२०२५ला आषाढी, कार्तिकी एकादशी कधी? एकाच महिन्यात ३ एकादशींचा अद्भूत योग; पाहा, संपूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 10:00 IST2024-12-24T09:59:02+5:302024-12-24T10:00:51+5:30

All Ekadashi In The Year 2025 Date List: सन २०२५ ची पहिली एकादशी आणि ३१ डिसेंबर २०२५ ची एकादशी एकच आहे. कोणत्या एका महिन्यात तीन एकादशी येत आहेत? सन २०२५ मधील सर्व एकादशी तिथी आणि तारखा यांची यादी पाहा एकाच क्लिकवर...

ekadashi 2025 date list know about january 2025 to december 2025 all ekadashi 2025 details see full list in marathi | २०२५ला आषाढी, कार्तिकी एकादशी कधी? एकाच महिन्यात ३ एकादशींचा अद्भूत योग; पाहा, संपूर्ण यादी

२०२५ला आषाढी, कार्तिकी एकादशी कधी? एकाच महिन्यात ३ एकादशींचा अद्भूत योग; पाहा, संपूर्ण यादी

All Ekadashi In The Year 2025 Date List: २०२५ वर्ष अनेकार्थाने विशेष, अद्भूत आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. सन २०२५ मध्ये नवग्रहांपैकी सर्वांत महत्त्वाचे मानले गेलेले शनी, गुरु आणि राहु-केतु राशीपरिवर्तन करणार आहे. याचा केवळ राशींवर नाही, तर देश-दुनियेवर मोठा प्रभाव पडेल, असे सांगितले जात आहे. केवळ ज्योतिषशास्त्रानुसार नाही तर भारतीय संस्कृती, परंपरा यांसाठीही सन २०२५ दुर्मिळ योगांनी युक्त ठरू शकेल, असे म्हटले जात आहे. भारतीय परंपरांमध्ये एकादशी तिथीला अनन्य साधारण महत्त्व आहे. सन २०२५ मध्ये किती एकादशी व्रताचरण केले जाणार आहे. कोणत्या महिन्यात कोणती एकादशी येत आहे? एकाच महिन्यात ३ एकादशी तिथी कधी येणार आहेत? पाहा, सन २०२५ मधील सर्व एकादशी, तारखा यांची यादी एका क्लिकवर...

प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य पक्षांतील अकरावी तिथी एकादशी या नावाने संबोधिली जाते. भगवान श्रीविष्णूंची अत्यंत प्रिय तिथी, अशी तिची ख्याती आहे. वैष्णव, शैव, सौर आदी व विशेषत: सर्व विष्णूभक्त एकादशीचे व्रताचरण करतात. नित्य व काम्य असे हे उभयविध व्रत आहे. व्रतविषयक सामान्य नियम यालाही लागू आहेत. एकादशीच्या बाबतीत ‘स्मार्त’ व ‘भागवत’  असे दोन संप्रदाय आहेत. ही तिथी दिनद्वयव्यापिनी असल्यास द्वादशीविद्धा वैष्णवांकरिता विहित आहे. प्रत्येक महिन्यात दोन याप्रमाणे वर्षातून २४ एकादशी तिथी येतात. दिवसभर उपवास व रात्री जागरण करून संपूर्ण दिवस हरिकीर्तनात घालविणे हा या दिवसाचा विशेष आहे. या दिवशी उपवास केला असता सर्व कामना परिपूर्ण होतात व वैष्णवपदही प्राप्त होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. आषाढ शुद्ध एकादशी महाएकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. या दिवशी विष्णू शयन करतात म्हणून शयनी असे नाव पडले. कार्तिक शुद्ध एकादशीस विष्णू जागे होतात म्हणून प्रबोधिनी असे नाव पडले. आषाढी व कार्तिकी ह्या एकादशी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्ष शुद्ध एकादशी हा दिवस ‘गीताजंयती’  म्हणून प्रसिद्ध आहे. प्रदेशपरत्वे एकादशीव्रत आचरण्याचे प्रकार भिन्न भिन्न आढळतात.

सन २०२५ मध्ये येणाऱ्या एकादशी आणि एकादशी तारीख

जानेवारी २०२५

पौष महिना शुद्ध पक्ष - पुत्रदा एकादशी - १० जानेवारी २०२५
पौष महिना कृष्ण पक्ष - षट्तिला एकादशी- २५ जानेवारी २०२५

फेब्रुवारी २०२५

माघ महिना शुद्ध पक्ष - जया एकादशी - ८ फेब्रुवारी २०२५
माघ महिना कृष्ण पक्ष - विजया एकादशी - २४ फेब्रुवारी २०२५

मार्च २०२५

फाल्गुन महिना शुद्ध पक्ष - आमलकी एकादशी - १० मार्च २०२५
फाल्गुन महिना कृष्ण पक्ष - पापमोचनी एकादशी - २५ मार्च २०२५

एप्रिल २०२५

चैत्र महिना (मराठी नववर्ष) शुद्ध पक्ष - कामदा एकादशी - ८ एप्रिल २०२५
चैत्र महिना कृष्ण पक्ष - वरुथिनी एकादशी - २४ एप्रिल २०२५

मे २०२५

वैशाख महिना शुद्ध पक्ष - मोहिनी एकादशी- ८ मे २०२५
वैशाख महिना कृष्ण पक्ष - अपरा एकादशी- २३ मे २०२५

जून २०२५

ज्येष्ठ महिना शुद्ध पक्ष - निर्जला एकादशी - ६ जून २०२५
ज्येष्ठ महिना कृष्ण पक्ष - योगिनी एकादशी - २१ जून २०२५

जुलै २०२५

आषाढ महिना शुद्ध पक्ष - आषाढी देवशयनी एकादशी - ०६ जुलै २०२५
आषाढ महिना कृष्ण पक्ष - कामिका एकादशी - २१ जुलै २०२५

ऑगस्ट २०२५

श्रावण महिना शुद्ध पक्ष - श्रावण पुत्रदा एकादशी - ०५ ऑगस्ट २०२५
श्रावण महिना कृष्ण पक्ष - अजा एकादशी - १९ ऑगस्ट २०२५

सप्टेंबर २०२५

भाद्रपद महिना शुद्ध पक्ष - परिवर्तिनी एकादशी - ३ सप्टेंबर २०२५
भाद्रपद महिना कृष्ण पक्ष - इंदिरा एकादशी - १७ सप्टेंबर २०२५

ऑक्टोबर २०२५

अश्विन महिना शुद्ध पक्ष - पापांकुशा एकादशी - ३ ऑक्टोबर २०२५
अश्विन महिना कृष्ण पक्ष - रमा एकादशी - १७ ऑक्टोबर २०२५

नोव्हेंबर २०२५

कार्तिक महिना शुद्ध पक्ष - कार्तिकी एकादशी विष्णुप्रबोधोत्सव - ०२ नोव्हेंबर २०२५
कार्तिक महिना कृष्ण पक्ष - उत्पत्ति एकादशी- १५ नोव्हेंबर २०२५

डिसेंबर २०२५

मार्गशीर्ष महिना शुद्ध पक्ष - मोक्षदा एकादशी - १ डिसेंबर २०२५
मार्गशीर्ष महिना कृष्ण पक्ष - सफला एकादशी - १५ डिसेंबर २०२५
पौष महिना शुद्ध पक्ष - पुत्रदा एकादशी - ३० डिसेंबर २०२५
 

Web Title: ekadashi 2025 date list know about january 2025 to december 2025 all ekadashi 2025 details see full list in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.