एक ते दहा अंकाचे धार्मिकदृष्ट्या महत्त्व काय आहे, हे माहित आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 10:13 AM2021-03-25T10:13:12+5:302021-03-25T10:13:38+5:30
व्यावहारिक गणिताबरोबर पारमार्थिक अंकगणित आपण शिकून घेऊया आणि पुढच्या पिढीला शिकवुया, म्हणजे त्यांच्याही आयुष्याचे गणित चुकणार नाही.
शालेय वयापासून अंकगणिताशी आपला संपर्क येतो, ते थेट आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत! परंतु जिथे व्यवहार नसून केवळ निस्सीम प्रेम असते, त्या अध्यात्म मार्गातही अंकगणिताचे वेगळे महत्त्व आहे, हे अलिकडेच वाचनात आले. ती माहिती वाचून आपले आयुष्य व्यापून टाकणाऱ्या गणिताची उकल झाली.
एक चा अर्थ - ईश्वर एक आहे.
दोन चा अर्थ - ईश्वर आणि जीव मिळून सृष्टी बनली आहे.
तीन चा अर्थ - तीन लोक आहेत- स्वर्ग, मृत्यू, पाताळ
चार चा अर्थ - चार वेद आहेत- ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद
पाच चा अर्थ - पाच तत्त्व आहेत - पृथ्वी, जल, अग्नि, आकाश, वायू
सहा चा अर्थ - सहा ऋतू आहेत- वसंत, वर्षा, ग्रीष्म, शरद, हेमंत, शिशिर.
सात चा अर्थ - सात सूर आहेत - सा, रे, ग, म, प, ध, नी, सां किंवा वैज्ञानिक दृष्टीने सूर्याच्या किरणांमध्ये सात रंग असतात.
आठ चा अर्थ - एक दिवस आणि एक रात्र यामध्ये आठ प्रहर असतात.
नऊ चा अर्थ - नवविधा भक्ती आहेत - श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चना, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन
दहा चा अर्थ - दहा दिशा आहेत - पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आकाश, पाताळ, नैऋत्य, वायव्य, ईशान्य, आग्नेय. याशिवाय दिग्पाल देखील दहा आहेत. इंद्रमय, कुबेर, वरूण, ब्रह्मा, विष्णू, रुद्र, अग्नि, नैऋत्य, पवन.
आहे ना मजेशीर? व्यावहारिक गणिताबरोबर पारमार्थिक अंकगणित आपण शिकून घेऊया आणि पुढच्या पिढीला शिकवुया, म्हणजे त्यांच्याही आयुष्याचे गणित चुकणार नाही.