उत्तराखंड येथील भगवान नृसिंहाचे विलक्षण मंदिर आणि तेवढीच विलक्षण कथा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 08:00 AM2021-05-25T08:00:00+5:302021-05-25T08:00:02+5:30

या मंदिराबद्दल एक मान्यता आहे, जे आपत्तीशी थेट संबंधित आहे, असे म्हणतात.

Fantastic temple of Lord Nrusinha in Uttarakhand and just as fantastic story! | उत्तराखंड येथील भगवान नृसिंहाचे विलक्षण मंदिर आणि तेवढीच विलक्षण कथा!

उत्तराखंड येथील भगवान नृसिंहाचे विलक्षण मंदिर आणि तेवढीच विलक्षण कथा!

googlenewsNext

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात भगवान नृसिंहाचे मंदिर आहे. भगवान बद्रीनाथांची थंडीच्या दिवसात येथे पूजा केली जाते, म्हणूनच त्याला नरसिंह बद्री असेही म्हणतात.भगवान विष्णूचा चौथा अवतार म्हणजे भगवान नृसिंह. आज नृसिंह जयंती आहे. त्यानिमित्त जाणून घेऊया या विलक्षण मंदिराविषयी! 

भगवान नृसिंहांनी वैशाख महिन्यात शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी आणि हिरण्यकश्यपु राक्षसाला ठार मारण्यासाठी हा अवतार घेतला होता. भगवान नृसिंह हिरण्यकशिपुच्या वधासाठी स्तंभ फाडून प्रकट झाले आणि त्यांनी अर्धा नर नर व अर्धा सिंह अशा देहरचनेत अवतार घेतला म्हणून त्या रुपाला नरसिंह किंवा नृसिंह म्हटले गेले. भगवान नृसिंहाची अनेक मंदिरे असली तरी उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील जोशीमठ येथे असलेले मंदिर खूप खास आहे. या मंदिराबद्दल एक मान्यता आहे, जे आपत्तीशी थेट संबंधित आहे, असे म्हणतात. 

काही काळापूर्वी उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात झालेल्या विध्वंसात बर्‍याच लोकांचा बळी गेला. या जिल्ह्यातील जोशीमठात भगवान नृसिंह यांना समर्पित मंदिर आहे. सप्त बद्रींपैकी एक असल्यामुळे या मंदिरास नृसिंह बद्री असे म्हणतात. असे मानले जाते की संत श्री बद्रीनाथ हिवाळ्यामध्ये या मंदिरात राहत असत. 

प्रलय येईल आणि बद्रीनाथचा मार्ग बंद होईल...?

या मंदिराची आणखी एक खास गोष्ट म्हणजे येथे स्थापित भगवान नृसिंहाची मूर्ती दररोज लहान होत आहे. मूर्तीचे डावे मनगट लहान आहे आणि दिवसेंदिवस ते आणखी लहान होत चालले आहे. तेथील रहिवासी हा फरक अनुभवतात. हा फरक सूक्ष्म असला, तरी रोज पाहणाऱ्याला हमखास जाणवतो. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार ज्या दिवशी मनगट संपुष्टात येईल आणि पुतळ्यापासून विभक्त होईल, त्यादिवशी बद्रीनाथकडे जाणारा मार्ग कायमचा बंद होईल. 

खरंच तसे होईल का, यावर काळच काय ते उत्तर देईल. तूर्तास आता आलेली प्रलयसदृश महामारीची स्थिती संपुष्टात यावी आणि भगवान नृसिंहांनी त्या अदृश्य किटाणूचा खात्मा करावा, अशी आपण प्रार्थना करूया!

Web Title: Fantastic temple of Lord Nrusinha in Uttarakhand and just as fantastic story!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.