कावळ्याची काव काव दुर्लक्षू नका, त्यायोगे मिळू शकतात 'हे' शुभ तसेच अशुभ संकेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 11:52 AM2022-03-14T11:52:06+5:302022-03-14T11:53:37+5:30

दैनंदिन जीवनाशी संबंधित काही चिन्हे जीवनात शुभ- अशुभ संकेत दर्शवतात. यावरून कळते की धनलाभ होणार की आर्थिक अडचणी येणार?

Don't ignore the crow's crow crow, it can get 'this' auspicious and non auspicious sign! | कावळ्याची काव काव दुर्लक्षू नका, त्यायोगे मिळू शकतात 'हे' शुभ तसेच अशुभ संकेत!

कावळ्याची काव काव दुर्लक्षू नका, त्यायोगे मिळू शकतात 'हे' शुभ तसेच अशुभ संकेत!

googlenewsNext

आपल्याला कावळ्याची काव काव कटकट वाटते, पण संत ज्ञानेश्वर त्यातूनही शुभ संकेत शोधत म्हणतात, 'पैल तोगे काऊ कोकताहे, शकुन गे माये सांगताहे' यावरून ज्योतिष शास्त्र सुद्धा कावळ्याच्या बोलण्याचा संबंध शुभ-अशुभाशी कसा जोडला गेला ते सांगत आहे. 

शुभ-अशुभ चिन्हांचा आपल्या जीवनावर सकारात्मक-नकारात्मक प्रभाव पडत असतो. आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी आणि घटना घडत असतात ज्या चांगल्या आणि वाईट संकेत दर्शवतात. हे शकुन शतकानुशतके प्रचलित आहेत. आज आपण अशा पक्ष्याशी संबंधित शकुन आणि अपशकुनाबद्दल जाणून घेणार आहोत, जो सर्वत्र आढळतो. हा पक्षी आहे कावळा. कावळ्याशी संबंधित असलेल्या चांगल्या आणि वाईट लक्षणांबद्दल जाणून घेऊ. 

कावळ्याशी संबंधित ही लक्षणे धनवृद्धीची चिन्हे दर्शवतात 

>>जर कावळा चोचीने माती खरडताना दिसला तर समजा तुम्हाला कुठूनतरी खूप पैसा मिळणार आहे. हे चिन्ह खूप शुभ मानले जाते.

>>त्याचबरोबर सकाळी घराच्या छतावर किंवा घरासमोर कावळ्याची दीर्घकाळ काव काव शुभ मानली जाते. हे घडणे एखाद्या पाहुण्यांच्या आगमनाचे लक्षण आहे, तसेच हा कार्यक्रम मान-सन्मान आणि पैसा मिळण्याचेही लक्षण आहे.

>>तुम्ही काम करत असताना एखादा कावळा काव काव करून लक्ष वेधून घेत असला तर ते समस्येतून मुक्त होण्याचे लक्षण आहे.

>>आपल्या नेहमीच्या वाटेवर कावळे पाणी पिताना दिसले तर ते धनलाभाचे स्पष्ट लक्षण आहे.

या शुभ लक्षणांबरोबर काही अशुभ संकेतही मिळतात, ते पुढीलप्रमाणे - 

>>जर एखाद्या स्त्रीच्या डोक्यावर कावळा बसला तर ते तिच्या कुटुंबावर संकट दर्शवते. 

>>बाहेर जाताना एखाद्या रुक्ष झाडावर गिधाड बसलेले दिसले तर तेही अशुभ लक्षण आहे. तिथून मार्ग बदला. 

>>घराच्या छतावर गरुड बसलेले दिसणे हे देखील संकटाचे लक्षण आहे.

>>जर एकाच वेळी भरपूर कावळे कोकलत असतील तर कुटुंब प्रमुखाची तब्येत बिघडू शकते. 

Web Title: Don't ignore the crow's crow crow, it can get 'this' auspicious and non auspicious sign!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.