तुम्हाला तव्यावरची गरमागरम पोळी आवडते? थांबा! वास्तुशास्त्राने सांगितलेल्या महत्त्वपूर्ण सूचना जाणून घ्या ... 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 02:53 PM2022-01-28T14:53:52+5:302022-01-28T14:54:21+5:30

'असतील शिते तर जमतील भुते' ही म्हण आपण ऐकली आहे. दारिद्रय आपल्या घराचे दार ठोठवू नये यासाठी वास्तुशास्त्राच्या सूचनांचे पालन करा. 

Do you like hot roti direct come from tawa? Wait! Learn the important instructions given by Vastushastra ... | तुम्हाला तव्यावरची गरमागरम पोळी आवडते? थांबा! वास्तुशास्त्राने सांगितलेल्या महत्त्वपूर्ण सूचना जाणून घ्या ... 

तुम्हाला तव्यावरची गरमागरम पोळी आवडते? थांबा! वास्तुशास्त्राने सांगितलेल्या महत्त्वपूर्ण सूचना जाणून घ्या ... 

googlenewsNext

दिवसभर राबून आपण कष्ट करतो ते कशासाठी? तर दोन वेळचे जेवण सुखासुखी मिळावे यासाठी! रोज शिरापुरीचा स्वयंपाक नसला तरी निदान मीठ भाकरी वर सगळ्यांची गुजराण होते. म्हणून वास्तुशास्त्र सांगते, आपण ज्या भांड्यांमध्ये अन्न शिजवतो, रांधून वाढतो ती भांडी कधीच उष्टी खरकटी ठेवू नयेत. रात्री झोपण्यापूर्वी आपण आपला ओटा जसा स्वच्छ करतो तशीच भांडी घासून टाकावीत. त्या स्वच्छतेमुळे अन्नपूर्णा देवी संतुष्ट होते आणि आशीर्वाद देते. 

>>आजच्या काळात नोकरी व्यवसाय करणाऱ्या महिलांना दिवसभराचा थकवा पेलून रात्री भांडी घासून झोपणे शक्य होत नाही, त्या ते काम मोलकरणीसाठी ठेवून देतात. काही गोष्टींचे नाईलाजाने पालन करता आले नाही तरी पर्यायी व्यवस्थेचा जरूर वापर करावा. ती पर्यायी व्यवस्था म्हणजे आपल्याला दोन वेळेच्या पोळ्या-भाकरी रांधून देणारी भांडी अर्थात पोळपाट,  लाटणे स्वच्छ धुवून जागेवर ठेवावे. एवढे तर आपण करूच शकतो ना? या एका नियमाबरोबरच आणखी चार गोष्टींचे पालन करा, जेणेकरून तुमच्या आर्थिक स्थितीला धक्का लागणार नाही. 

>> अनेकांना तव्यावरची गरम पोळी आवडते. परंतु शास्त्र सांगते, गरम अन्न ताटात घ्यावे, त्याचा नैवेद्य दाखवावा, कावळ्याला, कुत्र्याला भाकर तुकडा वाढावा मग निवांत बसून खावे. आधाशीपणे किंवा हातात  खाणे दारिद्रयास कारण ठरते. 

>>पहिली पोळी-चपाती-भाकरी गायीला, कुत्र्याला  कावळ्याला दिल्याने घरात आर्थिक वृद्धी होते. सर्व जीवांना संतुष्ट करून मग मग आपण जेवावे अशी आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. त्यालाच वास्तूचा दुजोरा आहे. वास्तू तेव्हाच तृप्त होते, जेव्हा तेथील जीव संतुष्ट असतात. 

>>गरम तव्यावर पाणी टाकू नये. त्यावर ओरखडे येतील अशी घासणी वापरू नये. तवा पोळपाट नेहमी स्वच्छ आणि गुळगुळीत असावा. 

Web Title: Do you like hot roti direct come from tawa? Wait! Learn the important instructions given by Vastushastra ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.