पाल पाहून घाण वाटते? पण पालीचे दर्शन देतात शुभ अशुभाचे संकेत; वाचा शास्त्रानुभव!`

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 06:16 PM2022-05-25T18:16:53+5:302022-05-25T18:17:10+5:30

मगरीसदृश्य पाली घरात बिनबोभाट फिरतात, पण त्यांच्या दिसण्याने तुमचाच फायदा होणार असेल तर?

Feel dirty looking Lizards? But Lizards gives signs of good and bad; Read more! | पाल पाहून घाण वाटते? पण पालीचे दर्शन देतात शुभ अशुभाचे संकेत; वाचा शास्त्रानुभव!`

पाल पाहून घाण वाटते? पण पालीचे दर्शन देतात शुभ अशुभाचे संकेत; वाचा शास्त्रानुभव!`

googlenewsNext

आपल्या सभोवताली असे अनेक जण असतात, जे एकवेळ वाघाला घाबरणार नाहीत पण पालीला घाबरतात. वास्तविक पाल काही करत नाही, मात्र तिला बघूनच अनेकांना घाण वाटते आणि ती कोणत्याही क्षणी आपल्याच अंगावर येऊन पडेल अशी भीती वाटते. कितीही पेस्ट कंट्रोल केले तरी पालीला आपल्या घराचे एंट्री कार्ड मिळतेच आणि ती आपल्या पिळवळींसह घरात सुखेनैव राहते. इथे आपण तिला घराबाहेर घालवण्याच्या उपायांबद्दल बोलणार नाही आहोत तर आपण पालीच्या दिसण्याने होणारे शकुन अपशकुन जाणून घेणार आहोत. 

>>मनात शंकेची पाल चुकचुकणे हा वाकप्रचार आपण बालपणीपासून ऐकत आलो आहोत. पण पालीचे प्रत्यक्ष चुकचुकणे कानावर पडणे शुभ मानले जाते. नव्हे तर घरात लक्ष्मीचे आगमन होणार असे मानले जाते. 

>>छताला चिकटून बसलेली पाल चुकून आपल्या अंगावर पडली, तर तिचे आपल्या उजव्या बाजूला पडणे शुभ तर डाव्या बाजूला पडणे अशुभ मानले जाते. उजव्या हाताला पाल पडल्याने धनवृद्धी होते तर डाव्या हाताला पडल्याने धनहानी होते असे म्हणतात. 

>>आपण झोपेत असताना पोटावर पाल पडली तर पोटाचे विकार उद्भवतात मात्र पायाला पाल स्पर्शून गेली तर दीर्घ काळापासून सुरु असलेले आजार बरे होतात.
 
>>भिंतीवर सरपटणाऱ्या मगरी सदृश्य पाली नेमक्या महत्त्वाच्या कामाला घराबाहेर पडताना दिसल्या तर त्यांचे दर्शन काम यशस्वी होणार असल्याचे द्योतक मानले जाते, तर कामासाठी निघताना पाल अंगावर पडणे अशुभ मानले जाते. 

>>नवीन वास्तू मध्ये प्रवेश केल्यावर एखादी पाल मृतावस्थेत दिसणे अशुभ ठरते. त्या घरात आजारपण येते असे म्हणतात. 

>>तर दोन पालींना भांडताना पाहणे प्रिय जनांचा वियोग होणार असल्याचे संकेत मानले जातात. 

>>दोन पालींचे मिलन होताना पाहणे घरात शुभ कार्य घडणार असल्याचे दर्शवतात. 

अर्थात हे शास्त्र संकेत लोकांनी आपल्या पूर्वानुभवावरून लिहिले आहेत. तुमचा पाल दर्शनाचा अनुभव काय आहे ते सांगायला विसरू नका!

Web Title: Feel dirty looking Lizards? But Lizards gives signs of good and bad; Read more!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.