात केलीत तर जसजशी वेळ पुढे जाईल तसतसे पदार्थ जास्त तेल शोषेल.

जेव्हा आपण मोठ्या प्रमाणात तळण करणार असू तेंव्हा ही वेळ पाळली तर पदार्थात तेल खूप कमी शोषले जाईल, पदार्थही चांगला होईल आणि ते आरोग्यासही उत्तम राहील. आमच्या घरी दिवाळीचे सर्व पदार्थ वरील पद्धतीने भरती आणि ओहोटीची वेळ बघून केले जातात. हा प्रयोग तुम्हीही अवश्य करून बघा ; विशेष करून केटरिंगचा  व्यवसाय करणार्यांनी.

आता जाणून घेऊया वैज्ञानिक कारण, सांगताहेत पुण्याचे सागर बर्वे >>

वरील पोस्टचे शास्त्रीय विश्लेषण आपण विज्ञानात शिकलो आहे की---- Attraction - Repulsion (आकर्षण विकर्षण), Ionic bond, Covalent bond ,Vanderwaal's forces, Hydrophobic (स्निग्धता / Aromatic, oily fatty principal), Rotational, Vibrational and Translational अशा मोशन व फोर्सेस असतात. ह्या भाषेत सांगितलं की अमेरिका, युरोपाचे तळवे चाटणार्या लोकांना लगेच कळतं, पण हिंदू धर्माची चाल/रीत आहे सांगितलं, की मात्र हिंदू धर्मावर जुनाट व अंध म्हणून टीका करतात.

स्पष्टीकरण: -- भरतीच्या वेळेस हायड्रोफिलिक फोर्सेस (पाणीतत्व) जास्त कार्यरत असते. केवळ समुद्राचेच नाही, तर मनुष्याच्या शरीरात असलेल्या ५-६ लीटर द्रव पदार्थ, रक्त, होर्मोन्स यावर सुद्धा परिणाम होतो, पोर्णिमा, अमावस्या, अष्टमी या तिथींना हे फोर्सेस जास्त एक्टीव असतात. म्हणून, मानसिक आजार असलेल्यांत वेडाचे झटके / अंगात येणे, चिडचिड, हे प्रकार अंगातील द्रवरूप व पाणी असलेले होर्मोन्स अप डाऊन होत असल्याने या तिथींवर मूडवर जास्त परिणाम होतो. याच तत्वाने समुद्रास भरती येणे, पाऊस कमी जास्त पडणे, आणि देवतांचे शक्तीतत्व जास्त कार्यरत असणे, हे प्रकार अष्टमी व पौर्णिमेस घडतात, कारण जलतत्व जास्त कार्यरत असते. मनास चंचल, ऊद्विग्न, डीप्रेस्ड वाटत असता मूठभर मीठ कोमट पाण्यात टाकून आंघोळ करावी, भरतीच्या वेळी जलतत्व जास्त कार्यरत असल्याने जास्त सुलभतेने मीठ विरघळू शकते, मीठात NaCl मध्ये निगेटिव शक्ती खेचून घेण्याची क्षमता असते,कारण मीठ पाण्यात विरघळले, की घन व ऋण (positive & negative) आयन्स् (प्रभारित अणू) तयार होवून ते वीजवहन करू शकतात. आपल्या शरीरात पण वीजवहन सतत सुरू असते. मीठाचे पाणी अधिक पातळ व गुळगुळीत असल्याने मल साफ करण्यास पण मदत करते. यास्तव, भरतीच्या वेळेस घरच्या बादलीत मीठ पाण्यात घालून आंघोळ केल्यास मनास शांती लाभू शकते.

तळणीचे तेल हे पाण्याच्या विरूद्ध धर्माचे (hydrophobic) असल्याने भरतीच्या वेळेत त्याचे शोषण पदार्थात कमी होते. पाण्याचे शोषण करायची पदार्थाची वृत्ती (hydrophilic) तेव्हा असते. याऊलट ओहोटी लागताच पाण्याचा प्रभाव (हायड्रोफिलीक /hydrophilic effect) व पृथ्वीवरील जलतत्वाचा परिणाम कमी होवून तैली पदार्थ (हायड्रोफोबिक/ hydrophobic ईफेक्ट) वाढतो, त्यामुळे ओहोटी लागली की तळण जास्त तेल पीत असणार. याच तत्वाने खिचडी, दाल, वरण, भाजी करताना भरतीच्या वेळेस कमी शिट्ट्या लागून शिजावे, तर ओहोटीच्या वेळेस वेळ लागू शकतो.

याच तत्वाने जास्तीत जास्त शक्ती ग्रहण करायची क्षमता असलेले देवी देवता अष्टमी, वा पौर्णिमेस अवतार घेतात. ऊदाहरणार्थ -- चैत्र पौर्णिमेस हनुमान, श्रावण पौर्णिमेस बलराम, अष्टमीस कृष्ण वा देवी, आश्विन पौर्णिमेस शिववक्ती भ्रमण, मार्गशीर्ष पौर्णिमेस दत्तात्रेय ईत्यादी.

त्यामुळे 'तळण तळणे व भरती ओहोटी' ही माहिती अतिशय परिपूर्ण व शास्त्रीय असून त्यात भयानक, खोटे, हिंदू धार्मिक, अंधश्रद्धा वगैरे काही नाही, हे लक्षात ठेवा.

पृथ्वी तालावर ७० टक्के पाणी नि मानवी शरीरातही ७० टक्के पाण्याचे प्रमाण म्हणून भरती ओहटीचा समुर्द्रवर व मानवी शरीरातील पाण्यावर परिणाम होतो हे माहीतच होते पण अन-धान्य नि पाकशास्त्रावरही भरती ओहतीचा परिणाम होतो हे नक्की!

Web Title: Do fry during rainy season, but watch the tide time; Learn the traditional and scientific reason!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.