दुर्योधन आपले पाप कृष्णाला अर्पण करायला निघाला होता; स्वामी रामकृष्ण परमहंस यांनी सांगितलेला दृष्टांत!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 04:45 PM2021-03-15T16:45:00+5:302021-03-15T16:45:02+5:30

निरिच्छ मनाने केलेले कोणतेही सत्कर्म , सेवा ईश्वराच्या चरणी रुजू होते. संसारात राहूनही कर्मयोग साधता येतो.

Duryodhana had set out to offer his sins to Krishna; Vision told by Swami Ramakrishna Paramahansa! | दुर्योधन आपले पाप कृष्णाला अर्पण करायला निघाला होता; स्वामी रामकृष्ण परमहंस यांनी सांगितलेला दृष्टांत!

दुर्योधन आपले पाप कृष्णाला अर्पण करायला निघाला होता; स्वामी रामकृष्ण परमहंस यांनी सांगितलेला दृष्टांत!

Next

स्वामी विवेकानंद यांचे गुरु स्वामी रामकृष्ण परमहंस यांची आज जयंती आहे. फाल्गुन शुक्ल द्वितीयेला त्यांचा जन्म झाला. तिथीनुसार आज म्हणजे १५ मार्च रोजी त्यांची जयंती आहे. रामकृष्ण परमहंस महाकाली मातेचे परमभक्त होते. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी स्वामी विवेकानंदांना तसेच समस्त शिष्यगणांना शिकवलेला कर्मयोग आपणही समजून घेऊया. 

कर्मयोग म्हणजे कर्मातून केलेली ईश्वर सेवा. निरिच्छ मनाने केलेले कोणतेही सत्कर्म , सेवा ईश्वराच्या चरणी रुजू होते. संसारात राहूनही कर्मयोग साधता येतो. आपल्या व्यावहारिक जबाबदाऱ्या सांभाळून ईश्वर प्राप्ती हे ध्येय ठेवून कर्मयोग आत्मसात करता येतो. त्यामुळे आपोआपच विषयातील आसक्ती कमी होऊन ईश्वर चरणी मन गुंतून राहते. 

कर्मातून कोणाचीही सुटका होऊ शकत नाही. साधा विचार करणे, हे सुद्धा कर्म आहे परंतु त्या विचारात भगवंत आहे किंवा भगवंताच्या कार्याचा विचार आहे, तर तो देखील कर्मयोगच आहे. आपले प्रत्येक कर्म भगवंताला समर्पित करण्याच्या हेतूने धार्मिक विधींमध्ये शेवटी पळीभर पाणी ताम्हनात सोडून श्री कृष्णार्पणमस्तु म्हणतात. आपण जे देवाला अर्पण करतो, त्याच्या हजार पट पुण्य आपल्या पदरात पडते. म्हणून कर्म करताना विचारपूर्वक केले पाहिजे. 

दुर्योधन आपले कुकर्म अर्थात पाप श्रीकृष्णाला अर्पण करायला निघाला होता, तेव्हा भीमाने त्या सावध करत म्हटले, तू जेवढी पापं कृष्णाच्या चरणी वाहशील त्याच्या हजार पट  पाप तुझ्या माथ्यावर चढेल. त्याचप्रमाणे आपणही भगवंताच्या चरणी चांगले विचार, चांगले कार्य आणि चांगले योगदानच अर्पण केले पाहिजे, तरच हजार पट पुण्य आपल्या पदरात पडेल. 

प्रेम करायचेच असेल तर भगवंतावर करा. एकदा का त्याच्या प्रति आसक्ती निर्माण झाली, की अन्य भौतिक सुखांची गोडी वाटणार नाही. ती सुखं क्षणभंगुर आहेत, हे जाणवत राहील आणि तुम्ही कर्मयोगापासून कधीच दूर होणार नाही. आपले काम प्रामाणिकपणे करणे आणि भगवंताला साक्ष ठेवून करणे हा खरा भक्तियोग!

रामकृष्ण परमहंस यांचे सुंदर विचार आचरणात आणून स्वामी विवेकानंद यांनी स्वतःचा आणि साऱ्यांचा जसा उत्कर्ष केला, तसा आपणही आपल्या आयुष्यात कर्मयोग अंगिकारण्याचा प्रयत्न करूया. 

Web Title: Duryodhana had set out to offer his sins to Krishna; Vision told by Swami Ramakrishna Paramahansa!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.