कानावरील केस धन संपन्नतेचे लक्षण? चला जाणून घेऊया समुद्र शास्त्रातील 'कान'गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 05:03 PM2022-03-24T17:03:59+5:302022-03-24T17:04:16+5:30

कानावरील केस हे श्रवण यंत्रासाठी सुरक्षा कवच म्हणून काम करतात. काहींना ते जास्त असतात तर काहींना कमी. याबाबत समुद्र शास्त्र काय सांगते ते पाहू.

Ear hair is a sign of wealth? Let's find out now from oceanography! | कानावरील केस धन संपन्नतेचे लक्षण? चला जाणून घेऊया समुद्र शास्त्रातील 'कान'गोष्टी!

कानावरील केस धन संपन्नतेचे लक्षण? चला जाणून घेऊया समुद्र शास्त्रातील 'कान'गोष्टी!

googlenewsNext

आजवर आपण अनेक लेखातून समुद्र शास्त्रानुसार शारीरिक अवयवांची आपल्या भाग्याशी सांगड कशी घातली जाते हे वाचले आहे. आज आपण कानाच्या रचनेवरून किंवा कानावर असलेल्या केसांवरून व्यक्तिमत्त्वाचे गुण आणि त्याचे भाग्य याबद्दल जाणून घेणार आहोत. 

* असे म्हणतात की ज्यांचे कान गोलाकार असतात, असे लोक खूप भाग्यवान असतात. असे लोक अपार संपत्ती, वैभव मिळवून आनंदाने जगतात.

* असे म्हणतात की ज्यांच्या कानाची पाळी जाड असते, अशा लोकांचा देवावर खूप विश्वास असतो. असे लोक आपले संपूर्ण आयुष्य कर्तव्य आणि भक्ती यांची सांगड घालून व्यतीत करतात. त्यांची देवावर पूर्ण श्रद्धा असते.

* असे म्हणतात की ज्या लोकांचे कान माकडासारखे वरच्या दिशेने उंचावलेले असतात, ते लोक स्वार्थी असतात तसेच ते लोभी, रागीट आणि अहंकारी असतात.

* असे म्हणतात की ज्यांच्या कानावर कुरळे केस असतात ते खूप हुशार आणि स्वार्थी असतात. असे लोक पैसे मिळवण्यासाठी वाम मार्गाचाही अवलंब करू शकतात.

* असे म्हणतात की ज्या लोकांच्या कानावर छोटे लहान असतात, अशा व्यक्ती धनहीन आणि निरुपयोगी असतात. अशा लोकांचे आयुष्य भीतीच्या सावटाखाली निघून जाते.

* असे म्हणतात की ज्या लोकांचे कान मोठे असतात, असे लोक आपल्या बुद्धिमत्तेने पैसा कमावतात आणि असे लोक बहुश्रुत आणि श्रीमंत देखील असतात. 

* असे म्हणतात की ज्या व्यक्तींचे कान लांब किंवा गणपतीच्या कानासारखे असतात ते अतिशय चतुर असतात. 

Web Title: Ear hair is a sign of wealth? Let's find out now from oceanography!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.