नात्यांचा गुंता सोडवण्यासाठी डॉ. राजीमवाले यांचे live मार्गदर्शन लोकमत भक्ती युट्युब चॅनेलवर!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 08:00 AM2021-05-06T08:00:00+5:302021-05-06T08:00:02+5:30
सद्यस्थितीतील या महत्त्वपूर्ण प्रश्नाची उकल जाणून घेण्यासाठी आपणही या चर्चासत्रात अवश्य सहभागी व्हा. ७ मे २१ रोजी रात्री ८ वाजता लोकमत भक्ती या युट्युब चॅनेलवर!
नातं जोडणं सोपं आहे, पण टिकवणं अतिशय कठीण आहे. विशेषतः आजच्या काळात! कारण संवादाची माध्यमे वाढली, पण त्याबरोबरीने विसंवाद वाढू लागला आणि आपोआपच नात्यातील दरी वाढू लागली. लोक दुरावू लागली. नाती दुभंगू लागली. यावर वेळीच उपाय केले नाहीत, तर एक एक करत समाज विस्कळीत होईल. याच नाजूक विषयावर चर्चा करण्यासाठी डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले ७ मे रोजी रात्री ८ वाजता लोकमत भक्ती या युट्युब चॅनेलवर लाईव्ह येणार आहेत. नात्यांशी संबंधित अनेक प्रकारच्या प्रश्नांनवर अभिनेत्री परी तेलंग त्यांना बोलते करणार आहेत.
डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले हे शिवपुरी अक्कलकोटचे परम सद्गुरु श्री गजानन महाराज यांचे नातू आहेत. तसेच ते अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ गुरूंच्या वंशातील आहेत. राजीमवाले कुटुंब मध्य भारतातील महाकोसल येथील राजेशाही कुटुंब म्हणून ओळखले जाते. १८०० सालापासून जनकल्याणासाठी झटण्याची परंपरा या कुटुंबाला लाभली आहे.
अक्कलकोट येथे अग्निहोत्राच्या प्राचीन सर्वोत्तम प्रथेचे डॉ. पुरुषोत्तम यांनी पुनरुज्जीवन केले आणि उपचार, शांतीचा संदेश जगाला देण्यासाठी शिवपुरीच्या आश्रमाची स्थापना केली. त्यांनी आपले संपूर्ण बालपण अक्कलकोटच्या मठात आध्यात्मिकदृष्ट्या भारावलेल्या वातावरणात, महान योगी व संतांसोबत व्यतीत केले आहे. तसेच त्यांचे वडील श्रीकांतजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गुरु परंपरेनुसार प्राचीन विद्या आत्मसात केली. डॉ. पुरुषोत्तम यांच्या वडिलांनी संस्कृतमध्ये पीएचडी करताना वैदिक साहित्यात विशेषज्ञता प्राप्त केली होती. वडिलांकडून वेदाभ्यासाचे धडे घेत त्यांनी आयुर्वेद, योग ते तत्वज्ञान आणि वैदिक विज्ञान इ. विषयांचाही अभ्यास केला. समग्र दृष्टिकोन ठेऊन, निसर्गाच्या सानिध्यात राहत आरोग्य व निरोगी आयुष्य कसे जगायचे, याची प्राचीन शिकवणी त्यांनी घेतली.
सद्यस्थितीतील या महत्त्वपूर्ण प्रश्नाची उकल जाणून घेण्यासाठी आपणही या चर्चासत्रात अवश्य सहभागी व्हा. ७ मे २१ रोजी रात्री ८ वाजता लोकमत भक्ती या युट्युब चॅनेलवर!