प्रयत्न सोडू नका. भूतकाळात रमू नका. वर्तमानात जगा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 03:54 AM2020-07-09T03:54:52+5:302020-07-09T03:55:11+5:30

‘चरैवेति’ हा शब्द गौतमबुद्ध उपदेश करताना सांगायचे. अथक परिश्रम करा. चालत राहा.

Don't give up trying. Don't dwell on the past. Live in the present | प्रयत्न सोडू नका. भूतकाळात रमू नका. वर्तमानात जगा

प्रयत्न सोडू नका. भूतकाळात रमू नका. वर्तमानात जगा

Next

 - शैलजा शेवडे

चरन वै मधु विंदति चरन स्वादुमुदंबरम।
सूर्यस्य पश्य श्रेमाणं यो न तंद्रयते चरंश्चरैवेति।’
ऐतरेय ब्राह्मणमधील चरैवेति चरैवेति या ५ सुक्तांनी किती जणांना प्रेरणा दिली आहे. चालत रहा. चालत रहा...
चरैवेति, चरैवेति सदा चालत रहा रे तू,
गतिशीलता तुझी ओळख, सदा चालत रहा रे तू।
नसे अस्तित्व काही ते, तुझ्या त्या भूतकाळाला,
उडालेली असे धूळ ती, आणि नुसताच पाचोळा,
नको अडकू, नको थांबू , सदा चालत रहा रे तू,
चरैवेति, चरैवेति, सदा चालत रहा रे तू।
तुझी पावले फुले होतील, चालता चालतांना ती
चेतनेच्या डहाळीला फळे मग, चालतांना ती,
निघून जातील दुष्कर्मे, श्रमानेच ती, पहा रे तू,
चरैवेति चरैवेति सदा चालत रहा रे तू।
जरी करशील आळस तू, भाग्यही, मग निजेल ते,
करशील संकल्प चालण्याचा, भाग्य होईल जागे ते,
निरंतर चालतांना ते, भाग्य दे साथ, पहा रे तू,
चरैवेति चरैवेति सदा चालत रहा रे तू।
कलियुग ते जणू काही, असे निष्क्रि य जेव्हा तू,
असे द्वापार युगच ते, उठशील आणि जेव्हा तू,
अवतरेल, त्रेता आणि सत्ययुग ते, चालतांना तू,
चरैवेति, चरैवेति, सदा चालत रहा रे तू।
गतीशीलास फळे मिळती, गतीशीलास मधू मिळतो,
बघ सूर्यास आकाशी, अविरत भ्रमण कसा करतो,
असे आदर्श तुझा पथिका, तोची सूर्य हे जाण रे तू,
चरैवेति चरैवेति सदा चालत रहा रे तू।
‘चरैवेति’ हा शब्द गौतमबुद्ध उपदेश करताना सांगायचे. अथक परिश्रम करा. चालत राहा. आपला आदर्श सूर्य आहे. जो सतत चालून आपल्याला प्रकाश देतो. आरोग्य देतो. नदीचा प्रवाह वाहता असतो. अनेक खडकांना फोडून पुढे जातो. आपल्याला निर्मल जल मिळते. आळसात वेळ वाया घालवू नका. कितीही अडचणी येवोत, प्रयत्न सोडू नका. भूतकाळात रमू नका. वर्तमानात जगा!
 

Web Title: Don't give up trying. Don't dwell on the past. Live in the present

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.