निद्रानाश तसेच कौटुंबिक कलहावर प्रभावी उपासना : रात्रीसूक्त!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 06:06 PM2021-07-05T18:06:45+5:302021-07-05T18:07:03+5:30

रात्रिसूक्ताचे वाचन केल्याने आळस, नैराश्य, तमोगुण कमी होऊन आंतर्प्रेरणेने, आतंरस्फुर्तीने नित्य व्यवहार उत्तम होतो. निद्रा नाशावर हे सूक्त अतिशय प्रभावी आहे. 

Effective Worship on Insomnia and Family Conflict: Ratrisuktam! | निद्रानाश तसेच कौटुंबिक कलहावर प्रभावी उपासना : रात्रीसूक्त!

निद्रानाश तसेच कौटुंबिक कलहावर प्रभावी उपासना : रात्रीसूक्त!

googlenewsNext

सद्यस्थितीत नेहमीचे धावपळीचे जीवन, वातावरणातील प्रदूषण इत्यादी कारणाने मनुष्याला शांत झोप मिळणे कठीण झाले आहे. काही लोकांना झोप येण्यासाठी झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात. तर काहींना आणखी काही औषध घ्यावे लागते. याचा परिणाम अनुत्साह, कामात लक्ष न लागणे, बुद्धी मंद होणे आणि आरोग्य बिघडणे यासारखे अनेक रोग जडतात. या निद्रानाशाच्या समस्येवर उपासना म्हणून रात्री अंथरुणावर पडल्यावर तीन वेळा रात्रीसूक्त म्हणावे. त्यामुळे लवकरच शांत झोप लागते. 

काहीवेळा कुटुंबातील व्यसनाधीन व्यक्तीमुळे घरात कलह होतो. संसार सौख्य लाभत नाही सर्वांची मने दुभंगतात. मग ते व्यसन दारूचे असो अथवा जुगाराचे. अशा परिस्थितीत रात्रिसूक्ताचे वाचन केल्याने आळस, नैराश्य, तमोगुण कमी होऊन आंतर्प्रेरणेने, आतंरस्फुर्तीने नित्य व्यवहार उत्तम होतो. निद्रा नाशावर हे सूक्त अतिशय प्रभावी आहे. 

रात्रीसूक्त 

ॐ विश्वेश्वरी जगद्धात्री स्थितिसंहारकारिणीम् । 
निद्रां भगवतीं विष्णोरतुलां तेजसः प्रभुः ॥ १ ॥ 

त्वं स्वाहा त्वं स्वधा त्वं हि वषट्कारः स्वरात्मिका । 
सुधा त्वमक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता ॥ २ ॥ 

अर्धमात्रास्थिता नित्या यानुच्चार्या विशेषतः । 
त्वमेव सन्ध्या सावित्री त्वं देवि जननी परा ॥ ३ ॥ 

त्वयैतद्धार्यते विश्वं त्वयैतत्सृज्यते जगत् । 
त्वयैतत्पाल्यते देवि त्वमत्स्यन्ते च सर्वदा ॥ ४ ॥ 

विसृष्टौ सृष्टिरूपा त्वं स्थितिरूपा च पालने । 
तथा संहृतिरूपान्ते जगतोऽस्य जगन्मये ॥५ ॥ 

महाविद्या महामाया महामेधा महास्मृतिः । 
महामोहा च भवती महादेवी महासुरी ॥ ६ ॥ 

प्रकृतिस्त्वं च सर्वस्य गुणत्रयविभाविनी । 
कालरात्रिर्महारात्रिर्मोहरात्रिश्च दारुणा ।। ७ ॥ 

त्वं श्रीस्त्वमीश्वरी त्वं ह्रीस्त्वं बुद्धिर्बोधलक्षणा । 
लज्जा पुष्टिस्तथा तुष्टिस्त्वं शान्तिः शान्तिरेव च ॥ ८ ॥ 

खड्गिनी शूलिनी घोरा गदिनी चक्रिणी तथा । 
शङ्खिनी चापिनी बाणभुशुण्डीपरिघायुधा ॥ ९ ॥ 

सौम्या सौम्यतराशेषसौम्येभ्यस्त्वतिसुन्दरी । 
परापराणां परमा त्वमेव परमेश्वरी ॥१० ॥ 

यच्च किञ्चित् क्वचिद्वस्तु सदसद्वाखिलात्मिके । 
तस्य सर्वस्य या शक्तिः सा त्वं किं स्तूयसे तदा ॥११ ॥ 

यया त्वया जगत्स्स्रष्टा जगत्पात्यत्ति यो जगत् । 
सोऽपि निद्रावशं नीतः कस्त्वां स्तोतुमिहेश्वरः ॥ १२ ॥ 

विष्णुः शरीरग्रहणमहमीशान एव च । 
कारितास्ते यतोऽतस्त्वां कः स्तोतुं शक्तिमान् भवेत् ॥ १३ ॥ 

सा त्वमित्थं प्रभावैः स्वैरुदारैर्देवि संस्तुता । 
मोहयैतौ दुराधर्षावसुरौ मधुकैटभौ ॥१४ ॥ 

प्रबोधं च जगत्स्वामी नीयतामच्युतो लघु । 
बोधश्च क्रियतामस्य हन्तुमेतौ महासुरी ॥१५ ॥

 

Web Title: Effective Worship on Insomnia and Family Conflict: Ratrisuktam!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.