जे लोक सातत्याने नामस्मरण करतात त्यांच्यात कोणकोणते बदल घडतात माहितीय? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 02:36 PM2023-04-07T14:36:30+5:302023-04-07T14:36:53+5:30

नामस्मरण सातत्याने करावे असे सर्व संत सांगतात. ते केल्याने होणारे फायदे लक्षात घेतले तर तुम्हीदेखील नामस्मरण सुरु कराल!

Do you know what changes happen in people who recite Naamsramaan consistently? Read on! | जे लोक सातत्याने नामस्मरण करतात त्यांच्यात कोणकोणते बदल घडतात माहितीय? वाचा!

जे लोक सातत्याने नामस्मरण करतात त्यांच्यात कोणकोणते बदल घडतात माहितीय? वाचा!

googlenewsNext

नामस्मरणाचे महत्त्व सांगणारे संतांचे अनेक अभंग आपण ऐकले आहेत. समाज माध्यमावर त्या संदर्भात एक छान लेख वाचण्यात आला. ती माहिती पाहता कदाचित आपला विश्वास बसणार नाही, मात्र नामस्मरण घेऊ लागल्यावर त्याची प्रत्यक्ष अनुभूती येते हे नक्की!

निश्चित्तच चमत्कार म्हणु अशा घटना आपल्या आयुष्यात नामस्मरणामुळे घडतात. सर्वप्रथम आपण अबोल होतो. एकांताची आवड निर्माण होते. बहुतेक संतांची चरित्रे वाचल्यावर आपल्या हेच लक्षात येईल. ते सुरुवातीला एकांतात होते. समाजापासुन अलिप्त रहात होते. साधना पुर्ण झाल्यावरच त्यांनी लोकांत मिसळायला सुरुवात केली....

  • सुरुवातीला डोक्यामध्ये विचारांची खुप गर्दी होते. इतके दिवस षड् रिपु आपल्या मनात ठाण मांडून बसलेले असतात. त्यांच्यावर नामस्मरणाने हल्ला होतो. ते आपली जागा सोडू लागतात. मनात विचारांची गर्दी होणे, हे चांगले लक्षण आहे. काही साधकांना ही पायरी कळत नाही. ते घाबरुन नामस्मरण करणे सोडून देतात......
  • काही दिवसांनी झोपेतही जप चालू होतो. जप वैखरीतून मध्यमा वाणीत आल्याचे ते लक्षण आहे......
  • शांत झोप लागते. वेळेवर जागही येते.......
  • पशु पक्षीही साधकांना घाबरत नाहीत.साधना योग्य दिशेने जाते, हे समजण्याचे एक महत्त्वाचे लक्षण आहे.......
  • स्वप्नात अतृप्त आत्मे येत नाहीत. नामस्मरणाने साधकाच्या सभोवती एक संरक्षक कवच तयार झालेले असते, त्यामुळे आत्म्यांना प्रवेश मिळत नाही......
  • राग येत नाही. हे ही साधना व्यवस्थित चालल्याची खुण आहे. नामस्मरण करुनही तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही नीतीनियम पाळण्यामध्ये कमी पडता, असाच त्याचा अर्थ होतो......
  • क्रमाक्रमाने कुंडली शुद्ध होत जाते. त्या अनुषंगाने घटना घडत जातात. नामस्मरण हे ग्रहांवरही मात करणारे आहे.....
  • कुंडलीतल्या प्रत्येक स्थानाला नाव आहे. उदा. प्रथम स्थान हे स्वभाव स्थान, द्वीतिय स्थान हे धनस्थान, तृतीय स्थान हे पराक्रम स्थान वगैरे.
  • साधकाची प्रगती होत गेल्यावर कुंडलीतली स्थाने शुद्ध होत गेली की त्याप्रमाणेच अनुकूल घटना घडू लागतात.....
  • आश्चर्य म्हणजे सर्वसामान्य लोकांनी ऐहिक सुखासाठीच सुरुवातीला नामस्मरणाची कास धरलेली असते, पण जशी साधना पुढे जात रहाते, तशी त्यांची वासना कमी कमी होत जाते.....

नामस्मरणावर खुप काही लिहिण्यासारखं आहे.जितके सांगावे,तितके कमीच!!!

Web Title: Do you know what changes happen in people who recite Naamsramaan consistently? Read on!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.