तुम्हालाही श्रीमंत व्हायचे आहे का? गौर गोपाल दास कोणता सोपा उपाय सांगतात बघा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 06:05 PM2021-08-20T18:05:02+5:302021-08-20T18:05:30+5:30

आपल्यालाही आपली क्षमता ओळखणे गरजेचे आहे. फक्त ती ओळखाताना आपल्या क्षमतेवर स्वतःहून मर्यादा घालून घेऊ नका.

Do you want to be rich too? See what Gaur Gopal Das says! | तुम्हालाही श्रीमंत व्हायचे आहे का? गौर गोपाल दास कोणता सोपा उपाय सांगतात बघा!

तुम्हालाही श्रीमंत व्हायचे आहे का? गौर गोपाल दास कोणता सोपा उपाय सांगतात बघा!

googlenewsNext

श्रीमंत व्हावे, सर्व प्रकारच्या सुख सुविधा मिळाव्यात आणि ऐषोआरामी जीवन जगावे असे प्रत्येकाला वाटते. यासाठीच प्रत्येकाचा आयुष्यभर खटाटोप सुरू असतो. श्रीमंत कोणीही होऊ शकतो. प्रत्येकाकडे तेवढी क्षमता आहे, परंतु ती किती प्रमाणात आहे हेच आपण आजमावून पाहत नाही, त्यामुळे अयशस्वी राहतो. 

पाण्याच्या बाटलीचे उदाहरण घ्या. काचेची, प्लॅस्टिकची, तांब्याची आणखी अनेक प्रकारची, रंगाची पाण्याची बाटली आपण पाहिली असेल. सगळ्या पाण्याच्या बाटल्या थेट झाकणापर्यंत काठोकाठ भरलेल्या असतात. त्यांच्यात फरक पडतो, तो केवळ आकारामानानुसार!

समजा तुमच्याकडे पाण्याची बाटली अर्धा लिटरची असेल आणि त्यात तुम्ही एक लिटर पाणी भरू पाहत असाल, तर बाटलीच्या क्षमतेबाहेरचे पाणी वाहून जाईल. याउलट तुमच्याकडे एक लिटर ची पाण्याची बाटली आहे आणि त्यात तुम्ही तर अर्धा लिटरच पाणी भरणार असाल तर त्या बाटलीची अर्धी क्षमता तुम्ही वाया घालवत आहात. याचाच अर्थ आपल्याला बाटलीची क्षमता पाहून त्यात किती पाणी भरायचे हे ठरवले पाहिजे. 

याप्रमाणे आपल्यालाही आपली क्षमता ओळखणे गरजेचे आहे. फक्त ती ओळखाताना आपल्या क्षमतेवर स्वतःहून मर्यादा घालून घेऊ नका. तुम्हाला आधी अमर्याद प्रयत्न करावे लागतील, ते योग्य दिशेने असावे लागतील, तरच भविष्यात तुम्हाला तुमच्या मर्यादेची जाणीव आपोआप होईल. त्याआधीच स्वतःच्या कक्षा मर्यादित ठेवू नका. थकेपर्यंत मेहनत करा. मग तुम्ही लक्षाधीश व्हायचे की कोट्याधीश हे नियतीला ठरवू द्या. मात्र तुम्ही प्रयत्न सोडू नका. एक ना एक दिवस तुम्हीही नक्कीच श्रीमंत व्हाल- परिस्थितीने, अनुभवाने आणि मनाने!

Web Title: Do you want to be rich too? See what Gaur Gopal Das says!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.