पैसे सगळेच कमवतात, आपण आशीर्वाद कमवायला शिकूया;वाचा ही गोष्ट!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: April 7, 2021 12:44 PM2021-04-07T12:44:56+5:302021-04-07T12:45:17+5:30

देवदूताची वाट सगळेच पाहतात, आपण कोणासाठी देवदूत बनूया!

Everyone earns money, let's learn to earn blessings! | पैसे सगळेच कमवतात, आपण आशीर्वाद कमवायला शिकूया;वाचा ही गोष्ट!

पैसे सगळेच कमवतात, आपण आशीर्वाद कमवायला शिकूया;वाचा ही गोष्ट!

Next

मदत करायला पैसेच कामी येतात असे नाही. तर मदतीची भावना मनात असावी लागते. आपण सगळेच जण देवदूताची वाट पाहत असतो, परंतु भगवंताने जर आपल्याला सक्षम बनवले असेल, तर आपण कोणाच्या आयुष्यात देवदूत बनून जाण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे. कारण, पैसे सगळेच कमवतात, आपण आशीर्वाद कमवायला शिकले पाहिजे! तो कसा कमवायचा, शिकूया या गोष्टीतून...!

एक तरुण आपल्या पहिल्या नोकरीची पार्टी देण्यासाठी मित्रांसमवेत एका हॉटेलात गेला. त्याने सर्वांसाठी गारेगार लस्सीची ऑर्डर दिली. तेव्हाच एक भिकारी बाई बाहेरून त्या तरुणाकडे बघत खुणेने भीक मागत होती. कधी नव्हे ते, हा तरुण भीक द्यायला उठला. मित्रांना आश्चर्य वाटले. त्या बाईजवळ जात तरुणाने पैशांचे पाकीट काढले आणि त्यातून पैसे न देता त्या बाईला विचारले, 'आजी, लस्सी पिणार?'

आपल्याला एवढ्या आदराने, प्रेमाने कोणी आजी म्हटले, हे ऐकून त्या बाईला मोहरून आले. तिने नकारार्थी मान डोलवली. तरुणाने पुन्हा आग्रह केला आणि वेटरला ऑर्डर दिली. मित्रांबरोबर आजीसाठीसुद्धा लस्सीचा ग्लास आला. आजी तो ग्लास घेऊन हॉटेलच्या पायरीबाहेर बसली. आजीला आत बोलावून आपल्या बरोबर बसवावे असे तरुणाला वाटले. परंतु, हॉटेल मालकाला ते रुचले नसते. म्हणून तो आपल्या लस्सीचा ग्लास घेऊन आजीजवळ जाऊन बसला. मित्रांसाठी त्याचे वागणे अनाकलनीय होते.

हॉटेल मालकाने त्या दोघांना पाहिले आणि दोन खुच्र्या पाठवल्या व त्यावर बसायला सांगितले. तो तरुण हॉटेल मालकाचे आभार मानणार, तोच हॉटेल मालक म्हणाला, 'आभार मानू नका, माझ्या हॉटेलमध्ये ग्राहक अनेक येतात, पण माणसं कमी येतात. तुम्ही माणुसकी जपलीत, मी माणुसकीचा आदर केला. यापुढे मीसुद्धा मला शक्य होईल तेव्हा माणुसकी जपण्याचा नक्की प्रयत्न करेन. कारण मेहनत करून पैसे कमवता येतीलही, परंतु आशीर्वाद कमवायला आधी माणुसकी कमवायला हवी!'

Web Title: Everyone earns money, let's learn to earn blessings!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.