Dreams: स्वप्न पूर्ण होवो न होवोत, स्वप्न पाहत राहा, तरच होतील ‘हे’ फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 08:39 PM2021-06-11T20:39:03+5:302021-06-11T20:41:09+5:30

Dreams: मनी वसे ते स्वप्नी दिसे, असे म्हटलेच आहे. स्वप्न पाहण्याचे काही फायदे सांगितले जातात. जाणून घेऊया...

dreams gives motivation to move forward and know benefits of dreams | Dreams: स्वप्न पूर्ण होवो न होवोत, स्वप्न पाहत राहा, तरच होतील ‘हे’ फायदे!

Dreams: स्वप्न पूर्ण होवो न होवोत, स्वप्न पाहत राहा, तरच होतील ‘हे’ फायदे!

googlenewsNext

माणूस हा स्वप्नाळू आहे, असे म्हटले जाते. आयुष्य जगत असताना अनेकविध स्वप्न माणूस पाहात असतो. स्वप्न ही प्रत्येक माणसाला मिळालेली एक चमत्कारिक गोष्ट आहे. वास्तविक पाहता झोपेतील स्वप्ने अनेकदा आठवतही नाहीत. मात्र, काही स्वप्न अशी असतात की, जी कायम स्मरणात राहतात. एकदा झोपल्यावर काय स्वप्न पडेल, हे आपल्या हातात नसते. परंतु, तरीही स्वप्न हवीहवीशी वाटत असतात. मनी वसे ते स्वप्नी दिसे, असे म्हटलेच आहे. स्वप्न पाहण्याचे काही फायदे सांगितले जातात. जाणून घेऊया...

स्वप्नच नसतील तर...

माणूस हा आशावादी प्राणी आहे. माणसाने स्वप्न पाहणे सोडून दिले, तर माणसाचे जग निरस होऊन जाईल. जीवन एखाद्या भयाण गुहेप्रमाणे भासू लागेल. माणसाची प्रगती खुंटेल. नकारात्मकता वाढेल. नवनिर्मितीचा लवलेशही नसलेल्या नापीक, खडकाळ जमिनीप्रमाणे माणसाच्या मनाची स्थिती होईल, असे म्हटले जाते. 

कासवाकृती नक्षीदार अंगठी तुम्हीसुद्धा वापरता का? जाणून घ्या त्या अंगठीशी निगडित गोष्टी!

सकारात्मक राहण्याची प्रेरणा

स्वप्न हे माणसाच्या आयुष्यतील जणू एक मृगजळ आहे. विस्तीर्ण आणि रखरखलेल्या वाळवंटात एखादे मृगजळ माणसाला सकारात्मकता देते. त्याचप्रमाणे माणसाने पाहिलेले स्वप्न किंवा त्याला पडलेली स्वप्ने एक आशेचा किरण देतात. ज्याप्रमाणे बिजाशिवाय वृक्ष उभा राहू शकत नाही; त्याचप्रमाणे स्वप्नांशिवाय माणूस सकारात्मकतेच्या पायावर उभा राहू शकत नाही. स्वप्न हे समृद्धीचे बीज किंवा उगमस्थान असते, असे मानले जाते. 

अनेक प्रकारचे वास्तू दोष दूर करण्यासाठी कापराचा छोटासा तुकडाही पुरेसा 

स्वप्न पाहण्याचे अनेक फायदे

आपल्याला पडणाऱ्या स्वप्नांचे किंवा एखाद्या माणसाने पाहिलेल्या स्वप्नाचे अनेक फायदे असल्याचे सांगितले जाते. स्वप्नांमुळे मनाला उभारी मिळते, सकारात्मकता मिळते, ऊर्जा मिळते, आशावाद कायम जागृत राहतो, प्रेरणा मिळते, मनाला शांतता मिळते, पुढे जाण्याची ऊर्मी मिळते, नवनिर्मितीची कल्पकता स्वप्नातून मिळते. माणूस साहस करतो, धाडस करतो, समृद्ध होतो, असे सांगितले जाते. ध्येय, काहीतरी मिळवण्याची इच्छा, यशापर्यंतचा टप्पा यांसह पाहिलेली स्वप्ने माणसाला प्रगतीशील बनवतात. 

जेव्हा मदतीचे सगळे दोर तुटतात, तेव्हाच लढण्याची जिद्द बळावते!

ध्येयपूर्तीसाठी प्रेरणा आणि बळकटी

जागतिक स्तरावर करोडो व्यक्ती सापडतील की,  स्वप्नांच्या भक्कम पायांवर त्यांनी यशोशिखर गाठले आहे. ध्येय हे कर्म करण्याची प्रेरणा देते, तर स्वप्न हे त्याला बळकटी देण्याचे काम करते. यामध्ये कष्ट, मेहनत, सातत्य, परीश्रम, जिद्द, त्याग, प्रचंड इच्छाशक्ती आलीच. मात्र, स्वप्नांचा एक भक्कम आधारही आला, ज्यामुळे निरंतर कार्यरत राहण्याची ऊर्मी मिळते. स्वप्न हा प्रचंड ऊर्जास्रोत आहे, असेही मानले जाते. 

परंतु, अवाक्याबाहेरच्या स्वप्नांमुळे अनेकदा अपयश, निराशा पदरी पडू शकते. असे असले तरी स्वप्न पाहणे सोडू नये. अपयश ही यशाची पहिली पायरी असते, असे म्हणतात. त्यामुळे आयुष्यातील आणखी एक अनुभव, असे समजून पुन्हा स्वप्न पाहावे आणि पुन्हा कार्यरत व्हावे.
 

Web Title: dreams gives motivation to move forward and know benefits of dreams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.